नागपूरकरांनी विक्रमी मतदान करावे; वेद कौन्सिलचे आवाहन
नागपूर - लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग अत्यावश्यक असल्याचे सांगत विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट (वेद) कौन्सिलच्या अध्यक्षा रिना सिन्हा यांनी नागपूरकरांना मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडण्याचे आवाहन केले. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी वेद...
फडणवीस सरकारचा जीआर; ठाकरे गट–काँग्रेसच्या ४ आमदारांना मंत्रिपदाचा दर्जा
मुंबई- महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात महत्त्वाचा निर्णय घेत फडणवीस सरकारने एका शासन निर्णयाद्वारे (जीआर) विधानसभा व विधानपरिषदेत पक्षांचे मुख्य प्रतोद आणि प्रतोद असलेल्या आमदारांना कॅबिनेट व राज्यमंत्रिपदाचा दर्जा प्रदान केला आहे. या निर्णयामुळे ठाकरे गट आणि काँग्रेसच्या ४ आमदारांसह सत्ताधारी पक्षातील...
ठाकरेंच्या युतीचा सर्वाधिक फटका राज ठाकरेंनाच; देवेंद्र फडणवीसांची राजकीय भविष्यवाणी
मुंबई -राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असल्याने सर्वच पक्षांचे स्टार प्रचारक मैदानात उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या...
नागपूर पोलिसांचा सुरक्षा संदेश: ‘नायलॉन मांजा नाही, सुरक्षितता महत्त्वाची!
नागपूर —संक्रांतीच्या सणानिमित्त शहरात पतंगोत्सवाची तयारी जोरात सुरू असताना, दरवर्षी नायलॉन मांजामुळे होणाऱ्या गंभीर अपघातांची दखल घेत नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाने कडक मोहिमेला सुरुवात केली आहे. नायलॉन मांजा दुचाकीस्वार, सायकलस्वार तसेच पादचाऱ्यांसाठी प्राणघातक ठरत असून, अनेक प्राणी व पक्ष्यांनाही त्याची...
भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध; विदेशी दूतावास, मेट्रो फेज-३, झिरो कार्बन फुटप्रिंट शहराचे आश्वासन
नागपूर -: नागपूर महानगरपालिका निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपला जाहीरनामा आज प्रसिद्ध केला. काँग्रेसने जाहीरनाम्यात मोफत पाणी आणि मोफत बससेवेवर भर दिल्यानंतर, भाजपाने मात्र ‘मोफत’ योजनांपेक्षा विकासकेंद्री धोरणावर भर देत नागपूरला देशातील अव्वल महानगर बनवण्याचा संकल्प व्यक्त...
जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांना पुन्हा मुदतवाढ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
नवी दिल्ली - राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेसाठी अधिक वेळ देण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. आज (दि. १२) सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत आयोगाची मागणी मान्य...
नागपूर मनपा सार्वत्रिक निवडणूक; मतदान व मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज!
नागपूर- नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर मतदान व मतमोजणीची तयारी पूर्ण झाल्याची माहिती आज (१२ जानेवारी २०२६) आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. शहरातील ३८ प्रभागांमध्ये होणाऱ्या या निवडणुकीसाठी प्रशासनाने व्यापक नियोजन केले असून सुरक्षित, पारदर्शक आणि सुरळीत मतदान...
छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्याचाच महापौर होईल; नागपुरात खासदार मनोज तिवारींचा दावा
नागपूर- नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला चांगलीच रंगत आली असून, भाजपाचे स्टार प्रचारक, प्रसिद्ध भोजपुरी अभिनेते व खासदार मनोज तिवारी तसेच माजी गृह राज्यमंत्री व भाजप नेते कृपाशंकर सिंग यांच्या उपस्थितीत शहरात झालेल्या जाहीर सभांनी...
नागपुरात नायलॉन मांजाविक्रेत्यांवर कडक कारवाई; १ कोटींचा साठा जप्त, १२८ जणांना अटक
नागपूर: मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहर पोलिसांनी प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री व साठा करणाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत मोठी कारवाई केली आहे. गेल्या वर्षभरात शहरात विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमांमध्ये तब्बल १ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा नायलॉन मांजाचा साठा जप्त करण्यात...
जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांचा धुरळा उडणार; आचारसंहिता दोन दिवसांत लागू होण्याची शक्यता!
नागपूर - राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने हालचालींना वेग दिला आहे. निवडणुकांची पूर्वतयारी तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देत आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत. यासंदर्भातील पत्र आज (ता. ११)...
नागपुरात घरफोडीचा पर्दाफाश, दोन चोरट्यांना अटक, ८.५२ लाखांचे मुद्देमाल जप्त!
