Published On : Sat, Dec 13th, 2025
By Nagpur Today Nagpur News

कन्हान येथे एमडी विक्रीचा पर्दाफाश; नागपूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

Advertisement

नागपूर – नागपूर ग्रामीण अंमली पदार्थ विरोधी पथकाने कन्हान-रामटेक महामार्गावर धडक कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) अंमली पदार्थ विक्रीप्रकरणी संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अंमली पदार्थांच्या तस्करीचा गंभीर गुन्हा उघडकीस आला आहे.

१२ डिसेंबर २०२५ रोजी अपर पोलीस अधीक्षक अनिल मस्के यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक अमोल नागरे यांच्या नेतृत्वाखाली पथक पेट्रोलिंग करत असताना कन्हान नदी पुलाजवळ संशयास्पद अवस्थेत उभी असलेली मारुती सुझुकी सेलेरिओ कार आढळून आली. पोलिस वाहन दिसताच संबंधित कार वेगाने पळून गेल्याने संशय बळावला.

Gold Rate
13 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,31,800 /-
Gold 22 KT ₹ 1,22,600 /-
Silver/Kg ₹ 1,88,800/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पथकाने पाठलाग करून बोसर्डा टोलनाक्याजवळ कार अडवली. कारमध्ये विजय नंदलाल रहांगडाले (वय ४२, रा. वाठोडा, नागपूर) व एक महिला असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीदरम्यान आरोपीकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने सखोल तपास करण्यात आला. तपासात रहांगडाले याच्यावर यापूर्वीही एमडी विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे समोर आले.

कन्हान पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पंचनामा, झडती व जप्तीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. घटनास्थळी महिला पोलीस, पंच, फोटोग्राफर व मापारी उपस्थित होते.

नागपूर ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईमुळे अंमली पदार्थ विक्रीचे जाळे उघडकीस आले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Advertisement