नागपुरात दुपारी मुसळधार पावसाची हजेरी;वातावरणात गारवा
नागपूर : शहरात मंगळवारी दुपारी पावसाने झंझावाती हजेरी लावली. गेल्या पंधरवड्यापासून तुरळक सरींवर समाधान मानणाऱ्या शहरवासीयांना दुपारच्या मुसळधार पावसाने मोठा दिलासा दिला. प्रखर उकाडा आणि दमट हवेतून त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे थंडावा मिळाला. दुपारी साधारण तीनच्या सुमारास सुरुवात झालेल्या...
नागपूरच्या ओंकार नगर चौकात धावत्या फोर्ड फिगो कारला आग; जीवितहानी नाही
नागपूर : ओंकार नगर चौकात आज दुपारी धावत्या कारला अचानक आग लागून एकच खळबळ उडाली. फोर्ड फिगो कारमध्ये अचानक धूर आणि ज्वाळा उसळल्याने काही क्षणांत परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत वेळेवर वाहन थांबवून बाहेर पडल्याने मोठा...
नागपुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्टला चिकन व मांस विक्रीवर बंदी; मनपाचा निर्णय
नागपूर : स्वातंत्र्यदिन आणि श्री कृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १५ ऑगस्ट रोजी शहरातील सर्व चिकन व मांस विक्रीची दुकाने तसेच कत्तलखाने पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश मनपाच्या आरोग्य विभागाने जारी केले आहेत. या आदेशामुळे त्या दिवशी...
भाजपचा काळ संपत आला ; उद्धव ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
मुंबई : मातोश्री येथे आज झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात विदर्भ आणि मुंबईतील भाजप तसेच काँग्रेसमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्ये प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नव्या सहकाऱ्यांचे स्वागत करताच सत्ताधाऱ्यांवर रोखठोक हल्ला चढवला. मतांची चोरी उघडकीस- उद्धव ठाकरे म्हणाले, “देशभर...
वाठोडा पोलिसांकडून पतीवर पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
नागपूर : वाठोडा पोलिसांनी ४२ वर्षीय व्यक्तीविरोधात पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत महिला संगीता शंकरराव बिसेन (वय ३२) हिचा विवाह एप्रिल २०१४ मध्ये आरोपी शंकरराव श्रीपाद बिसेन यांच्यासोबत झाला होता. विवाहानंतर सुरुवातीची दोन वर्षे सर्व...
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय; १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी
मुंबई : राज्यातील तरुणांना प्रतीक्षा असलेल्या १५ हजार पोलीस भरतीला अखेर मंजुरी मिळाली आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गृह विभागाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. बैठकीत घेतलेले चार प्रमुख निर्णय — १५ हजार पोलीस भरतीला मंजुरी –...
नागपूर होणार ग्लोबल MRO हब;अदाणी डिफेन्सकडून इंडामरचे अधिग्रहण
नागपूर : अदाणी डिफेन्स सिस्टिम्स अँड टेक्नॉलॉजीज लिमिटेड (ADSTL) यांनी आपल्या चॅनेल पार्टनर हवाईअड्डा एनर्जी सॉल्यूशन्स लिमिटेडमार्फत प्राइमसरी सर्व्हिसेस एलएलसीसोबत भागीदारी करून इंडामर प्रायव्हेट लिमिटेड (IDPL) चे शंभर टक्के अधिग्रहण केले आहे. IDPL नागपूर येथील इंजिनिअर टर्मिनल प्रायव्हेट लिमिटेडचे संचालन...
एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार आज होणार जाहीर; ‘या’ नेत्याचे नाव चर्चेत
नवी दिल्ली : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं आहे. यानंतर निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची घोषणा केली असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे. सत्ताधारी भाजप आणि एनडीएच्या मित्रपक्षांनी उमेदवार निवडण्याचे सर्वाधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी...
मनपाचा अनोखा उपक्रम: टाकाऊ वस्तूंपासून साकारली आकर्षक कलाकृती
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने केंद्र शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ आणि ‘हर घर स्वच्छता: स्वतंत्रता का उत्सव स्वच्छता के संग अभियानांतर्गत मनपाच्या झोन १०, प्रभाग ९ मधील सदर छावणी परिसरात टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक कलाकृती साकारण्यात आली आहे. या कलाकृतीचे...
नागपुरातील कोतवाली परिसरात कापूस प्रक्रिया यंत्रात केस अडकून महिलेचा मृत्यू
नागपूर : कोतवाली परिसरात रविवारी दुपारी घडलेल्या धक्कादायक अपघातात ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. काम करताना तिचे केस कापूस प्रक्रिया यंत्रात अडकले आणि त्यामुळे गंभीर दुखापत होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. मृत महिलेचे नाव कल्पना रूपचंद कामडी (वय ४०, रा. जुनी...
नागपूर-जबलपूर महामार्गावर मानवतेचा मृत्यू; मदत न मिळाल्याने पतीने पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधून नेला!
नागपूर :रविवारी संध्याकाळी नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर घडलेल्या एका अपघाताने केवळ एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला नाही, तर मानवी संवेदनाही पायदळी तुडवल्या गेल्या. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात प्राणवायूशी झुंज देत पडली असताना, पती अमित यादव हात जोडून मदतीची याचना करत राहिला… पण...
खंडणीखोरांचा सरदार कोण, महाराष्ट्र विसरलेला नाही; महसूल मंत्री बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
नागपूर : महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात पुन्हा एकदा शब्दांचा वार सुरू झाला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट आणि घणाघाती प्रहार केला आहे. “उद्धवजी, खंडणीखोरांचा सरदार कोण आहे हे महाराष्ट्रातील जनतेला चांगलं...
रक्षाबंधन स्पेशल: राखीच्या नात्याला डिजिटल रंग,भावाकडून बहिणीला ऑनलाईन गिफ्टचा हटके अंदाज!
नागपूर:रक्षाबंधन हा सण म्हणजे भावाबहिणीच्या नात्यातील आपुलकी, प्रेम आणि जिव्हाळ्याचा उत्सव. पारंपरिक पद्धतीने राखी बांधून, मिठाई देऊन आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण करून हा सण दरवर्षी साजरा केला जातो. मात्र यंदा एका कुटुंबाने हा सण आधुनिक तंत्रज्ञानाच्या रंगात रंगवला. या अनोख्या क्षणात बहिणीने...
रक्षाबंधनानिमित्त पंतप्रधान मोदींनी विद्यार्थिनीसह ब्रह्मकुमारी संस्थेच्या बहिणींकडून बांधली राखी
नवी दिल्ली : देशभरात शनिवारी रक्षाबंधनाचा सण पारंपरिक उत्साहात आणि आनंदात साजरा झाला. भावाबहिणीच्या नात्यातील आपुलकी, स्नेह आणि रक्षणाची भावना जपणाऱ्या या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आपल्या निवासस्थानी हा सण उत्साहाने साजरा केला. सकाळपासूनच 7, लोक कल्याण मार्गावरील पंतप्रधान निवासस्थानी शालेय...
विधानसभा निवडणुकीदरम्यान १६० जागा जिंकण्याची हमी देणारे भेटले; शरद पवारांचा गौप्यस्फोट
नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणुकीतील गैरप्रकारांवर केलेल्या गंभीर आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाम पाठिंबा दर्शवला आहे. शनिवारी नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी सांगितले की, राहुल गांधींच्या मांडणीमध्ये तथ्य असून, निवडणूक आयोगाने सखोल आणि...