
नागपूर – नागपूरमध्ये सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती देत सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकला. हे अधिवेशन पूर्णपणे जनहिताशी संबंधित मुद्द्यांवर केंद्रित होते, असे सांगत अनेक महत्त्वाचे निर्णय या काळात घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विरोधकांकडून करण्यात येणारे आरोप तथ्यहीन असून केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोपासाठी ते केले जात असल्याचा दावा मंगलप्रभात लोढा यांनी केला. सरकार विकास, लोककल्याणकारी योजना आणि जनतेच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य देत काम करत असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
Advertisement








