मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी 7 टप्प्यात आंदोलन; मनोज जरांगे पाटलांचा मोठा निर्णय
मुंबई: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून आता संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. मुंबईत होणाऱ्या आंदोलनाला मर्यादित न ठेवता, संपूर्ण महाराष्ट्रभर ते उभे करण्याची तयारी मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. मुंबईपुरते मर्यादित न राहणारे आंदोलन- सूत्रांच्या माहितीनुसार, जरांगे यांनी आपली रणनीती बदलत आंदोलन...
मनपा निवडणुकीपूर्वी दयाशंकर तिवारींची जंबो कार्यकारिणी जाहीर
नागपूर: नागपूर महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने आपली तयारी वेगात सुरू केली आहे. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी पक्षाची जंबो कार्यकारिणी जाहीर केली. तिवारी यांनी जाहीर केलेल्या या कार्यकारिणीत ४ महामंत्री, १६ उपाध्यक्ष आणि १६ मंत्री नियुक्त करण्यात आले...
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचावकार्य सुरु
विरार: विरार इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४ वर पोहोचला असून अजूनही बचावकार्य सुरु आहे. आतापर्यंत एकूण २४ जणांना इमारतीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. मंगळवारी मध्यरात्री वसई विरार महानगरपालिका हद्दीतील मौजे नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा मागील...
गणरायाच्या साक्षीने ठाकरे बंधूंचं पुनर्मिलन; उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर घेतले बाप्पाचे दर्शन!
मुंबई :गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा एकदा जवळीक दिसून आली आहे. शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे बुधवारी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचले आणि गणरायाचं दर्शन घेतलं. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज ठाकरे यांच्या घरी दीड दिवसांचा गणपती बसवण्यात...
नागपूर हादरलं ;५० वर्षीय महिलेला कामाचं आमिष,निर्जन इमारतीत बलात्कार व लूट,आरोपीला अटक
नागपूर : प्रातपनगर परिसरात कामाचं आमिष दाखवून एका ५० वर्षीय महिलेवर बलात्कार करून दागिने व रोख रक्कम लुटल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला जेरबंद केले आहे. अवघ्या काही दिवसांत हा गंभीर गुन्हा उघडकीस आणत पोलिसांनी मोठं यश मिळवलं आहे. घडलेली घटना धक्कादायक...
मराठा आरक्षणाचा निर्धार ठाम;मनोज जरांगे पाटील अखेर मुंबईकडे निघाले,सरकारची कसोटी!
मुंबई:मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील आता थेट मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. या आंदोलनाला नांदेड जिल्ह्यासह ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. नांदेडच्या शेलगाव येथून शेकडो मराठा बांधवांनी “आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायची...
नागपुरात ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांचे स्वागत; गणेश टेकडी मंदिरातही भाविकांची उसळली गर्दी !
नागपूर : शहरभर उत्साहाचं वातावरण! नागपुरात सकाळपासूनच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन सुरू झाले आहे. ढोल-ताशांच्या गजरात भक्त बाप्पाचे स्वागत करत आहेत. गणपती आगमनाचा दिवस प्रत्येकासाठी आनंदाचा आणि उत्सवाचा क्षण असतो, आणि यंदाही नागपूरकरांनी उत्साहात सहभागी होऊन हा आनंद द्विगुणित केला आहे. याच...
गणेशोत्सवाला महागाईचा फटका; बाप्पाच्या मोदकासह सजावटीचा खर्च वाढला, तरी भक्तांचा उत्साह कायम!
नागपूर : देशभरात ठिकठिकाणी लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. मात्र यादरम्य सर्व सामान्य नागरिकांना महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहे.बाप्पाचा आवडता मोदक महाग झाल्याची माहिती समोर आली आहे. नारळ, पीठ, गूळ, चारोळ्या, वेलची यांसह इतर घटकांच्या वाढलेल्या किमतींमुळे मोदक तयार...
नागपुरात गुन्हे शाखेची कारवाई; दोन आरोपी ताब्यात, दोन अग्निशस्त्रासह सात जिवंत काडतूस जप्त!
नागपूर – नागपूर शहर पोलीस ठाणे खापरखेडा हद्दीत गुन्हे शाखा, युनिट क्र. ५ ने दोन वेगवेगळ्या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत दोघांकडून एकूण दोन अग्निशस्त्र, सात जिवंत काडतूस, वाहन आणि मोबाईलसह ४,५७,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात...
महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे संकट; हवामान खात्याचा ‘या’ जिल्ह्यांना इशारा
नागपूर : महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालं. 17 ते 21 ऑगस्टदरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावे पुराच्या पाण्यात सापडली. गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा...
मराठा आरक्षण;सरकारचा मोठा निर्णय, शिंदे समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ
मुंबई : मराठा आरक्षण प्रश्न पुन्हा पेटला असून मनोज जरांगे यांनी घेतलेल्या बेमुदत उपोषणाच्या निर्णयामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. २९ ऑगस्ट रोजी मुंबईत उपोषण सुरू करण्याची त्यांची घोषणा असताना, न्यायालयाने त्यांना मुंबईत प्रवेशास मनाई केल्याने वाद अधिकच चिघळला आहे....
नागपूरात मोठा घोटाळा उघड; बनावट खरेदीखत करून ३ कोटींची फसवणूक, पाच जणांना अटक
नागपूर: वाठोडा पोलिसांच्या पथकाने एक मोठा खळबळजनक घोटाळा उघडकीस आणला आहे. बनावट खरेदीखत, खोटी कागदपत्रे आणि बँकांना दिशाभूल करून तब्बल ३ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीने चक्क AI तंत्रज्ञानाचा वापर करून खोटी कागदपत्रं तयार...दिव्यांगांच्या प्रश्नांना कायमच प्राधान्य देणार : आ. संदीप जोशी
नागपूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायम समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत असतात. माझ्यावर आमदारकीची जबाबदारी सोपविताना दिव्यांग आणि त्यांच्याशी संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची जबाबदारी सोपविली आहे. भविष्यात आपला कुठलाही प्रश्न शासन दरबारी प्रलंबित राहणार...
नागपूर-गोंदिया एक्सप्रेसवे प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाने नागपूर-गोंदिया अॅक्सेस कंट्रोल्ड सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवे प्रकल्पाला अखेर हिरवा कंदील दिला आहे. हा हाय-स्पीड एक्सप्रेसवे सुमारे 127 ते 163 किमी लांबीचा असून, नागपूर जिल्ह्यातील गावसी (बाह्य वळण मार्गाजवळ) येथून सुरू होऊन गोंदिया जिल्ह्यातील सावरी गावापर्यंत जाणार...
राज्य मंत्रिमंडळाचे नऊ महत्त्वाचे निर्णय; विकासाला मिळणार गती
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (26 ऑगस्ट 2025) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध क्षेत्रांसाठी नऊ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांचा लाभ शेती, सहकार, कामगार कल्याण, पायाभूत सुविधा, न्यायव्यवस्था आणि विमुक्त-भटक्या समाजाला होणार आहे. बैठकीत बीड जिल्ह्यातील सिंदफणा...
पोळ्याच्या दिवशी जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धाड; ७१ जणांना अटक
नागपूर : पोळा सणाच्या दिवशी शहर पोलिसांनी खापरखेडा, वाडी व हुडकेश्वर पोलिस ठाणे हद्दीत जुगार अड्ड्यांवर कारवाई करून तब्बल ७१ जणांना अटक केली. या कारवाईतून ३९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांना शुक्रवारी माहिती मिळाली की, खापरखेडा येथील दहेगाव...
पारशिवनीत अवैध रेती उत्खननावर धडक कारवाई; सुमारे दीड कोटींचा मुद्देमाल जप्त
नागपूर : पारशिवनी तालुक्यातील पालोरा रेती घाटावर सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननाविरोधात पारशिवनी पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई केली. या छाप्यात तब्बल १ कोटी ४२ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक...
इतवारी–गांधीबाग परिसरात २५ ऑगस्टपासून चारचाकी, ऑटो आणि जड वाहनांच्या प्रवेशावर बंदी
नागपूर : शहरातील प्रमुख व्यापारी भाग असलेल्या इतवारी–गांधीबाग परिसरात कायमस्वरूपी लागणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी वाहतूक विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. नागपूर वाहतूक पोलिसांनी काढलेल्या आदेशानुसार, २५ ऑगस्ट २०२५ ते २४ नोव्हेंबर २०२५ या काळात दररोज सकाळी १० ते रात्री १०...
हरितालिका तृतीया : अखंड सौभाग्य व श्रद्धेचे प्रतीक!
मुंबई : भाद्रपद महिन्यातील शुद्ध तृतीयेला साजरी होणारी हरितालिका तृतीया ही महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आजच्या दिवशी विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अविवाहित मुली इच्छित पतीप्राप्तीसाठी उपवास पाळतात. निर्जल उपवास करून शिव-पार्वतीची आराधना करण्याची ही जुनी परंपरा आजही उत्साहाने...
मनपातर्फे ‘इको-फ्रेंडली गणेशोत्सव’ स्पर्धा
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्यसाधून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकरिता ‘इको-फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. "आमचा बाप्पा - इको-फ्रेंडली अभियान" या संकल्पनेवर आधारित स्पर्धेत शहरातील गणेशोत्सव मंडळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, तसेच येत्या २८ ऑगस्टपर्यंत मोठ्या...
वैभव खेडेकरसह ४ नेत्यांची मनसेतून हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चा भडकल्या
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) मोठा संघटनात्मक बदल झाला आहे. पक्षाचे राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटक वैभव खेडेकर यांच्यासह अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे, सुबोध जाधव यांना मनसेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. या निर्णयामागील कारण म्हणजे खेडेकर यांच्यावर भाजप किंवा शिवसेना (शिंदे...