दहावीच्या परीक्षा वर्षातून दोनदा होणार; सीबीएसईचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने 2026 पासून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा घेण्याच्या निर्णयाला अधिकृत मान्यता दिली आहे. ही माहिती सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी आज दिली. नवीन प्रणालीनुसार, दहावीच्या परीक्षेचा पहिला टप्पा फेब्रुवारीमध्ये आणि...
नागपुरात क्राईम ब्रँचच्या वाहनचोरी विरोधी पथकाची कारवाई; एकाला अटक,तीन गुन्ह्यांचा उलगडा
नागपूर: नागपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या वाहनचोरी विरोधी पथकाने एक मोठी कारवाई करत गुप्त माहितीच्या आधारे एका सिरीयल चोरट्याला अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून चोरलेली दुचाकी, रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल...
देशात गेल्या ११ वर्षांपासून अघोषित आणीबाणी सुरूच; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर घणाघात
नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल करत दावा केला की, गेल्या ११ वर्षांपासून देशात अघोषित आणीबाणी लागू आहे. भाजपने आणीबाणीच्या पन्नास वर्षांच्या निमित्ताने काँग्रेसवर टीकेची झोड उठवली असली, तरी खरगेंनी पत्रकार परिषद घेत भाजपच्या भूमिकेवर...
शालार्थ आयडी घोटाळा अंतिम टप्प्यात; चौकशी अहवालातून लवकरच मोठा खुलासा होण्याची शक्यता
नागपूर :राज्यात गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार नियुक्त करण्यात आलेल्या राज्यस्तरीय चौकशी समितीचा अहवाल अंतिम तयारीच्या अवस्थेत असून, लवकरच या प्रकरणातील अनेक मुखवटे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर...
व्याघ्र प्रकल्पांमध्ये सफारीला ब्रेक;पावसाळ्यामुळे १ जुलैपासून जंगल सफारीस स्थगिती
xr:d:DAFyPXockfA:24,j:9023368957319006120,t:23102510 नागपूर :पावसाळ्याच्या हंगामात वन्यप्राण्यांचा प्रजनन काल लक्षात घेता व त्यांच्या हालचालींना अडथळा होऊ नये म्हणून, राज्यातील काही व्याघ्र प्रकल्पांमधील जंगल सफारी सेवा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याकडून देण्यात आलेल्या निर्देशांनुसार, पेंच व्याघ्र...
चांदीच्या ताटात ‘जनतेचा कर’; आमदार-खासदारांच्या एका जेवणासाठी तब्बल ४५०० रुपयांचा खर्च
मुंबई : सध्या देशात कुपोषण, महागाई आणि वाढत्या करभारामुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे अधिक कठीण झाले असताना, लोकप्रतिनिधींच्या एका शाही जेवणावर सरकारी तिजोरीतून हजारोंचा खर्च केल्याचे उघडकीस आले आहे. मुंबईत नुकतीच संसद व राज्य विधीमंडळाच्या अंदाज समितीच्या सदस्यांसाठी दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद...
Axiom-4 मिशन लॉन्च: शुभांशू शुक्लाची अवकाश भरारी; भारताचा गौरव
मुंबई : आजचा दिवस भारताच्या अंतराळ इतिहासात एक सुवर्णक्षण ठरला आहे, कारण भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी अमेरिकेच्या स्पेसएक्स आणि अॅक्सिओम स्पेस यांच्या Axiom-4 (Ax-4) मोहिमेअंतर्गत अंतराळात झेप घेतली आहे. या मोहिमेने भारताला नवा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे,...
गुजरातसह इतर राज्यांत हिंदी सक्ती नाही, मग महाराष्ट्रातच का? वडेट्टीवारांचा सवाल
नागपूर : राज्यात शालेय शिक्षणात हिंदी सक्तीच्या निर्णयावरून वाद पेटला असून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधानपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “गुजरातसह अन्य राज्यांत हिंदीची सक्ती नाही, मग महाराष्ट्रातच का? हा...
नागपूर दंगली प्रकरणातील आरोपींना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
नागपूर : नागपूर दंगलीप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींना आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणातील अनेक जामीन अर्जांवर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. या प्रकरणातील आरोपींचे प्रतिनिधित्व अॅड. आसिफ कुरेशी, अॅड. शिर्रंग भंडारकर, अॅड. रफिक...
नागपूर पोलिसांची ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत मोठी कारवाई; ७१४ किलो अमली पदार्थ नष्ट
नागपूर : नागपूर शहरात ‘ड्रग्स फ्री नागपूर’ संकल्पनेअंतर्गत आज एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं. पोलिस आयुक्त रविंद्र सिंगल यांच्या संकल्पनेतून प्रेरित ‘ऑपरेशन थंडर’ (Operation Thunder) अंतर्गत आणि २६ जून आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी ७१४ किलो २३०...
