Published On : Wed, Jan 7th, 2026
By Nagpur Today Nagpur News

पाचपावलीत कोंबीग कारवाईदरम्यान अवैध शस्त्रसाठा जप्त,एकाला अटक

Advertisement

नागपूर– महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात सुरू असलेल्या कोंबीग व पेट्रोलिंग कारवाईदरम्यान पाचपावली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने (डी.बी.) अवैध शस्त्रसाठा बाळगणाऱ्या एका इसमाला अटक केली आहे. आरोपीकडून प्राणघातक शस्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.

गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बापूकुटी नगर, सिंधी हिंदी शाळेजवळील आरोपीच्या राहत्या घरावर मंगळवारी रात्री ११.४० ते १२.२० या दरम्यान पंचासमक्ष झडती घेण्यात आली. या झडतीत ४ लोखंडी तलवारी, १ स्टीलची तलवार, १ अॅल्युमिनियम मूठ असलेली जुनी तलवार व १ लोखंडी मोठा चाकू, असा एकूण ८ प्राणघातक शस्त्रांचा साठा जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत ६ हजार रुपये आहे.

Gold Rate
Feb 25th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,60,800 /-
Gold 22 KT ₹ 1,49,500 /-
Silver/Kg ₹ 2,70,200 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या प्रकरणी कमलेश राजन तांबे (वय ४२, रा. बापूकुटी नगर, पाचपावली, नागपूर) यास अटक करण्यात आली आहे. शस्त्र बाळगण्यासाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे आरोपीने चौकशीत कबूल केल्यानंतर त्याच्याविरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ४ व २५ तसेच मुंबई पोलीस कायदा कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंघल, सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उत्तर प्रभाग अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाळे, पोलीस उपआयुक्त राहुल मदणे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त शिवप्रसाद पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सदर कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांच्यासह पाचपावली पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.

शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement