नागपुरातील पारडीमध्ये भीषण अपघात; दुचाकीस्वार दोघांचा मृत्यू, ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल!
नागपूर : पारडी परिसरात सोमवारी रात्री वेगात आलेल्या ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये हरषवर्धन गोपाल बोहरा (४५) आणि दीपेन ओमप्रकाश सोनोने (२४,...
नागपूर जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायती निवडणुकांसाठी ७.३२ लाख मतदार मतदानासाठी सज्ज;जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांची माहिती
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका २०२५ च्या पार्श्वभूमीवर सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी आज (५ नोव्हेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यातील २७ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी एकूण ७.३२ लाख मतदार मतदान करणार...
उत्तर नागपुरात ‘डुप्लिकेट मुस्लिम मतदारां’च्या दाव्यावरून राजकारण तापले; नितीन राऊत यांची मंत्री शेलारांविरोधात तक्रार दाखल!
नागपूर : उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात ८ हजारांहून अधिक मुस्लिम मतदारांचे नाव मतदार यादीत दोन-दोन, तीन-तीन ठिकाणी असल्याचा दावा राज्याचे मंत्री आशीष शेलार यांनी केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या वक्तव्यावर काँग्रेसचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया देत...
नागपूरच्या नंदनवनमध्ये गुन्हेशाखेची धडक कारवाई; सट्टा-पट्टीवर जुगार खेळणाऱ्या १८ जणांना अटक!
नागपूर : गुन्हेशाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने नंदनवन परिसरात धडक कारवाई करून सट्टा-पट्टीवर जुगार खेळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी १८ आरोपींना ताब्यात घेत सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. घडलेला प्रकार असा की, दिनांक ४ नोव्हेंबर २०२५...
नागपुरात पाणीमीटर तपासणीदरम्यान पाळीव कुत्र्यांचा चावा; सहा महिन्यांत १३ प्रकरणे उघडकीस!
नागपूर : मागील काही महिन्यांपासून शहरात कुत्र्यांच्या चावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांच्या घरातील पाणीमीटर तपासण्यासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेकदा जीव मुठीत घेऊन काम करावे लागते. अशा पार्श्वभूमीवर एनएमसी-ओसीडब्ल्यू (NMC-OCW) यांनी नागरिकांना विनंती केली आहे की, आपल्या पाळीव प्राण्यांना नियंत्रणात...
सोन्यात भेसळ करून मुथूट फिनकॉर्पला साडेदहा लाखांची फसवणूक; दोन आरोपींवर गुन्हा दाखल
नागपूर : शुद्ध सोनेात मिलावट करून मुथूट फिनकॉर्प प्रायव्हेट लिमिटेडच्या हिंगणा शाखेला तब्बल ₹10.69 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. फिर्यादी मोहम्मद आतिक मोहम्मद झिया, शाखा...
राज्यात निवडणुकीचा रणशिंग; ‘डबल मतदारां’वर आयोगाचा ‘डबल स्टार’ प्रयोग चर्चेत!
मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं रणशिंग अखेर वाजलं आहे. राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी (४ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं. यानुसार राज्यात २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या...
महाराष्ट्रात नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले; २ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला मतमोजणी!
नागपूर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबईत पत्रकार परिषद घेत २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा केली. याशिवाय १५ नवीन नगरपंचायतींचाही समावेश करण्यात आला आहे. निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबरला मतमोजणी पार पडेल. अर्ज भरायला १० नोव्हेंबरपासून सुरुवात होणार...
‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स 2025’ मध्ये नागपूर पोलिसांचे एपीआय शिवाजी ननवरे यांची नोंद
नागपूर : नागपूर शहर पोलिस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) शिवाजी लक्ष्मण ननवरे यांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट,(8848.86मीटर)तसेच मकालू,(8485मीटर) मनासलू (8163मीटर)आणि लोहसे (8516मीटर) ही ८,००० मीटरपेक्षा अधिक उंचीची चार शिखरे यशस्वीरीत्या सर केली आहेत. ही चर शिखरे सर करणारे...
कोराडीतील नवीन विद्युत चार्जिंग बस स्टेशन कार्यांन्वित
नागपूर, : नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभाग आणि विद्युत विभागाद्वारे कोराडी येथील आपली बसच्या ई-बस डेपो येथे ३३केव्ही/०.४३३ केव्हीचे सबस्टेशन उभारण्यात आले आहे. नव्याने उभारण्यात आलेले सबस्टेशन मंगळवारी (ता.४) मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांच्या हस्ते विधिवत कार्यांन्वित करण्यात आले....
उद्धव ठाकरेंची केवळ प्रसिद्धीसाठी वक्तव्यबाजी; केंद्रीय पथक प्रस्तावाशिवाय राज्यात आलं का?बावनकुळे यांचा सवाल
नागपूर : शिवसेना (उभयपक्ष) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतंच केंद्र सरकारवर निशाणा साधत “राज्य सरकारने मदतीसाठी प्रस्तावच पाठवला नाही” असं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार करत टोला लगावला आहे. “जर खरंच राज्याकडून प्रस्ताव गेला नसेल,...
आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा ‘जम्बो’ निर्णयांचा पाऊस; मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल २१ निर्णयांना मंजुरी
मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच महायुती सरकारने घोषणाांचा वर्षाव केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल २१ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये आरोग्य, शिक्षण, महसूल, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, वित्त, आणि...
नागपुरात बनावट विदेशी दारू तयार करून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; कळमना पोलिसांची मोठी कारवाई
नागपूर : विदेशी दारूचे बनावटीकरण करून विक्री करणाऱ्या टोळीचा कळमणा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ७ आरोपींना अटक केली असून, ४ चारचाकी वाहने, १३५ लिटर विदेशी दारू आणि विविध साहित्य असा मिळून ३० लाख ३७ हजार ८१०...
लाडक्या बहिणींसाठी आनंदवार्ता;ऑक्टोबरचा हफ्ता आजपासून खात्यात जमा होणार; आदिती तटकरे यांची घोषणा
मुंबई : महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी आजचा दिवस आनंदाचा ठरणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हफ्ता आजपासून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. आदिती तटकरे यांनी सामाजिक माध्यम ‘एक्स’वर...
महाराष्ट्रात आजपासून लागू होणार आचारसंहिता? निवडणूक आयोगाची दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद
मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल आज वाजण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेणार असून, यावेळी जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगर परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकींची घोषणा होऊ शकते. मतदार यादीतील दुबार नोंदींमुळे विरोधकांनी...
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत बदल; महाराष्ट्रातील इंधनदर झाले स्वस्त!
मुंबई :सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंध असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये आज (४ नोव्हेंबर २०२५) थोडीशी घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या घसरणीचा परिणाम आता देशांतर्गत इंधनदरांवर दिसू लागला आहे. पेट्रोल-डिझेलचे नवीन दर दररोज सकाळी सहा वाजता...
सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांना विनम्र आवाहन
नागपूर,, मागील काही महिन्यांमध्ये श्वानदंशाच्या अनेक घटना नोंदविल्या गेल्या आहेत. त्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांना पाळीव कुत्रे असलेल्या घरांच्या परिसरात प्रवेश करताना असुरक्षित वाटते. सर्व नागरिकांना विनंती आहे की, आपल्या पाळीव प्राण्यांना योग्यरीत्या नियंत्रणात ठेवावे, जेणेकरून आमचे कर्मचारी आपले काम सुरक्षितपणे पार...
महाराष्ट्राचा पप्पू कोण,हे जनता ओळखते;चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंना टोला
नागपूर : राज्यात मतचोरीच्या आरोपांवरून आता शिवसेना (उभयपक्ष) प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आमनेसामने आले आहेत. महाविकास आघाडीने १ नोव्हेंबर रोजी मुंबईत मतचोरीविरोधी आंदोलन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आणि...
नागपुरात ‘मिशन २०२७’ अंतर्गत भव्य विदर्भ आंदोलन; स्वतंत्र विदर्भासाठी १६ डिसेंबरला ‘लाँग मार्च’
नागपूर : विदर्भ राज्य आंदोलन समितीने (वि.रा.आ.स.) ‘मिशन २०२७’ जाहीर करत २०२७ पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवणारच, असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. या मोहिमेअंतर्गत ग्रामीण भागातून सुरू झालेली विदर्भ राज्याची चळवळ आता शहरी पातळीवर जोर धरत असून, १६ डिसेंबर...
नागपुरातील अनुराग झा क्रिएशन्सची रोमँटिक ड्रामा फिल्म ‘18 हार्टबीट्स’ ५ सप्टेंबरला प्रदर्शित होणार
नागपूर : अनुराग झा क्रिएशन्सने आपल्या आगामी फीचर फिल्म ‘18 हार्टबीट्स’ च्या प्रदर्शनाची घोषणा केली आहे. हा एक रोमँटिक ड्रामा असून, याचे लेखन आणि दिग्दर्शन स्वतः अनुराग झा यांनी केले आहे. ही फिल्म भारतातील निवडक चित्रपटगृहांमध्ये ५ सप्टेंबर २०२५ रोजी...
भाजपाचा अजेंडा ट्रोलिंगचा, कायदेशीर पातळीवर लढा देणार; बच्चू कडूंचे विधान
अमरावती : अमरावतीत आयोजित पत्रकार परिषदेत प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला. शेतकरी आंदोलन संपल्यानंतर त्यांनी स्पष्ट आरोप केला की, सोशल मीडियावर सुरू असलेली ट्रोलिंग मोहिम भाजपाच्याच कार्यकर्त्यांनी रचलेली योजना आहे. कडू म्हणाले, “आमच्याविरोधात जाणूनबुजून...






