Published On : Wed, Jan 7th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील प्रभाग 26 मध्ये भाजप जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण

Advertisement

नागपूर– नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग 26 मधील कार्यालयाचे मंगळवारी, 6 जानेवारी 2026 रोजी लोकार्पण झाले. भाजपा विदर्भ संगठन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर व पूर्व नागपूरचे आमदार श्री कृष्णा खोपडे यांनी फीत कापून जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ केला.

यावेळी भारतीय जनता पार्टी महायुती चे प्रभाग 26 चे उमेदवार श्री. धर्मपाल मेश्राम, सौ. सीमाताई ढोमणे, सौ. शारदाताई बारई आणि श्री. जितेंद्र (बंटी) कुकडे प्रामुख्याने उपस्थित होते.

Gold Rate
13 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,41,000/-
Gold 22 KT ₹ 1,31,100 /-
Silver/Kg ₹ 2,64,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी भाजपा विदर्भ संगठन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी मार्गदर्शन करताना चारही उमेदवारांच्या विजयाचा निर्धार केला. मागील पाच वर्षात प्रभागात आणि संपूर्ण नागपूर शहरात चौफेर झालेला विकास हिच भाजपच्या कामाची पावती असून जनता पुन्हा एकदा या विकासाला गती देईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement