
नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने उमेदवारीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अधिकृत यादी जाहीर होण्याआधीच भाजपकडून उमेदवारांना एबी फॉर्मचे वितरण सुरू झाले असून, यावेळी पक्षाने मोठा प्रयोग करत अनेक प्रस्थापित व ज्येष्ठ नेत्यांची तिकीटे कापली आहेत. त्याचवेळी मोठ्या प्रमाणावर तरुण आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
यावेळी संजय बंगाले, अविनाश ठाकरे, प्रवीण भिसीकार, ज्योती डेकाटे, दीपराज पार्डीकर, अर्चना हेडनकर यांसारख्या कद्दावर नेत्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. दुसरीकडे शिवानी दाणी, योगेश पाचपोर, श्रेयस कुंभारे, दुर्गेश्वरी कोसेकर यांसारख्या तरुण कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. तसेच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या दर्शिनी धावड, नेहा निकोसे आणि मनोज संगोडे यांनाही भाजपने संधी दिली आहे.
प्रभागनिहाय भाजपचे उमेदवार
प्रभाग 1 :
महेंद्र रमेश धनविजय, सुषमा संजय चौधरी, प्रमिला प्रीतम माथरानी, विरेंद्र कुकरेजा
प्रभाग 2 :
नेहा राकेश निकोसे, पंकज यादव, अनिकेत येरखेडे, सरिता मिलिंद माने
प्रभाग 7 :
मीना तरारे, राखी मानवतकर, ओमप्रकाश इंगळे, नवनीत तुली
प्रभाग 8 :
तृप्ती राहुल खंगार, कामील अन्सारी, श्रेयस कुंभारे
प्रभाग 11 :
संदीप जाधव, संगीता गिरहे, ममता ठाकूर, भूषण शिंगणे
प्रभाग 12 :
दर्शिनी धावड, मायाताई इवनाते, साधना बर्डे, विक्रम ग्वालबंसी
प्रभाग 13 :
योगेश पाचपोर, किसन गावंडे, ऋतिका मसराम
प्रभाग 14 :
प्रगती पाटील, माधुरी टेकाम, योगिता तेलंग, विनोद कन्हेरे
प्रभाग 16 :
लक्ष्मी यादव, वर्धा चौधरी
प्रभाग 17 :
प्रमोद चिखले, मनोज साबळे
प्रभाग 19 :
संजय कुमार बालपांडे
प्रभाग 20 :
हेमंत बर्डे, रेखा निमजे, स्वीटी भिसीकर
प्रभाग 21 :
निशा भोयर
प्रभाग 23 :
बाल्या बोरकर
प्रभाग 24 :
दुर्गेश्वरी कोसेकर, अरुण हारोडे, प्रदीप पोहाने, सरिता कावरे
प्रभाग 26 :
धर्मपाल मेश्राम, सीमा डोमने, शारदा बरई, बंटी कुकडे
प्रभाग 28 :
नंदा येवले, नीता ठाकरे, पिंटू झलके, किरण दातीर
प्रभाग 29 :
लीलाताई हाथीवेड, योगेश मडावी, अजय बोडारे
प्रभाग 32 :
रितेश पांडे पाटील, रूपाली ठाकूर, रामभाऊ कुंभलकर, गुणप्रिया शेंडे
प्रभाग 35 :
संदीप गवई, विशाखा मोहोड, रमेश भंडारी, पूजा भुगावकर
प्रभाग 36 :
अमोल शमकुले, ईश्वर ढेंगले, शिवानी दाणी, माया हाडे
प्रभाग 37 :
संजय उगले, निधी तेलगोटे, दिलीप दिवे, अश्विनी जिचकर
प्रभाग 38 :
माहेश्वरी मिताराम पटले, आनंद नितनवारे, प्रतिभा विनोद राऊत
तिकीट वाटपावरून भाजपमध्ये असंतोष-
तिकीट वाटपावरून भाजपच्या अंतर्गत वर्तुळात नाराजीचे सूर तीव्र झाले आहेत. अनेक प्रभागांमध्ये तिकीट नाकारण्यात आल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून, काही नाराज नेत्यांनी काँग्रेसशी संपर्क साधल्याचीही चर्चा आहे.
प्रभाग क्रमांक १७, ३६ आणि ३८ मध्ये उमेदवारी न मिळाल्याने उघड विरोध सुरू झाला आहे. प्रभाग १७ मध्ये माजी नगरसेवक विजय चुटुले यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्याच्या निर्णयाविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. ‘संघर्ष करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलल्यास निवडणुकीत पक्षासाठी काम करणार नाही,’ असा इशाराही देण्यात आला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आमदार संदीप जोशी यांना घटनास्थळी जावे लागले.
दरम्यान, प्रभाग ३८ मध्येही बाहेरील उमेदवारांना प्राधान्य दिल्याच्या आरोपांमुळे असंतोष कायम असून, भाजपसमोरील अंतर्गत आव्हाने अधिक तीव्र होत असल्याचे चित्र दिसत आहे.








