नागपूर – नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात प्रभाग क्रमांक ३८ मधून काँग्रेसच्या उमेदवार कुमुदिनी प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याचा सुमारे २,३०० मतांनी पराभव करत प्रभाग ३८ मध्ये काँग्रेसचा झेंडा फडकावला आहे.
मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच कुमुदिनी गुडधे पाटील यांनी आघाडी घेतली होती. अंतिम फेरीअंती त्यांचा विजय स्पष्ट झाला. या विजयामुळे प्रभाग ३८ मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, समर्थकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.
प्रभागातील स्थानिक प्रश्न, नागरिकांशी थेट संपर्क आणि विकासावर भर देणारा प्रचार हा त्यांच्या विजयामागचा प्रमुख घटक मानला जात आहे. या निकालामुळे नागपूर महानगरपालिकेतील राजकीय समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
Advertisement









