नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला असून, भारतीय जनता पक्षाने (भाजप) शहराच्या राजकारणावर आपली पकड अधिक घट्ट केली आहे. एकूण १५१ जागांपैकी ११२ जागांवर भाजपने विजय मिळवत महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवले आहे.
काँग्रेसला २८, शिवसेना (शिंदे गट) २, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) २, राष्ट्रवादी (अजित पवार गट) १, तर अन्य पक्ष व अपक्षांना ६ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला एकही जागा मिळालेली नाही.
क्रमांक १ : धंतोली झोन
प्रभाग १७
अ : सुजाता कुंबाडे (काँग्रेस)
ब : सुहास नानवटकर (काँग्रेस)
क : कांचन चव्हाण (काँग्रेस)
ड : मनोज साबळे (भाजप)
प्रभाग ३३
अ : अंकित चौधरी (भाजप)
ब : मनोज गावंडे (काँग्रेस)
क : शीला तराळे (काँग्रेस)
ड : भारती बुंदे (भाजप)
प्रभाग ३५
अ : संदीप गवई (भाजप)
ब : पूजा भुगावकर (भाजप)
क : विशाखा मोहोड (भाजप)
ड : रमेश भंडारी (भाजप)
– प्रभाग ३५ मध्ये भाजपचा पूर्ण क्लीन स्वीप.
क्रमांक २ : लक्ष्मीनगर झोन
प्रभाग १६
– चारही जागांवर भाजप
लखन येरावार, तारा यादव, वर्षा चौधरी, सुनील दांडेकर
प्रभाग ३६
– चारही जागांवर भाजप
अमोल शामकुळे, माया हाडे, शिवानी दाणी, ईश्वर ढेंगळे
प्रभाग ३७
-चारही जागांवर भाजप
निधी तेलगोटे, संजय उगले, अश्विनी जिचकार, दिलीप दिवे
प्रभाग ३८
शैलेंद्र डोरले (काँग्रेस)
कुमुदिनी गुडधे (काँग्रेस)
माहेश्वरी पटले (भाजप)
क्रमांक ३ : इतर महत्त्वाचे प्रभाग
प्रभाग २६
अ : शुभम मोटघरे (काँग्रेस)
ब : सीमा ढोमणे (भाजप)
क : शारदा बारई (भाजप)
ड : बंटी कुकडे (भाजप)
प्रभाग २७
– चारही जागांवर भाजप
प्रवीण ऊर्फ पिंटू गिर्हे, रजनी वानखेडे, दिव्या धुरडे, अॅड. निलेश गायधने
प्रभाग २८
अ : पिंटू झलके (भाजप)
ब : मंगला गवरे (शिवसेना उबाठा)
क : नीता ठाकरे (भाजप)
ड : किशोर कुमेरिया (शिवसेना उबाठा)
प्रभाग ३०
– AIMIM – ३, काँग्रेस – १
वर्षा डोंगरे (AIMIM), संजय महाकाळकर (काँग्रेस), तसलीमा परवीन (AIMIM), शकील पटेल (AIMIM)
क्रमांक ४ : आसी नगर झोन
प्रभाग २
– चारही जागांवर काँग्रेसचा विजय
भावना लोणारे, दिनेश यादव, संगीता पाटील, मनीष बनसोड
प्रभाग ३
AIMIM – ३ | भाजप – १
प्रभाग ६
-चारही जागांवर मुस्लिम लीगचा विजय
प्रभाग ७
काँग्रेस – २ | बसपा – २
राजकीय विश्लेषण-
क्रमवार निकाल पाहता नागपूर शहरातील बहुतेक झोनमध्ये भाजपचे वर्चस्व ठळकपणे दिसून येते. संघटनात्मक ताकद, नेतृत्वावरचा विश्वास आणि शहरी मतदारांचा पाठिंबा यामुळे भाजपने एकतर्फी विजय मिळवला आहे.
महानगरपालिकेतील महापौर पद, स्थायी समिती आणि शहराच्या कारभारावर भाजपचा निर्विवाद अंकुश राहणार, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे.









