नागपूर: आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपल्या संघटनात्मक हालचालींना वेग दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज अधिकृत पत्रक काढून भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रा.संजय भेंडे यांची नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी ‘निवडणूक प्रमुख’ म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे.प्रा संजय भेंडे यांच्याकडे केवळ शहराच्या निवडणूक नियोजनाची जबाबदारीच नाही,तर त्यांना उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणूनही नियुक्त करण्यात आले आहे.भाजपचे शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी यासंदर्भात घोषणा केली.

Advertisement








