नागपूर: नागपूर अधिवेशन 2023-2024 दरम्यान सुरक्षा गंभीर विषय असताना, पुण्यातील News18 च्या नावाचा बनावट लेटर हेड तयार करून ओळखपत्र बनवणाऱ्या महिला पत्रकार सविता साखरे कुलकर्णी याला नागपूर पोलिसांनी सोमवारी अटक केली.
सदर प्रकरण सदर पोलीस स्टेशन अंतर्गत समोर आले असून, पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे ‘नागपूर टुडे’शी बोलताना म्हणाले की, सविता साखरे यांनी बनावट ओळखपत्राच्या आधारावर अधिवेशनातील पासेस तयार केले. अधिवेशनाच्या वेळी अशी कारवाई सुरक्षेसाठी मोठा धोका ठरू शकते, कारण योग्य ओळखपत्राशिवाय प्रवेश करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे कठीण होते.
सवितासोबत प्रकरणात एक सहकारीही होता. News18 Media House ला या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पुण्यात सविता साखरे कुलकर्णी विरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर सेशन कोर्टातून सविताला बेल मिळाली, परंतु बेल अर्ज नाकारल्यावर सविता काही काळ फरार राहिल्या होत्या.
यानंतर पोलीसांनी सोमवारी वाठोडा येथील तिच्या घरावर छापा टाकून तिला ताब्यात घेतले.
पोलीसांच्या माहितीनुसार, याआधी 2023 मध्ये येरवडा पोलीस यांनी पत्रकार नरेंद्र वैरागडे आणि सविता साखरे कुलकर्णी यांच्यावर तक्रार नोंदवली होती. तक्रारदार ओझा यांनी सांगितले की, या पत्रकारांनी बनावट विधानसभा पासेस तयार केले आहेत. यावर शून्य FIR गेली आणि प्रकरण सदर पोलीस स्टेशन कडे सुपूर्द करण्यात आले.
सध्या पोलिसांनी प्रकरणाची सखोल तपासणी सुरू केली असून, पुढील कारवाई सुरू केली आहे.