
नागपूर: महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई, नागपूर खंडपीठ येथील अभ्यागत कक्ष व नुतन प्रवेशद्वार सुविधेचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालायचे न्यायमूर्ती अनिल ए. किलोर व न्यायमूर्ती राज डी. वाकोडे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी न्यायाधिकरणाचे उपाध्यक्ष विनय जोशी व सदस्य (प्रशासकीय) नितीन गद्रे यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी न्यायमूर्ती अनिल एस. किलोर व न्यायमूर्ती राज डी.वाकोडे यांनी न्यायाधिकरणाच्या कार्यालयाची पाहणी केली. या ठिकाणी अशिलांच्या सुविधेसाठी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला विविध सूचना केल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जनार्दन भानूसे, कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत राऊळकर यांना त्यांनी विविध सुविधेबाबत निर्देश दिले.
यावेळी न्यायाधिकरणातील वकील संघाचे अध्यक्ष एन.डी. ठोंबरे, मा. उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथील वकील संघटनेचे अध्यक्ष अभय सांबरे व उपाध्यक्ष जी.एन.खानझोडे, न्यायाधिकरणाचे मुख्य सादरकर्ता अधिकारी श्रीकांत देव आदी मान्यवर उपस्थित होते. मा न्यायमूर्ती यांनी नूतनीकरणाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.








