नागपूर ग्रामीणमध्ये कळमेश्वर पोलिसांची कारवाई; अवैध दारू साठा जप्त,विक्रेत्याला अटक!
नागपूर : कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे गुरुवारी (२ ऑक्टोबर) कोहळी गावात छापा टाकून मोठ्या प्रमाणात अवैध दारू जप्त केली. या कारवाईत १६ हजार ४९० रुपयांचा दारू साठा हस्तगत करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. माहितीनुसार, भाग्यश्री सुपर बाजारासमोरील त्रिवेणी...
नागपूरसह ‘या’ २१ जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज; यलो अलर्ट जाहीर!
मुंबई : राज्यात काही दिवसांपासून पावसाची विश्रांती होती. मात्र, हवामानाने पुन्हा एकदा करवट घेतली आहे. २ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या सरींनंतर, उद्या ३ ऑक्टोबर रोजी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या परिस्थितीचा विचार करून २१...
नागपुरात एक्स गर्लफ्रेंडचा फोटो पोर्न साईटवर टाकल्याप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल!
नागपुरात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी सज्ज; लाखो अनुयायी येणार,1200 पोलिसांचा चोख बंदोबस्त!
नागपूर : नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर ६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या औचित्याने यंदा विक्रमी गर्दी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरवर्षी साधारण पाच ते सहा लाख बौद्ध अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येथे दाखल होतात. मात्र, यंदा हा आकडा आठ...लाडकी बहीण योजनेत नवीन नियम; पती/वडिलांची e-KYC आता बंधनकारक !
मुंबई: महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी महत्त्वाचा नवीन नियम लागू केला आहे. योजनेच्या आर्थिक भारात वाढ आणि बोगस लाभार्थी ओळखण्यासाठी राज्य सरकारने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या नियमांनुसार आता लाभार्थी महिलेसोबत तिच्या पती किंवा वडिलांची e-KYC करणे अनिवार्य केले गेले...
नागपुरात दसऱ्याच्या दिवशी मेट्रो सेवा मध्यरात्रीपर्यंत राहणार सुरू!
नागपूर: दसऱ्याच्या (२ ऑक्टोबर) निमित्ताने नागपूर मेट्रो सेवांना विशेष वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या दिवशी मेट्रो सकाळी ५ वाजल्यापासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत चालेल, जेणेकरून शहरातील विविध ठिकाणी भेट देणाऱ्या नागरिकांना प्रवासात सोय होईल. मेट्रो अधिकाऱ्यांच्या मते, या वाढीव वेळामुळे विशेषतः दीक्षाभूमी आणि कस्तूरचंद पार्क येथे गर्दी असलेल्या...
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा
मुंबई : यंदाच्या सततच्या अतिवृष्टीमुळे राज्यात तब्बल ६० लाख हेक्टर क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज शासनाने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत जाहीर केले की, “दिवाळीपूर्वी मदतीचा प्रत्येक रुपया थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. पुढील आठवड्यात याबाबत...भाजपच्या दिग्गज नेत्याला मिळाला मंत्रिपदसमान दर्जा; फडणवीसांकडून मोठा अधिकार!
नागपूर: राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयं/समूह पुनर्विकासासाठी स्थापन केलेल्या नव्या स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबरोबरच त्यांना मंत्रिपदाचा दर्जाही देण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशातून स्पष्ट करण्यात आले आहे. शासन निर्णयातील प्रमुख तरतुदी खालीलप्रमाणे आहेत:
-
...
मी कधीही कंत्राटदारांकडून पैशांचा व्यवहार केला नाही;गडकरींची भ्रष्टाचारावर ठाम भूमिका
नागपूर : इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या मुद्यावरून वाद पेटले असतानाच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र, काही दिवसांपासून सुरू असलेल्या या आरोपांच्या पार्श्वभूमीवर अखेर गडकरींनी मौन तोडले. एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, "मी आजवर...
शेतकऱ्यांना वेळप्रसंगी मिळेल सर्वोच्च मदत;महसूल मंत्री बावनकुळे यांचे आश्वासन
खैरलांजी हत्याकांडाची धग आजही जिवंत; सामाजिक कार्यकर्ते बागडे यांचे विधान
नागपूर : खैरलांजी हत्याकांडाला वीस वर्षांचा कालावधी उलटूनही त्या अत्याचाराची धग समाजाच्या मनामनात आजही खदखदत आहे. “इतका मोठा अन्याय का घडला, याचा शोध नव्या पिढीला घ्यावा लागत आहे. या घटनेचे दुःख समाजाच्या हृदयात कायम जिवंत आहे,” असे मत सामाजिक कार्यकर्ते नारायण बागडे...मध्य नागपूरमध्ये आमदार संकल्पनेतून महिलांसाठी रास गरबा
नागपूर: मध्य नागपूरचे लोकप्रिय आमदार मा. प्रवीणजी दटके यांच्या संकल्पनेतून आमदार सांस्कृतीक महोत्सव समिती व महिला जागृती जनकल्याण बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने २५ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत संध्याकाळी ७ ते १० दरम्यान महिलांसाठी खास रास गरबा...
नागपुरात ‘धम्म चक्र प्रवर्तन दिन’ साजरा करण्यासाठी विशेष रेल्वे सेवा!
नागपूर: २ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमीवर धम्म चक्र प्रवर्तन दिन साजरा होणार असून, मोठ्या संख्येने भाविकांचा ये-जा होण्याची शक्यता आहे. यासाठी सेंट्रल रेल्वे, नागपूर विभागने महाराष्ट्रातील प्रमुख शहरांना जोडणाऱ्या अनेक विशेष रेल्वे सेवा सुरु केल्या आहेत. सर्व विशेष गाड्यांमध्ये १६ सामान्य डबे आणि २ सामान व गार्डसाठी...
जागतिक अल्झायमर दिनानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न
नागपूर: २१ सप्टेंबर, जागतिक अल्झायमर दिनानिमित्त भाऊसाहेब मूळक आयुर्वेद महाविद्यालय, नंदनवन आणि ‘विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघटना’ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम २६ सप्टेंबर रोजी पार पडला. कार्यक्रमाला मान्यवर पाहुणे म्हणून विरंगुळा केंद्राचे अध्यक्ष वसंतराव...
नागपूर विभाग पदवीधर मतदार संघासाठी नवी मतदार यादी प्रक्रियेला सुरुवात
नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाचे सदस्य श्री. अभिजित गोंविदराव पंजारी यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ रोजी पूर्ण होत आहे. यानिमित्ताने भारत निवडणूक आयोगाने दिनांक १ नोव्हेंबर २०२५ हा अर्हता दिनांक निश्चित करून नव्याने मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम...कोराडी मंदिरात ५५२१ अखंड ज्योत;माता जगदंबेच्या दर्शनासाठी लाखों भक्तांची उसळी गर्दी !
नागपूर : नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वावर नागपूरजवळील कोराडी येथील देवी मंदिरात भक्तीचा महासागर उसळला. माता जगदंबेच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच विदेशातून आलेल्या हजारो भाविकांनी हजेरी लावली. विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे मंदिर परिसरात प्रज्वलित केलेल्या तब्बल ५५२१ अखंड ज्योतींनी उजळलेले अद्वितीय दृश्य.
भक्तांच्या आस्थेचा...
कळमेश्वर परिसरात साडेतीन हजार हेक्टर पिकांचे नुकसान; पंचनाम्यांना गती
नागपूर : कळमेश्वर तालुक्यातील तेलकामठी व धापेवाडा मंडळातील अनेक गावांवर २६ सप्टेंबर रोजी वादळी वारे व मुसळधार पावसाने हल्ला चढवला. या नैसर्गिक आपत्तीमुळे तिडंगी, तिष्टी (खु), तिष्टी (बु), तेलगाव, दाढेरा आणि मांडवी गावातील शेतजमिनी व संत्र्यांच्या बागांवर मोठ्या प्रमाणावर हानी...
भारताचा एशिया कप 2025 वर कब्जा, पाकिस्तानला 5 विकेट्सनी केले पराभूत!
- दुबईत झालेल्या एशिया कप 2025 च्या रोमांचक अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला 5 विकेट्सनी पराभूत करत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत भारताने एकही सामना गमावला नाही, तसेच पाकिस्तानविरुद्ध सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 146 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 150...
लंडनच्या रॉयल ऑर्केस्ट्राकडून संघ प्रार्थना सादर; नागपुरात विशेष ध्वनिमुद्रिका प्रकाशित
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) शनिवारी नागपुरात एक ऐतिहासिक पाऊल उचलले. संघाच्या दैनंदिन ‘प्रार्थना’चे लंडनमधील जागतिक ख्यातीच्या रॉयल फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्राकडून संगीतबद्ध विशेष ध्वनिमुद्रण सार्वजनिक करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन डॉ. रेशमबाग येथील हेडगेवार स्मृती भवनात करण्यात आले होते. या प्रसंगी...
नागपुरातील नंदनवन येथील गेमिंग कॅफेत मोठी चोरी; ३ लाखांचा इलेक्ट्रॉनिक माल लंपास
नागपूर : नागपूरच्या नंदनवन परिसरात एका गेमिंग कॅफेत मोठी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. नेहरू नगर भागातील या दुकानातून अज्ञात चोरट्याने तब्बल ३ लाखांचा इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही...
अजित पवारांची मोठी घोषणा;पूरग्रस्तांना तातडीची आर्थिक मदत जाहीर
पुणे – महाराष्ट्रातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने शेतकरी तसेच सामान्य नागरिक अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी...