नागपूर– नागपूर शहरातील पारडी पोलिसांनी मोठी कारवाई करत १०६.८५० किलो अमली पदार्थ गांजासह एकूण ४१ लाख ५८ हजार ४५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (१७ जुलै) पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भंडारा-हैदराबाद हायवेवरील महालक्ष्मी पेट्रोल पंपाच्या मागे करण्यात आली.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून युनिट क्र. ५ चे पोहवा ५५०८ राजेंद्र टाकळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी ४ वाजून २ मिनिटांपासून रात्री ८.५० वाजेपर्यंत ही कारवाई पार पडली. पोलिसांनी आईसर कंपनीच्या टेम्पोची (MH40BG6034) तपासणी केली असता, त्यातून प्रतिबंधित गांजाचा मोठा साठा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.
अटक आरोपी –
ताज हबीब शेख मोहम्मद (वय २७) – रा. वाकी, ता. सावनेर, जि. नागपूर
शैलेंद्र रामलखन गुप्ता (वय २८) – रा. यादव नगर, यशोधरानगर, नागपूर
पोलिसांच्या रडारवर असलेले फरार आरोपी –
मोहसीन उर्फ फिरोज – रा. कॅन्सर हॉस्पिटल मागे, यशोधरानगर
छोटू – मोबाईल: ९६६८६५४७५६
वांगु – मोबाईल: ८४५९३९१६५८
जप्त केलेला मुद्देमाल –
गांजा – १०६.८५० किलो (किंमत प्रती किलो ₹२५,०००; एकूण ₹२६,७१,२५०)
टेम्पो (MH40BG6034) – किंमत ₹१४,००,०००
३ मोबाईल फोन – ₹२६,०००
नट-बोल्ट उघडण्यासाठी वापरलेले पान्हे – २ नग – ₹३००
भाजीपाला असलेल्या २०३ कॅरेट्स – ₹६०,९००
एकूण मुद्देमाल – ₹४१,५८,४५०
या प्रकरणी पारडी पोलीस ठाण्यात NDPS ऍक्टच्या कलम ८(क), २०(ब)ii(क), २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई दोन पंचासमक्ष पंचनामा करून करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप बुवा (गुन्हे शाखा, युनिट ५, नागपूर शहर) यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.फरार आरोपींचा शोध सुरू असून, नागपूर पोलिसांकडून तपास अधिक वेगाने सुरू असल्याची माहिती आहे.