मुंबई :महाराष्ट्रातील सर्व २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजप–शिवसेना महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे तसेच समस्त पक्ष कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
या निवडणूक निकालांमधून राज्यातील जनतेने विकासाला प्राधान्य देत भाजप–महायुतीवर विश्वास व्यक्त केला असल्याचे गडकरी यांनी नमूद केले. विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करणाऱ्या महायुती सरकारला या विजयामुळे आणखी गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात प्रगत व समृद्ध महाराष्ट्राच्या दिशेने सुरू असलेल्या प्रवासाला या यशामुळे नवे बळ मिळेल, असेही गडकरी यांनी आपल्या संदेशात स्पष्ट केले.









