नागपूर हिवाळी अधिवेशनाची सांगता; पुढील अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून मुंबईत!
नागपूर – हिवाळी अधिवेशनातील विधान परिषदेचे कामकाज आज संस्थगित करण्यात आले. अधिवेशनाची सांगता होत असताना पुढील अधिवेशन सोमवार, २३ फेब्रुवारी २०२६ पासून मुंबईत होणार असल्याची घोषणा करण्यात आली. या अधिवेशनात विधान परिषदेचे एकूण ४८ तास १६ मिनिटे कामकाज पार पडले....
नागपुरात संघस्थानी फडणवीस–शिंदेंचे नमन; पवार गटासह आमदारांच्या अनुपस्थितीने चर्चेला उधाण
नागपूर – विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी महायुतीतील भाजप आणि शिंदे गटातील मंत्री व आमदारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसराला भेट देत नमन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक वरिष्ठ मंत्री...
नागपूर अधिवेशन सरकारच्या कामगिरीचे, विरोधकांचे आरोप निराधार;मंत्री लोढा यांचे विधान
नागपूर - नागपूरमध्ये सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती देत सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकला. हे अधिवेशन पूर्णपणे जनहिताशी संबंधित मुद्द्यांवर केंद्रित होते, असे सांगत अनेक...
हिवाळी अधिवेशनात विदर्भाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष; काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांचा आरोप
नागपूर – हिवाळी अधिवेशनात विदर्भातील अनेक महत्त्वाचे प्रश्न चर्चेला न आल्याचा आरोप आमदार विकास ठाकरे यांनी केला आहे. विदर्भाच्या विकासाशी आणि जनतेच्या दैनंदिन अडचणींशी संबंधित विषयांकडे सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे त्यांनी म्हटले. विकास ठाकरे म्हणाले की, विदर्भातील शेतकरी समस्या, सिंचन, रोजगार,...
नागपुरात अल्पवयीनवर 800 रुपयांच्या उधारीतून जीवघेणा चाकूहल्ला
नागपूर — केवळ ८०० रुपयांच्या उधारीचा वाद थेट रक्तरंजित हल्ल्यात रूपांतरित झाल्याची धक्कादायक घटना नागपूरच्या वाठोड़ा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. उधार दिलेली रक्कम परत न मिळाल्याच्या रागातून एका युवकाने आपल्या दोन साथीदारांसह ओळखीच्या अल्पवयीनवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याने परिसरात...
देशात 19 डिसेंबरला राजकीय भूकंप;पंतप्रधान म्हणून मराठी नेतृत्व समोर येणार!
मुंबई - हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये राजकीय वातावरण तापले असतानाच, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देशाच्या राजकारणाबाबत धक्कादायक भाकीत केले आहे. येत्या 19 डिसेंबर रोजी केंद्रातील सत्तेत मोठी उलथापालथ होऊ शकते आणि देशाचा नवा पंतप्रधान...
नागपुरात 5 लाख खर्चून तयार केलेले गार्डन गायब? वर्मा ले-आऊटमधील उद्यान प्रकरणाची चर्चा
नागपूर (पश्चिम) – वर्मा ले-आऊट परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, ₹५ लाख खर्चून विकसित केल्याचा दावा असलेले सार्वजनिक उद्यान प्रत्यक्षात अस्तित्वातच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कागदोपत्री पूर्ण झालेला हा प्रकल्प आज त्या ठिकाणी शोधूनही आढळत नाही. मोकळी जागा...
नागपूरमध्ये झोपडपट्टीवासीयांच्या स्वप्नांना आकार; हजारो कुटुंबांना मालकीहक्काचे पट्टे वितरीत!
नागपूर – नागपूर शहरातील झोपडपट्टीधारकांसाठी ऐतिहासिक ठरणाऱ्या पट्टेवाटप मोहिमेला आज गती मिळाली. गेल्या चार दशकांपासून प्रलंबित असलेला मालकीहक्काचा प्रश्न मार्गी लागत असल्याने अनेक कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. प्रतापनगर येथील शांतिनिकेतन...
नागपुरात डॉ. भूषण उपाध्याय यांचे ‘योगा अॅण्ड माइंड मॅनेजमेंट’ प्रकाशित
नागपूर – योगाच्या कालातीत तत्त्वज्ञानाला आधुनिक मेंदूविज्ञानाची जोड देणारे ‘योगा अॅण्ड माइंड मॅनेजमेंट’ हे पुस्तक नागपुरात प्रकाशित झाले आहे. डॉ. भूषण कुमार उपाध्याय, आयपीएस (से.नि.) यांचे हे पाचवे पुस्तक असून, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक यांच्या वतीने या पुस्तकाचे प्रकाशन...
कन्हान येथे एमडी विक्रीचा पर्दाफाश; नागपूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई
नागपूर – नागपूर ग्रामीण अंमली पदार्थ विरोधी पथकाने कन्हान-रामटेक महामार्गावर धडक कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) अंमली पदार्थ विक्रीप्रकरणी संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अंमली पदार्थांच्या तस्करीचा गंभीर गुन्हा उघडकीस आला आहे. १२ डिसेंबर २०२५ रोजी अपर पोलीस अधीक्षक अनिल मस्के यांच्या...
