चक्रीवादळ ‘डिट्वा’चा परिणाम; राज्यात थंडीचा कडाका वाढला,नागपूरसह विदर्भात पावसाचा इशारा
मुंबई – श्रीलंकेच्या दिशेने तयार होत असलेल्या चक्रीवादळ ‘डिट्वा’चा परिणाम आता महाराष्ट्रातही जाणवू लागला असून, राज्यातील हवामानात मोठे बदल दिसून येत आहेत. नागपूरसह विदर्भात गेल्या काही दिवसांपासून थंडीची तीव्रता वाढली आहे, तर हवामान खात्याने काही जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. हवामान...
गोंदिया जिल्ह्यात दुर्दैवी घटना; बिबट्याच्या हल्ल्यात ९ वर्षीय बालिकेचा मृत्यू
गोंदिया : तिरोडा तालुक्यातील इंदोरा-निमगाव परिसरात शनिवारी घडलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत मुलीचे नाव रुची देवानंद पारधी (वय ९) असे असून ती आपल्या वडिलांसोबत शेतात गेली असताना हा हल्ला झाला. मिळालेल्या...
मानकापुरमध्ये व्यावसायिकाचे बंद घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल
नागपूर : मानकापुर परिसरातील सद्भावना नगर, गोधनी रोड येथील प्लॉट क्रमांक ५३ वर असलेल्या बंद घरात अज्ञात चोरांनी धाड घालत तब्बल १२.८५ लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी २८ नोव्हेंबरच्या रात्री ८ ते २९ नोव्हेंबरच्या सकाळी...
नगरपंचायत-नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार थंडावणार; उद्या लाखो मतदार ठरवणार ग्रामीण महाराष्ट्राचा कारभार!
नागपूर : राज्यातील २७६ नगरपंचायती आणि २५ नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा प्रचार आज संध्याकाळी पाच वाजता अधिकृतपणे संपला. पंधरा दिवसांपासून तालुका-तालुक्यांत चाललेल्या प्रचारजंगी वातावरणाला आज तात्पुरती ब्रेक लागली. मागील दोन आठवड्यांपासून रस्त्यांवर झळकणारे बॅनर-फलक, भोंग्यांची कर्णकर्कश गर्जना आणि स्थानिक नेत्यांचे धडाकेबाज...
नागपुरातील पहिल्या पुस्तक महोत्सवाला अभूतपूर्व प्रतिसाद; साडेपाच लाखांहून अधिक नागरिकांची उपस्थिती
नागपूर- नॅशनल बुक ट्रस्ट (एनबीटी) इंडिया, महाराष्ट्र शासन आणि झिरो माईल यूथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रेशीमबाग मैदानावर भरविण्यात आलेल्या ‘नागपूर पुस्तक महोत्सव 2025’ ला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत इतिहास रचला. अवघ्या नऊ दिवसांत साडेपाच लाखांपेक्षा अधिक वाचकांनी महोत्सवाला...
ऑपरेशन थंडर: नागपूर पोलिसांची धडक कारवाई, एम.डी. ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड
नागपूर: नागपूर शहर पोलिसांनी एम.डी. ड्रग्जचा रॅकेट उखडून टाकत ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत जोरदार कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वी ठरली असून, तीन आरोपींना ताब्यात घेतले गेले आहेत. कपिलनगर परिसरातील कामगार नगर...
कामठीत राष्ट्रवादीच्या उमेदवारावर तरुणाचा नोटांचा वर्षाव; निवडणूक आयोग कारवाई करणार का?
नागपूर – कामठी शहरातील प्रचारसभेत घडलेल्या एका विचित्र घटनेमुळे निवडणुकीचे राजकारण अचानक चांगलेच गाजू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार शाहजहाँ शफावत अन्सारी यांच्या सभेत एका तरुणाने मंचावर जाऊन त्यांच्या अंगावर थेट नोटांचा वर्षाव केला. हा संपूर्ण प्रकार व्हिडिओमध्ये कैद...
शब्दसृष्टीचे शिल्पकार म्हणजे लेखक, त्यांना मनःपूर्वक वंदन; डॉ. मोहन भागवत
नागपूर – लेखन ही केवळ कला नसून समाजाला दिशा देणारी शक्ती आहे. शब्दांचा अयोग्य वापर झाला तर परिणामही प्रतिकूल होतात. त्यामुळे मानवकल्याण हेच साहित्याचे ध्येय असावे,” अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी साहित्यनिर्मात्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. रेशीमबाग...
‘ऑपरेशन थंडर’अंतर्गत नागपूर पोलिसांची कारवाई; मुंबईहून आणलेल्या एमडीसह तीन जणांना अटक
नागपूर – शहरातील अंमली पदार्थांच्या जाळ्यावर निर्णायक घाव घालत क्राइम ब्रांचच्या एनडीपीएस युनिटने ‘ऑपरेशन थंडर’ मोहिमेत आणखी एक मोठा यश मिळवला आहे. मुंबईहून एमडी ड्रग्सची खेप घेऊन नागपूरात प्रवेश करणाऱ्या तस्करांना पोलिसांनी रात्री उशिरा सापळ्यात पकडले. या छाप्यात तीन आरोपी...
नागपुरात CBI चौकशीच्या आदेशानंतर निर्मल उज्ज्वल सोसायटीत खळबळ; ७ दिवसांत ७० कोटी रुपये लोकांनी काढले!
नागपूर – निर्मल उज्ज्वल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीतील आर्थिक अनियमिततेच्या आरोपांवर बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने CBI चौकशीचे आदेश दिल्यानंतर संपूर्ण सोसायटीत तुफानी हलकल्लोळ निर्माण झाला आहे. आदेशांची बातमी समोर येताच सदस्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अवघ्या एका आठवड्यात ७० कोटी रुपयांपेक्षा...
