Published On : Sat, Mar 7th, 2026
By Nagpur Today Nagpur News

मनपाच्या ९ विषय समित्यांच्या सभापती आणि उपसभापतीची बिनविरोध निवड

Advertisement

नागपूर,: नागपूर महानगरपालिकेच्या नऊ विषय समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाल्याने आणि ते सर्व अर्ज वैध ठरले असल्याने अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. सर्व नवनिर्वाचित सभापती, उपसभापती यांचे महापौर श्रीमती निता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, परिवहन सभापती श्रीमती मंगला खेकरे यांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.

नागपूर महानगरपालिकेच्या ९ विषय समित्यांच्या सभापती आणि उपसभापतींच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रे गुरुवारी मनपाच्या निगम सचिव डॉ. रंजना लाडे यांनी ही नामनिर्देशनपत्रे स्वीकारली.त्यानुसार, शुक्रवारी (ता.6) मा.पीठासीन अधिकारी श्री. संजय मीना यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात मनपाच्या स्थापत्य, प्रकल्प, वैद्यकीय सेवा व आरोग्य, विधि, शिक्षण, गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी, क्रीडा, महिला व बालकल्याण, जलप्रदाय, कर आकारणी व कर संकलन या विषय समित्यांच्या सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक घेण्यात आली.

Gold Rate
Mar 7th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,62,500/-
Gold 22 KT ₹ 1,51,100 /-
Silver/Kg ₹ 2,69,200/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी सुरुवातीला सर्व समितीच्या नामनिर्देश पत्राचे वाचन निगम सचिव डॉ. रंजना लाडे यांनी केले. त्यानंतर पीठासीन अधिकारी श्री. संजय मीना यांनी अर्जाची छाननी केल्यानंतर उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटांचा कालावधी दिला. दिलेल्या कालावधीत कोणत्याही उमेदवारांनी अर्ज मागे घेतला नाही. तसेच प्रत्येकी समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाकरिता प्रत्येकी एकमेव अर्ज असल्याने ९ विषय समितीच्या सभापती आणि उपसभापतीची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पीठासीन अधिकारी श्री.संजय मीना यांनी केली. तसेच बिनविरोध निवडणून आलेल्या सभापती आणि उपसभापती यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच अग्निशमन व विद्युत विशेष समित्यांसाठी सभापती आणि उपसभापती पदाकरिता नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले नसल्याची माहिती डॉ. रंजना लाडे यांनी पिठासीन अधिकारी श्री. संजय मीना यांना दिली. त्यामुळे अग्निशमन व विद्युत विशेष समित्यांसाठी सभापती आणि उपसभापतीच्या समितीकरिता निवडणूक घेता येणार नाही असे पिठासीन अधिकारी संजय मीना यांनी जाहीर केले.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड

Ø स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीच्या सभापती म्हणून श्रीमती अश्विनी जयंत जिचकार तर उपसभापती म्हणून श्री. प्रदीप वसंतराव पोहाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Ø वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीच्या सभापती म्हणून श्रीमती मनीषा अतकरे आणि उपसभापती म्हणून श्री. श्रीकांत आगलावे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

Ø विधी विशेष समितीच्या सभापती म्हणून कु. निधी नितीन तेलगोटे आणि उपसभापती म्हणून ॲड. संजयकुमार बालपांडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

Ø शिक्षण विशेष समितीच्या सभापती म्हणून श्रीमती संतोषदेवी दीपक लद्धा, उपसभापती म्हणून श्रीमती भारती विकास बुंदे यांची निवड करण्यात आली आहे.

Ø गलिच्छ वस्ती निर्मुलन व घरबांधणी विशेष समितीच्या सभापती म्हणून श्रीमती रुतिका मसराम, उपसभापती म्हणून श्री. संदीप गवई यांची बिनविरोध निवड करण्यातय आली आहे.

Ø क्रीडा विशेष समितीच्या सभापती म्हणून श्रीमती दर्शनी धवड आणि उपसभापती म्हणून श्री. संजय चावरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

Ø महिला व बालकल्याण विशेष समितीच्या सभापती म्हणून श्रीमती सारिका सुनील नांदूरकर आणि उपसभापती म्हणून श्रीमती तारा (लक्ष्मी) ओमप्रकाश यादव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

Ø जलप्रदाय विशेष समितीच्या सभापती म्हणून श्रीमती दिव्या दीपक धुरडे आणि उपसभापती म्हणून श्री. विजय (पिंटू) शंकरराव झलके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे

Ø कर आकारणी व कर संकलन विशेष समितीच्या सभापती म्हणून श्रीमती सरिता ईश्वर कावरे आणि उपसभापती म्हणून श्री. सुनिल हिरणवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement