नागपूर : वाडी पोलिसांनी खात्रीशीर माहितीच्या आधारे केलेल्या धाडीत तब्बल नऊ जणांना जुगार खेळताना रंगेहात पकडले. ही कारवाई रविवारी (दि. २४ ऑगस्ट) रात्री ११ वाजता अनीशा रोड लाईन गोडाऊन, वडधामना परिसरात करण्यात आली.
पोलिसांनी पंचासमक्ष घेतलेल्या छाप्यात प्रभाकर उर्फ रजत यादव (२७), नमोद नगराळे (४९), अविनाश कुखे (५२), नरेन्द्र महल्ले (४९), विजेंद्र तिवारी (४०), सचिन ढोके (४९), कुदन यादव (४०), वरुण सरकार (४५) आणि सुनिलकुमार सिंग (४९) असे एकूण नऊ आरोपी ताश पत्यांवर पैशाची बाजी लावत जुगार खेळताना आढळले.
या कारवाईत पोलिसांनी २७ हजार ३०० रुपये रोख रक्कम, पाच मोबाईल फोन, ताश पत्ते व अन्य साहित्य असा मिळून ७७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध वाडी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमातील कलम ४ व ५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उप आयुक्त (परि. क. १) श्री. सिंगा रेड्डी ऋषीकेश रेड्डी आणि सहा. पोलीस आयुक्त (एमआयडीसी विभाग) श्री. सतिशकुमार गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली, वपोनि. राजेश तटकरे, पोउपनि. अविनाश जायभाये, नापोअं राहुल बोटरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.