नियमित देखभाल व दुरुस्तीसाठी काही भागात आज वीज नाही
नागपूर,: शहरातील विविध भागांत आवश्यक देखभाल व दुरुस्ती आणि उच्चदाब वीजवाहिनीचे भूमिगत केबल जोडणी आणि रोहित्र उभारणीच्या कामासाठी बुधवार, २५ जून रोजी काही तासांसाठी वीजपुरवठा खंडित ठेवण्यात येणार आहे. नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल महावितरणने दिलगिरी व्यक्त केली असून, या काळात सहकार्य...
शालार्थ आईडी घोटाळ्यातील मोठी कारवाई; शिक्षण संस्था संचालक ओंकार अंजीकरला अटक
नागपूर: बहुचर्चित शालार्थ आईडी घोटाला प्रकरणात विशेष तपास पथक (SIT) ला आणखी एक मोठी सफलता मिळाली आहे. फर्जी शैक्षणिक आईडी आणि शिक्षक नियुक्ती घोटालेच्या तपासात, नागपूर येथील एक शिक्षण संस्था संचालक ओंकार भाऊराव अंजीकर याला अटक करण्यात आली आहे. ओंकार अंजीकर...
मतदार वाढ माझ्याच नाही काँग्रेसच्याही मतदारसंघात झाली;राहुल गांधींच्या आरोपांवर फडणवीसांचे प्रत्युत्तर
नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदारवाढीबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांना फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधींनी दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या पाच महिने आधी ८ टक्के मतदार वाढ झाली, तसेच अज्ञात व्यक्तींनी...
आमदार प्रवीण दटके यांचे “आपली बस” कर्मचाऱ्यांकडून आभार
नागपूर – नागपूर मनपा अंतर्गत "आपली बस" सेवेमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आमदार श्री. प्रवीण भाऊ दटके यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. 2010 पासून सुरू असलेल्या वेतनवाढीसंदर्भातील लढ्याला यश मिळाल्यानंतर, वाहकांना 2017 पासून न मिळणाऱ्या HRA (House Rent Allowance) संदर्भातील...
महापालिका निवडणूक २०२५ मध्ये नाही तर आता थेट २०२६ मध्ये होणार? सरकारच्या नव्या अधिसूचनेने चर्चेला उधाण
नागपूर : राज्यातील प्रमुख महापालिकांमध्ये तीन वर्षांपासून प्रशासक राज सुरू असून, मुंबई, नागपूर, पुणे यांसह एकूण १० महापालिकांमध्ये लोकनियुक्त सत्ता नाही. मात्र आता या निवडणुकांचा मार्ग आणखी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने नुकतीच प्रभाग रचनेबाबत नवीन अधिसूचना काढली असून,...
नागपुरात ओयो हॉटेलच्या आडीत सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दोघांना अटक
नागपूर: क्राइम ब्रांचच्या सामाजिक सुरक्षा विभागाने गुप्त माहितीच्या आधारावर हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका ओयो हॉटेलमध्ये चालवले जात असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. गुप्त माहिती...
देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघातील मतदारवाढ संशयास्पद ;राहुल गांधींचा आरोप
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघातील मतदारसंख्येत केवळ पाच महिन्यांत झालेली आठ टक्क्यांची वाढ गंभीर शंका निर्माण करणारी असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. काही निवडणूक केंद्रांवर तर मतदारवाढ २० ते ५० टक्क्यांपर्यंत असल्याचे त्यांनी...
कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले?हिंदी भाषा सक्तीवर संजय राऊतांची मराठी सेलिब्रिटींवर टीका
मुंबई : राज्यात सध्या हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. महायुती सरकारने शालेय विद्यार्थ्यांसाठी तीन भाषांची शिकवण सक्तीची केली असून, यावर मोठ्या प्रमाणात विरोध व्यक्त करण्यात येत आहे. महाविकास आघाडीने यावर जोरदार टीका केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
नागपूर: महाराष्ट्राच्या विदर्भ भागात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. भारतीय हवामान विभागाने मंगळवार आणि बुधवार, म्हणजेच २५ व २६ जूनसाठी विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागपूर, चंद्रपूर, यवतमाल, गडचिरोली, अमरावती, वर्धा, भंडारा...
विधानसभा निवडणुकीत ७६ लाख मतं आली कुठून? कोर्टात ऐकल्या गेलेल्या युक्तिवादांनंतर २५ जूनला निकाल
मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीत मतदान प्रक्रिया संपल्यानंतर तब्बल ७६ लाख मतांची आकस्मिक भर पडल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. यावरून निवडणूक आयोगाची विश्वासार्हता आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे चेतन अहिरे यांनी मुंबई उच्च...
नागपूरात वीजपुरवठा वारंवार खंडित; केंद्रीय मंत्री गडकरींसह मुख्यमंत्र्यानी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
नागपूर – शहरात गेल्या काही महिन्यांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागपूरकर त्रस्त झाले आहेत. दिवस असो वा रात्र, कोणत्याही वेळी वीज जाण्याच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी...