
नवी दिल्ली :केंद्रीय गृह मंत्रालयाने प्रशासनात व्यापक स्वरूपाचे फेरबदल करत एकूण ४९ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या निर्णयानुसार ३१ आयएएस (IAS) आणि १८ आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांची विविध केंद्रशासित प्रदेशांमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.
केंद्रशासित प्रदेशांतील प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती ही गृह मंत्रालयाच्या अखत्यारित येत असल्याने, या बदल्यांचे अधिकृत आदेश मंत्रालयाकडून जारी करण्यात आले आहेत. या फेरबदलांचा परिणाम दिल्लीसह जम्मू-काश्मीर, लडाख, गोवा, पुद्दुचेरी, अंदमान-निकोबार, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, चंदीगड, लक्षद्वीप, दादरा नगर हवेली आणि दमण-दीव या प्रदेशांतील प्रशासनावर होणार आहे.
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या – नियुक्तीचे ठिकाण
अश्वनी कुमार (1992) – जम्मू आणि लडाख
संजीव खिरवार (1994) – दिल्ली
संतोष डी. वैद्य (1998) – दिल्ली
पद्मा जयस्वाल (2003) – दिल्ली
शूरबीर सिंग (2004) – लडाख
आर. एलिस वाझ (2005) – जम्मू आणि काश्मीर
यशपाल गर्ग (2008) – दिल्ली
संजीव आहुजा (2008) – दिल्ली
नीरज कुमार (2010) – दिल्ली
सय्यद आबिद रशीद शाह (2012) – चंदीगड
सत्येंद्र सिंग दुर्सावत (2012) – दिल्ली
अमन गुप्ता (2013) – दिल्ली
राहुल सिंग (2013) – दिल्ली
अंजली सेहरावत (2013) – जम्मू आणि काश्मीर
हेमंत कुमार (2013) – अंदमान आणि निकोबार
रवी दादरीच (2014) – मिझोरम
किन्नी सिंग (2014) – पुद्दुचेरी
सागर डी. दत्तात्रय (2014) – जम्मू आणि काश्मीर
अरुण शर्मा (2015) – दिल्ली
वंदना राव (2015) – अंदमान आणि निकोबार
बसीर-उल-हक चौधरी (2015) – लडाख
मायकेल एम. डिसूझा (2015) – गोवा
आकृती सागर (2016) – जम्मू आणि काश्मीर
कुमार अभिषेक (2016) – जम्मू आणि काश्मीर
सलोनी राय (2016) – दिल्ली
निखिल यू. देसाई (2016) – गोवा
अंकिता मिश्रा (2018) – अरुणाचल प्रदेश
हरी कल्लीकट (2018) – दिल्ली
विशाखा यादव (2020) – दिल्ली
अझरुद्दीन झहीरुद्दीन काझी (2020) – दिल्ली
चीमाला शिव गोपाल रेड्डी (2020) – दिल्ली
IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या – नियुक्तीचे ठिकाण
अजित कुमार सिंगला (2004) – दिल्ली
मंगेश कश्यप (2009) – अरुणाचल प्रदेश
राजीव रंजन सिंग (2010) – चंदीगड
प्रशांत प्रिया गौतम (2013) – जम्मू आणि काश्मीर
आर. पी. मीना (2013) – दिल्ली
राहुल अलवाल (2014) – दिल्ली
एस. एम. प्रभुदेसाई (2014) – गोवा
राजिंदर कुमार गुप्ता (2014) – पुद्दुचेरी
शोभित डी. सक्सेना (2015) – दिल्ली
संध्या स्वामी (2016) – अरुणाचल प्रदेश
सचिन कुमार सिंघल (2017) – दिल्ली
अक्षत कौशल (2018) – अरुणाचल प्रदेश
श्रुती अरोरा (2018) – गोवा
अचिन गर्ग (2019) – अरुणाचल प्रदेश
सनी गुप्ता (2020) – जम्मू आणि काश्मीर
ईशा सिंग (2021) – दिल्ली
या प्रशासकीय फेरबदलांमुळे केंद्रशासित प्रदेशांतील प्रशासन अधिक गतिमान आणि कार्यक्षम होईल, असा गृह मंत्रालयाचा विश्वास आहे.








