
नागपूर : आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक हालचालींना गती दिली आहे. याच अनुषंगाने भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी प्रदेश उपाध्यक्ष प्रा. संजय भेंडे यांची नागपूर मनपा निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. ही माहिती शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी दिली.
भाजप नेतृत्वाने प्रा. संजय भेंडे यांच्यावर शहरातील निवडणूक रणनीती आखणे, पक्षातील विविध घटकांमध्ये समन्वय साधणे तसेच प्रचार मोहिमेचे प्रभावी व्यवस्थापन करण्याची जबाबदारी सोपवली आहे. यासोबतच त्यांची उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदीही नियुक्ती करण्यात आली असून, त्या माध्यमातून स्थानिक पातळीवर पक्ष अधिक बळकट करण्याचा प्रयत्न आहे.
पक्ष नेतृत्वाला विश्वास आहे की प्रा. संजय भेंडे यांच्या अनुभवाचा, नेतृत्वगुणांचा आणि संघटनात्मक कौशल्याचा फायदा नागपूर मनपा निवडणुकीत भाजपला होईल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप ताकदीने आणि आत्मविश्वासाने निवडणूक रिंगणात उतरेल, असा पक्षाचा दावा आहे.








