अखेर प्रतीक्षा संपली; दहावीचा निकाल जाहीर,राज्यात ९४.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण!

नागपूर: दहावीच्या यशस्वी प्रवासाला मिळाली उजळणी! महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आज दहावीचा निकाल अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. यंदा संपूर्ण राज्यात एकूण ९४.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ही यशाची टक्केवारी गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय ठरत आहे. राज्यभरात...

विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा; १४-१५ मेसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर
नागपूर: नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने १४ आणि १५ मे रोजी विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. यासाठी हवामान विभागाने विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. विशेषतः गडचिरोली, यवतमाळ, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना याचा अधिक फटका बसू...

प्रफुल्ल गुडधे पाटील यांची याचिका गुणवत्ता हिन, मुख्यमंत्री फडणवीसांचा न्यायालयाला याचिका रद्द करण्याचा आग्रह
नागपूर:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीतील विजयाला आव्हान देणारी एक याचिका बॉम्बे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेचे निवारण काँग्रेसचे नेते प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी...

भारत -पाकिस्तान युद्धविरामाचा निर्णय राजकीय हेतूंनी प्रेरित ; विजय वडेट्टीवारांचा केंद्रावर आरोप
नागपूर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या युद्धविरामावरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, हा निर्णय देशाच्या हितासाठी नसून सत्ताधाऱ्यांच्या राजकीय फायद्याच्या गणिताचा भाग आहे. वडेट्टीवार म्हणाले की,...
बुद्धपौर्णिमा उत्सवानिमित्त कोराडी येथे भव्य कार्यक्रम; महसूल मंत्री बावनकुळे यांनी भगवान बुद्धांना केले अभिवादन
नागपूर: कोराडी येथील संघदीप बुद्ध विहारात बुद्धपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भगवान गौतम बुद्धांना अभिवादन करत उपस्थित नागरिकांना शांती, करुणा आणि प्रज्ञेच्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले. या प्रसंगी त्यांनी बुद्धपौर्णिमेच्या शुभेच्छा देत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कारही...
पाकिस्तानने दाऊद इब्राहिमला लपवलं? गुप्तचर यंत्रणांकडून मोठा खुलासा
नवी दिल्ली : १९९३ च्या मुंबई स्फोटांचा मुख्य सूत्रधार आणि भारताचा ‘मोस्ट वॉन्टेड’ गुन्हेगार दाऊद इब्राहिम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी मिळवलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सरकारने आंतरराष्ट्रीय दबावामुळे दाऊदच्या उपस्थितीची कबुली दिल्यानंतर त्याला एका गुप्त ठिकाणी हलवले...
मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक, नागरी-सैन्य समन्वयावर चर्चा
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी आज एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या भागातील भारतीय लष्कराचे जनरल ऑफिसर कमांडिंग, भारतीय नौसेनेचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग (महाराष्ट्र नौदल क्षेत्र), भारतीय वायुदलाचे एअर वाईस मार्शल, तसेच राज्याचे मुख्य...
प्रतीक्षेला पूर्णविराम; दहावी बोर्डाचा निकाल अखेर उद्या होणार जाहीर
नागपूर: बारावीच्या निकालानंतर आता सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या दहावीच्या निकालाची घोषणा अखेर उद्या, १३ मे २०२५ रोजी होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या या परीक्षेला यंदा १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली होती. उद्या...
लंडन स्ट्रीटला नागपुर महानगर पालिकेचे स्वघोषित प्रशासक “अतिक्रमण वीर प्रफुल स्ट्रीट” नाव द्या -शिवसेना नेते किशोर तिवारी यांची मागणी
सिता नगर, खामला, भांमटी, जैताळा बाजार चौक मधील 5.5 किमी लांब रेल्वे ट्रॅकवरील ३४ लाख ४५ हजार चौरस फूट जमीन ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझरीकडून विनामूल्य मिळविल्यावर महापालिकेने "लंडन स्ट्रीट प्रकल्प" सुरू करून संपूर्ण जमीन केवळ भूखंड लिलावासाठी वापरलीव व लिलावही असा...
नागपूरमध्ये एमडी ड्रग्सची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; ६ लाखांचा माल जप्त, चार आरोपींना अटक
नागपूर : नागपूर गुन्हे शाखेच्या एनडीपीएस (NDPS) पथकाने मोठी कारवाई करत एमडी ड्रग्सची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ६.३१ लाख रुपयांचा अमली पदार्थ आणि शस्त्रसाठा जप्त करत चार कुख्यात गुन्हेगारांना अटक केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे...
CBSE दहावी-बारावीच्या निकालाची आज प्रतीक्षा; विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ, बोर्डाकडून अद्याप घोषणा नाही!