केंद्र सरकारकडून जातीनिहाय जनगणनेला हिरवा कंदील; ११,७१९ कोटींचा खर्च मंजूर
नवी दिल्ली – देशात होणाऱ्या आगामी जातनिहाय जनगणनेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी अधिकृत मंजुरी दिली आहे. २०२७ मध्ये राबवण्यात येणाऱ्या या देशव्यापी जनगणनेसाठी तब्बल ११ हजार ७१९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, ही मोहीम जगातील सर्वात मोठी प्रशासकीय आणि सांख्यिकी प्रक्रिया...
नागपुरात सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकले सेवानिवृत्त अधिकारी; ७.२५ लाखांची फसवणूक!
नागपूर टुडे – शहरात सायबर गुन्हेगारांचे धाडस दिवसेंदिवस वाढत असून सेक्सटॉर्शनच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे. अजनी परिसरातील ६० वर्षीय सेवानिवृत्त आरोग्य अधिकाऱ्याला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवून सायबर ठगांनी तब्बल ₹७.२५ लाखांची फसवणूक केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. महिला आणि...
नागपूर मेट्रो स्टेशनच्या शौचालयात विद्यार्थिनीचा अश्लील व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न!
नागपूर – कामठी मार्गावरील नारी मेट्रो स्टेशनच्या महिला शौचालयात एका विद्यार्थिनीचा अश्लील व्हिडिओ चित्रीत करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सुमारे २०...
राज्यात तीन वर्षांत १४,५२६ बालमृत्यू; विधानसभेत आरोग्य विभागाची कबुली
मुंबई — राज्यातील सात प्रमुख जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन वर्षांत तब्बल १४,५२६ बालमृत्यू झाल्याची गंभीर माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. भाजप आमदार स्नेहा दुबे यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना ही आकडेवारी सादर करण्यात आली. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार...
केंद्राची पहिल्यांदाच आई होणाऱ्यांसाठी मोठी मदत; ‘मातृ वंदना’ योजनेमुळे महिलांना दिलासा
नवी दिल्ली - केंद्र सरकारची प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सध्या गर्भवती महिलांसाठी मोठा आधार ठरत आहे. पहिल्या गर्भधारणेदरम्यान येणाऱ्या खर्चाची चिंता कमी करण्यासाठी दिले जाणारे पाच हजार रुपये अनेक महिलांसाठी दिलासादायक ठरत आहेत. पुण्यातील २५ वर्षीय रीता यांनी अलीकडेच या योजनेचा...
विदर्भ महाराष्ट्रापासून कधीच वेगळा होऊ शकत नाही; नागपुरात उद्धव ठाकरेंची भूमिका
नागपूर : हिवाळी अधिवेशनामुळे नागपुरात विविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापले आहे. याच काळात स्वतंत्र विदर्भाची मागणी पुन्हा गती घेऊ लागल्याने वातावरण अधिकच तापलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विदर्भाच्या विकासातील प्रचंड तफावत, सामाजिक वर्गांना मिळणाऱ्या संधींची कमतरता आणि सत्तेतल्या...
राज्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये ३७ हजार शिक्षकांची कमतरता; वडेट्टीवार यांचा विधानसभेत हल्लाबोल
मुंबई : राज्यातील शिक्षण व्यवस्थेतील गंभीर स्थिती विधानभवनात पुन्हा एकदा उघडी पडली आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये तब्बल ३७ हजार शिक्षकांची पदे रिक्त असून शिक्षणाचा अक्षरशः “खेळखंडोबा” झाला असल्याचा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केला. प्रश्नोत्तरांच्या काळात जिल्हा...
नागपुरात ‘आपली बस’वर हल्ला; “हलबा एकता जिंदाबाद”च्या घोषणा, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
नागपूर : शहरात आपली बस सेवेवर अज्ञातांनी अचानक हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली आहे. लकडगंज पोलिस स्टेशनच्या काही अंतरावर ही घटना घडली. बस वर्धमाननगरहून लकडगंजकडे जात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी हातोडीने बसच्या काचांवर जोरदार वार केले. समोरच्या काचेवर आणि त्यानंतर बाजूच्या...
महसूल मंत्री बावनकुळेंची ‘नंबर वन’कडे झेप? जयंत पाटीलांच्या कौतुकाने राजकीय भुवया उंचावल्या!
मुंबई : राज्यातील महसूल खात्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कामकाज गेल्या काही महिन्यांत विशेषत्वाने चर्चेत आहे. क्लिष्ट, वेळखाऊ आणि लोकांना त्रास देणाऱ्या प्रक्रिया झपाट्याने सोप्या करून, अनेक प्रलंबित निर्णयांना गती देऊन त्यांनी विभागात नवा वेग आणल्याचे मानले जात आहे. याच...
हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा घणाघात; मुख्यमंत्री फडणवीसांना ‘पांघरून खाते’ उघडण्याचा दिला सल्ला
नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेच्या पायऱ्यांवर राजकीय तापमान चांगलेच वाढले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपरोधिक शैलीत जोरदार निशाणा साधत, त्यांनी एक नवे ‘ पांघरून खाते’ सुरू करावे असा टोमणाच...
सरकारी नोकऱ्यांमध्ये बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांचा घोटाळा उघड; 719 कर्मचारी चौकशीच्या विळख्यात
मुंबई : महाराष्ट्रात बनावट अपंगत्व प्रमाणपत्र दाखवून सरकारी नोकरी मिळवल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. राज्य सरकारला तब्बल 719 कर्मचाऱ्यांविरोधात तक्रारी प्राप्त झाल्या असून या सर्व प्रकरणांची चौकशी सुरू असल्याची माहिती दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत राष्ट्रवादी...





