Published On : Fri, Mar 6th, 2026
By Nagpur Today Nagpur News

अर्थसंकल्पात शेतीला प्राधान्य; शेतकरी आणि शेतमजुरांसाठी फडणवीस सरकारच्या महत्त्वाच्या घोषणा

Advertisement

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सन २०२६–२७ चा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर यंदा मुख्यमंत्री स्वतः अर्थसंकल्प मांडत असल्याने या अर्थसंकल्पाकडे विशेष लक्ष लागले होते.

यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला विशेष प्राधान्य देण्यात आले असून शेतकरी, मत्स्य व्यवसाय आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अनेक महत्त्वाच्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.

Gold Rate
Apr 18 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,54,200 /-
Gold 22 KT ₹ 1,43,500 /-
Silver/Kg ₹ 2,59,800/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शेतकऱ्यांसाठी जाहीर महत्त्वाच्या योजना-
अर्थसंकल्पीय भाषणात मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील कृषी उत्पादन वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

-शेतकऱ्यांसाठी वसुधा व्हॉईस कॉल नोटीस सेवा सुरू करण्यात येणार.
-पशुधन व्यवसायाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन संवर्धन योजना राबवली जाणार.
-शेतीसंबंधित माहिती आणि सेवा डिजिटल पद्धतीने देण्यासाठी AGRI STACK योजना सुरू केली जाणार आहे
-मत्स्य व्यवसायाच्या विकासासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना जाहीर.
-गावागावात शेतीपर्यंत पोहोचणारे रस्ते विकसित करण्यासाठी शेत पाणंद योजना राबवली जाणार.
-ग्रामीण भागातील संपर्क सुधारण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना पूर्णत्वास नेण्याचा सरकारचा निर्धार.
-पर्यावरणपूरक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात नैसर्गिक शेती अभियान सुरू केले जाणार.

शेतमजुरांनाही अपघात विम्याचे संरक्षण-
राज्य सरकारने शेतमजुरांसाठीही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. Gopinath Munde अपघात विमा योजनेचा लाभ आता शेतमजुरांनाही दिला जाणार आहे. त्यामुळे अपघाताच्या प्रसंगी शेतमजुरांना आर्थिक मदत मिळणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

२०४७ पर्यंत मोठे लक्ष्य-
कृषी क्षेत्राच्या दीर्घकालीन विकासाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याचा कृषी जीडीपी २०४७ पर्यंत ५५ अब्ज डॉलरवरून तब्बल ५०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी १० ते १५ प्रमुख पिकांसाठी एकात्मिक मूल्यसाखळी उभारून शेतीमालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.

तसेच महावेद, महाडीबीटी आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी एकात्मिक डिजिटल व्यवस्था उभारण्याचाही सरकारचा मानस असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement