नागपूर: आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपली संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी हालचाली तीव्र केल्या आहेत.भाजपचे शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी शहरातील विविध विधानसभा मतदारसंघांर्गत येणाऱ्या मंडळांसाठी ‘प्रभाग संयोजकां’ च्या नावांची घोषणा केली आहे.
संघटनात्मक मजबुतीसाठी करण्यात आलेल्या या नियुक्त्या खालीलप्रमाणे आहेत:
१. पूर्व नागपूर (वर्धमान मंडळ)
पूर्व नागपूरमध्ये वर्धमान मंडळांतर्गत रामभाऊ आंबुलकर (प्रभाग २१) आणि गिरीष पिल्ले (प्रभाग २३) यांची संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर राजेश मुनियार (प्रभाग २२) आणि श्रीपत पटेल (प्रभाग ४) यांची सह-संयोजक म्हणून निवड झाली आहे.
२. पश्चिम नागपूर
झींगाबाई टाकळी मंडळ: बजरंग ठाकुर (प्रभाग १०) आणि संजय देशपांडे (प्रभाग ११) यांची संयोजक पदी नियुक्ती करण्यात आली.
सुरेंद्रगड मंडळ: सतिश वडे (प्रभाग १२) आणि लक्ष्मीकांत (बाबा) दादुरीया (प्रभाग १४) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
३. उत्तर नागपूर
नारा नारी मंडळ: राजेश बटवानी (प्रभाग १) आणि प्रशांत शुक्ला (प्रभाग २) यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
कळमना मंडळ: उमेश गोविंदराव बुटे (प्रभाग ३) आणि आशिष कुंभारे (प्रभाग ४) यांची संयोजक म्हणून, तर पांडुरंग युवराज निकाडजे यांची प्रभाग ४ साठी सह-संयोजक म्हणून निवड करण्यात आली आहे.
वैशाली नगर मंडळ: राजेश शाहू (प्रभाग ५) आणि चंद्रकांत सदावर्ते (प्रभाग ६) यांची नियुक्ती झाली आहे.
बाळाभाऊपेठ इंदोरा मंडळ: संजय तरारे (प्रभाग ७) आणि दीपक अरोरा (प्रभाग ९) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
४. दक्षिण नागपूर
जानकी मंडळ: शिवनाथ बन्सोड (प्रभाग २९), चंद्रकांत मोरे (प्रभाग ३४), काशीनाथ ईटनकर (प्रभाग ३३) आणि दिलीप सुरकार (प्रभाग १७) यांची नियुक्ती झाली आहे.
हनुमान नगर मंडळ: बल्लू बाबरे (प्रभाग २७), अमर टिचकुले (प्रभाग २८) आणि महेश माहाडीक (प्रभाग ३१) यांना संयोजक पद देण्यात आले आहे.
अयोध्या मंडळ: चेतन मेश्राम (प्रभाग ३२) आणि पवन आसोलकर (प्रभाग ३०) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
५. दक्षिण-पश्चिम नागपूर
धंतोली मंडळ: राजेंद्र मुंडले (प्रभाग १६) आणि सूरज बांते (प्रभाग १७) यांची संयोजक पदी निवड करण्यात आली आहे.
६. मध्य नागपूर
गांधीबाग मंडळ: प्रभाकर दशरथ निखारे (प्रभाग ८) आणि अविनाश शिवदयाल शाहू (प्रभाग १९) यांची नियुक्ती झाली आहे.
इतवारी मंडळ: कल्पक भानारकर (प्रभाग २०) आणि भूषण देशपांडे (प्रभाग २२) यांना जबाबदारी दिली आहे.
महाल मंडळ: सचिन नाईक (प्रभाग १८) आणि सोमु देशपांडे (प्रभाग १७) यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
या नियुक्त्यांद्वारे भाजपने प्रत्येक प्रभागात आपला संपर्क अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला असून, आगामी निवडणुकीत विजयाचा मार्ग सुकर करण्यासाठी ही फळी महत्त्वाची ठरणार आहे.