गंगा–जमुना भागात पोलिसांचा छापा;राजस्थानातील नाबालिकेची सुटका
नागपूर - शहरातील कुप्रसिद्ध गंगा–जमुना परिसरात लकडगंज पोलिसांनी मध्यरात्री केलेल्या धडक कारवाईत नाबालिग मुलीला देहव्यापाराच्या जाळ्यात अडकविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी पीडितेची सुटका करत दोन महिलांसह चार जणांविरोधात गुन्हा नोंदवला असून एकाला घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले आहे. सर्व आरोपींना...
मेयो रुग्णालयातील एचओडीवर छेडछाडसह मानसिक छळाचा गंभीर आरोप; गुन्हा दाखल, डॉक्टरांमध्ये संताप!
नागपूर – इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथील एका वरिष्ठ विभागप्रमुखावर महिला रेसिडेंट डॉक्टरने छेडछाड आणि सातत्याने मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. पीडितेकडून तक्रार मिळताच तहसील पोलिसांनी संबंधित एचओडीविरोधात गुन्हा नोंदवला असून, घटनेनंतर रुग्णालयात तणावाचे...
नगरपंचायत निवडणुका २०२५ : मतदान वाढवण्यासाठी २ डिसेंबरला राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर
नागपूर - राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. प्रचाराने तापलेल्या वातावरणात राज्य निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचा निर्णय घेत सार्वजनिक सुट्टीची घोषणा केली आहे. आगामी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदानाचा दिवस असल्याने सर्वांना मताधिकाराचा वापर सुलभ व्हावा...
भविष्यात शिक्षणाचे व्यापारीकरण थांबेल; ‘सुपर ३०’चे जनक पद्मश्री आनंद कुमार यांचे विधान
नागपूर: आपल्याकडे शिक्षणाचे व्यापारीकरण फार पूर्वीपासून झाले आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना रट्टूपोपट बनविल्या जात आहे. विद्यार्थी अधिकाधिक गुण मिळविण्याच्या मागे धावत आहे. पण, ही परिस्थिती बदलणार असून येत्या पंधरा वर्षांत कोचिंग क्लासेसचे हे व्यापारीकरण थांबून जाईल, असे मत...
महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून राजेश अग्रवाल यांची नियुक्ती!
मंबई - महाराष्ट्राच्या प्रशासकीय पातळीवर मोठा बदल होत असून 1 डिसेंबरपासून राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून वरिष्ठ आयएएस अधिकारी राजेश अग्रवाल पदभार स्वीकारणार आहेत. सध्याचे मुख्य सचिव राजेश कुमार मीना 30 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत असून त्यांच्या जागी अग्रवाल यांची...
भाजप आमदार आशिष देशमुखांना सत्तेचा माज; विरोधकांना थेट ‘कापून काढू’ म्हणत दिली धमकी !
नागपूर – राज्यातील राजकीय वातावरण आता केवळ वादळाच्या कुशीत नाही, तर थेट गुंडराजाच्या सावटाखाली जात आहे, असे चित्र भाजपचे सावनेरचे आमदार आशिष देशमुख यांच्या ‘जास्त वळवळ केली तर कापून काढू’ अशा धमकीदार भाषणातून स्पष्ट होतेय. विरोधकांना ‘अर्धे कापले जाईल’ अशी...
ताडोब्यात वाघ–पर्यटक आमनेसामने; चंद्रपूर–मोहरली मार्गावर बछड्याने थांबवली वाहतूक
चंद्रपूर – ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरात वाघ आणि माणसं एकमेकांच्या अगदी जवळ येण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, त्यामुळे धोका अनेक पटींनी मोठा झाला आहे. पर्यटकांची अनावश्यक गर्दी, फोटो–व्हिडिओ काढण्याची धडपड आणि जंगलातील शांतता भंग केल्यामुळे आता वाघही रस्त्यावर येऊन वाहतूक...
मेयो रुग्णालयात महिला रेसिडेंट डॉक्टरची तक्रार; विभागप्रमुखावर छेडछाडसह धमक्यांचा आरोप
नागपूर – शहरातील प्रसिद्ध मेयो रुग्णालयात एका महिला रेसिडेंट डॉक्टरने विभागप्रमुखावर छेडछाड आणि मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप करत तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्रकरण समोर आल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय पीडित डॉक्टर...
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे ओबीसी आरक्षण अडकले; सरकार समाजाची दिशाभूल करत असल्याचा वडेट्टीवारांचा आरोप
नागपूर – राज्यातील ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ताज्या आदेशावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. महायुती सरकारने २७ टक्के ओबीसी आरक्षण देण्याचा मोठा दावा केला होता, मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे हा मुद्दा पुन्हा अनिश्चिततेत गेल्याचे...
समाजक्रांतीचा सूर्य: महात्मा जोतीराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
नागपूर - आज 28 नोव्हेंबर. भारतीय समाजसुधारणेच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा असा दिवस. 1890 मध्ये याच दिवशी समानता, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायासाठी आयुष्यभर अविरत लढा देणारे महात्मा जोतीराव गोविंदराव फुले अनंतात विलीन झाले. पण त्यांचे विचार आजही समाजाच्या प्रत्येक स्तरावर प्रकाश...
किस्से फिल्मी नगमों के’ 30 नोव्हेंबर रोजी सप्तक नागपूरचे आयोजन
नागपूर: सप्तक नागपूरतर्फे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सुधीर भावे यांची संकल्पना आणि प्रस्तुती असलेला अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम ‘किस्से फिल्मी नगमों के – भाग सात’ रविवार, 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम कवि कुलगुरू कालिदास सभागृह,...