नागपूर - शहरातील सक्करदरा भागात चंद्रकांत आंबुळकर यांच्या घरातून १५ ते १७ डिसेंबर दरम्यान चोरट्यांनी मोठ्या प्रमाणावर सोनं-चांदी, महागडे मोबाईल आणि दुचाकी चोरी केली. घरफोडी विरोधी पथक आणि गुन्हे शाखेच्या सखोल तपासातून अमोल चाफेकर आणि मोहम्मद अन्सारी या दोघांना अटक...
नागपुरात विकासाची गती वाढविण्यासाठी भाजपाला साथ द्या;केंद्रीय मंत्री गडकरींचे आवाहन
नागपूर - शहरातील प्रत्येकाला सर्वोत्तम नगरी सुविधा मिळाव्यात, नागपूरचा सुखांक मोठा व्हावा हीच माझी इच्छा आहे. स्थिर नेतृत्व, पारदर्शक कारभार आणि विकासाची गती कायम ठेवायची असेल तर येणाऱ्या नागपूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपा–शिवसेना महायुतीला मत द्या, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक...
महायुतीत वादंग;मुंबईत भाजप कार्यकर्त्यांकडून शिंदे गटाला ‘५० खोके एकदम ओके’च्या घोषणा!
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदे यांना महत्त्वाचा मित्रपक्ष मानत “आम्हाला त्यांना नाराज करायचे नाही” असे स्पष्ट केले होते. मात्र, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या युतीत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे दर्शन घडले आहे. मुंबईतील वॉर्ड क्रमांक...
लाडक्या बहिणींवर संकट; पात्र असूनही अनेक महिलांचे अनुदान बंद, योजनेत मोठा गोंधळ उघड!
मुंबई : अडीच लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दरमहा १५०० रुपयांचा थेट लाभ मिळत असल्याने ही योजना महिला वर्गात प्रचंड लोकप्रिय ठरली...
राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला हृदयविकाराचा झटका; गुलाबराव गावंडेंवर नागपूरमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया
नागपूर : ऐन निवडणुकीच्या धामधुमीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) साठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्याचे माजी क्रीडा राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ, वादळी नेते गुलाबराव गावंडे यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यावर नागपूरमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या...
नागपुरातील सावनेर येथे रेती घोटाळ्यासंदर्भात शिवसेना (उबाठा) जिल्हाध्यक्षाच्या घरी ईडीची छापेमारी!
नागपूर – आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर विदर्भात वर्षानुवर्षे खुलेआम सुरू असलेल्या रेत माफियांच्या साम्राज्यावर अखेर प्रवर्तन निदेशालयाने (ED) जोरदार घाव घातला आहे. सावनेर रेत घोटाळ्याप्रकरणी ईडीने शुक्रवारी नागपूर जिल्ह्यात एकाचवेळी ५६ ठिकाणी धडक कारवाई करत राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणेला...
‘या’ प्रभागातील निवडणुकीला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती; मतदानाबाबत संभ्रम!
मुंबई- महानगरपालिकेतील वॉर्ड क्रमांक १७ अ (वाशी) येथील होऊ घातलेल्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. गुरुवारी (८ जानेवारी २०२६) न्यायालयाने या प्रभागातील निवडणूक प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देत भाजप उमेदवाराचा नामनिर्देशन अर्ज रद्द करण्याच्या निवडणूक अधिकाऱ्याच्या निर्णयावरही...
नागपुरात प्रेमसंबंधाच्या संशयातून थरारक हल्ला, अल्पवयीन मुलगी व भावावर चाकूने जीवघेणा वार
नागपूर- शहरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधाच्या संशयातून यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलगी आणि तिच्या भावावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत....
विश्वास ठेवायचा तरी कुणावर? काँग्रेसला मोठा धक्का; १२ नगरसेवकांचा थेट भाजपमध्ये प्रवेश!
मुंबई - राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना सर्वच राजकीय पक्ष ताकद पणाला लावत आहेत. महापालिकांवर वर्चस्व मिळवण्यासाठी आघाड्या, युती, उमेदवारांची पळवापळवी अशा घडामोडींना वेग आला आहे. अशाच पार्श्वभूमीवर अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठा राजकीय झटका बसला असून, नुकतेच निवडून आलेले...
नागपूर मनपा निवडणूक: प्रभाग क्रमांक १ – जाणून घ्या तुमच्या प्रभागाबद्दल!
नागपूर :नागपूर शहराच्या अधिकृत भौगोलिक हद्दीची सुरुवात ज्या प्रभागातून होते, तो प्रभाग क्रमांक १ पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. तब्बल नऊ वर्षांनंतर १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रभागात राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला...
मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या १०० टक्के शुल्कमाफीचा शासन निर्णय कागदावरच; अंमलबजावणी शून्य!
नागपूर : राज्य सरकारने ८ जुलै २०२४ रोजी EWS, OBC, SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक व तांत्रिक शिक्षणासाठी १०० टक्के शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क माफी देण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR क्र. 2024/प्र.क्र.705/प्रशि-4) जारी केला. मात्र, या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी...