नवी दिल्ली :केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) मार्फत घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल अजूनही जाहीर झालेले नाहीत आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काही माध्यम अहवालांनुसार, आज म्हणजेच १२ मे रोजी निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे....
हिंदू शेरनी तू कुछ दिनों की मेहमान…;पाकिस्तानमधून भाजप नेत्या नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी
मुंबई- भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानमधून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नवनीत राणा यांनी खार पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. राणा यांना...
विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांच्या झंझावाती प्रवासाची समाप्ती
नवी दिल्ली :भारतीय क्रिकेटचा बुलंद आवाज, संयम आणि आक्रमकतेचा समतोल राखणारा खेळाडू विराट कोहली याने अखेर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाला नवनवीन उंचीवर नेणाऱ्या आणि लाखो क्रिकेटप्रेमींच्या मनावर राज्य करणाऱ्या कोहलीने एक युग संपुष्टात...
आमदार परिणय फुके यांच्या कुटुंबातील वाद पुन्हा पोलीस ठाण्यात;आईने सूनविरुद्ध दाखल केली पोलिस तक्रार
नागपूर : विधान परिषदेचे आमदार परिणय फुके यांच्या कुटुंबातील वाद पुन्हा एकदा पोलिस ठाण्याच्या दारात पोहोचले आहेत. अंबाझरी पोलिस ठाण्यात त्यांच्या आई डॉ. रमा फुके (वय ६८) यांनी आपल्या सून प्रिया फुके विरोधात गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली आहे....
नागपुरात ‘फूटपाथ फ्रीडम’ मोहिमेअंतर्गत २,२३३ अतिक्रमणांवर कारवाई;वाहतूक पोलिसांची कडक पावले !
नागपूर – र शहरातील फूटपाथ पुन्हा पादचाऱ्यांसाठी मोकळे करून देण्यासाठी आणि पादचारी हालचाली सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ६ मे ते १० मेदरम्यान ‘फूटपाथ फ्रीडम’ नावाची विशेष मोहीम राबवली. या पाच दिवसांच्या मोहिमेदरम्यान, शहरातील विविध विभागांमध्ये फूटपाथ अतिक्रमण करणाऱ्या २,२३३ जणांवर...
युद्धबंदीची घोषणा; भारताकडून पाकिस्तानला पाणी मिळणार की नाही?
नवी दिल्ली :जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक पावलं उचलली होती. यामध्ये सर्वात मोठं पाऊल म्हणजे सिंधू जल करारावर तात्पुरती स्थगिती आणि पाकिस्तानच्या दिशेने जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह रोखणं हे होतं. आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धबंदीची अधिकृत...
दहशतवादाविरोधात भारताची कारवाई अनिवार्य होती; शस्त्रसंधीनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया
नागपूर:भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या शस्त्रसंधीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी एक महत्वपूर्ण पोस्ट केली आहे. पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये भारताच्या भूमिकेवर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, भारताने कधीच दहशतवादाला पाठिंबा दिला नाही. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत, भारताने केवळ दहशतवादी...
भारत-पाकिस्तानदरम्यान सीजफायर लागू; विक्रम मिस्री यांची माहिती
नवी दिल्ली – भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विक्रम मिस्री यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली की भारत आणि पाकिस्तानदरम्यान आज संध्याकाळी ५ वाजेपासून सीजफायर (शस्त्रसंधी) लागू करण्यात आले आहे. मिस्री यांनी स्पष्ट केले की हा सीजफायर भारताच्या अटींवर करण्यात आला...
भारत-पाकीस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा अधिक सतर्कतेचा आदेश
▪️जिल्हादंडाधिकारी यांनी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्टया केल्या रद्द ▪️कोणत्याही कार्यक्रमासाठी ड्रोनची परवानगी घेणे आवश्यक ▪️भारत-पाकीस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा अधिक सतर्कतेचा आदेश ▪️नियोजन भवन येथे सर्व विभागप्रमुखांकडून सतर्कतेचा घेतला आढावा नागपूर,दि. 10 : भारत-पाकीस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी अधिक दक्ष...
नागपूरच्या वाडी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस; ६ वर्षीय चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला!
नागपूर (वाडी): वाडीच्या दत्तावाडी परिसरात भटक्या कुत्र्यांनी एका ६ वर्षीय मुलावर जीवघेणा हल्ला करून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. स्वरूप विजय मेश्राम असं या गंभीर जखमी मुलाचं नाव असून तो आपल्या घराबाहेर खेळत असताना ही धक्कादायक घटना घडली. सुरक्षा नगरमधील...
नागपुरात ‘लंडन स्ट्रीट’साठी मनपाची बिल्डरशी सौदेबाजी;खामला बाजार हटवला, झाडांची होणार कत्तल!
नागपूर : नागपूरच्या खामला परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले बहुपरिचित खामला मार्केट हटवण्यात आले आहे. या निर्णयामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या मार्केटच्या जागेवर आता ‘लंडन स्ट्रीट’ प्रकल्प राबवण्यात येणार असून, त्यासाठी ही जागा नागपूर महानगरपालिकेने एका...