सुभाष मार्गावरील म्हाडा कॉलनीच्या समस्या सुटणार!
नागपूर : सुभाष रोडवरील म्हाडा कॉलनीतील समस्यांची पाहणी करण्यासाठी आता थेट म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारीच म्हाडा कॉलनीला शनिवारी (ता. 9) सकाळी 11 वाजता भेट देणार आहेत. यामुळे आता येथील समस्या मार्गी लागण्याची आशा रहिवास्यांमध्ये निर्माण झाली आहे. सुभाष रोडवरील म्हाडा...
नागपुरातील आशी नगरात आंदोलनाची तीव्रता; मृत सफाई कर्मचाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी
नागपूर : नगर निगममधील सफाई कर्मचारी राजू उपाध्ये यांच्या आत्महत्येनंतर नागपुरात संतापाचा उद्रेक झाला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी पीडित कुटुंबीयांसह राजू उपाध्ये यांचा मृतदेह आशी नगर झोन कार्यालयासमोर ठेऊन तीव्र आंदोलन छेडले. या आंदोलनामध्ये संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि कुटुंबीयांना...
शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा मार्ग मोकळा, सरकारकडून लवकरच निर्णय;मंत्री बावनकुळे यांची माहिती
छत्रपती संभाजीनगर: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील आर्थिक अडचणीत सापडलेल्या आणि पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचा शासनाचा निर्धार स्पष्ट केला. भाजपने निवडणुकीत दिलेले आश्वासन फक्त शब्दांत न ठेवता प्रत्यक्षात उतरवण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले. बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केलं...
नागपूर जवळच्या गुमथी गावात एकतर्फी प्रेमाने घडवली अमानुषता: तरुणीवर चाकूहल्ला, चार बोटं तुटली
नागपूर : एकतर्फी प्रेमाच्या अतिरेकातून गुरुवारी सकाळी गुमथी गावात धक्कादायक घटना घडली. गावातील हनुमान मंदिरात पूजा करत असलेल्या 20 वर्षीय तरुणीवर एका विकृत तरुणाने चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तिच्या डाव्या हाताच्या चार बोटांना गमवावं लागलं असून, ती गंभीर...
मानकापुर रिंग रोडवर भीषण अपघात; भरधाव ट्रकने कारला दिली धडक, चालक गंभीर
नागपूर : शहरातील मानकापुर रिंग रोडवर गुरुवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने सिग्नलवर थांबलेल्या कारला जोरदार धडक दिली, त्यामुळे ती कार समोर उभ्या असलेल्या दुसऱ्या ट्रकवर आदळली. या अपघातात कार अक्षरशः दोन ट्रकांच्या मध्ये चिरडली गेली असून कारचालक...
स्वावलंबी नगर आणि दीनदयाळ नगरमधील पाणीपुरवठा पूर्ववत
नागपूर: नागपूर शहरातील लक्ष्मीनगर झोनमधील प्रताप नगर जलकुंभातून (ईएसआर) पाणीपुरवठा होत असलेल्या स्वावलंबी नगर आणि दीनदयाळ नगर येथील रहिवाशांना गेल्या दहा दिवसांपासून होत असलेल्या दूषित पाणी पुरवठ्याच्या समस्येपासून दिलासा मिळाला आहे. मनपा व ओसीडब्ल्यू च्या चमूने तक्रारीच्या दिवसापासून प्रकरण युद्धपातळीवर...
नागपूरमध्ये लाच मागणाऱ्या दोन पोलिसांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई!
नागपूर : आर्थिक गुन्हे शाखा, नागपूर शहर येथील पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस हवालदाराविरोधात लाच मागणीप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर पथकाने गुन्हा दाखल केला आहे. सरकारी कर्तव्यातील भ्रष्टाचाराच्या या प्रकारामुळे पोलिस दलाच्या प्रतिमेला पुन्हा एकदा काळिमा फासला आहे. तक्रारदार यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक...
नागपुरात कुख्यात हिस्ट्रीशीटर समीर शेख उर्फ येडा शमशेरची निर्घृण हत्या
नागपूर : शहरातील गुन्हेगारी विश्वाला हादरवणारी घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राजीव गांधी नगर पुलाच्या खाली एका कुख्यात हिस्ट्रीशीटरची अत्यंत अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली. मृतकाची ओळख समीर शेख उर्फ येडा शमशेर खान (वय...
नागपूर जिल्ह्यातून ७ गुन्हेगारांवर हद्दपाराची कारवाई; डीसीपी निकेतन कदम यांचा निर्णय
नागपूर: नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सतत गुन्हेगारी करत असलेल्या सात आरोपींना पोलिसांनी हद्दपार केलं आहे. परिमंडळ क्रमांक ५ चे पोलीस उप आयुक्त मा. श्री. निकेतन ब. कदम यांनी ही कठोर कारवाई केली. या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला...
नागपूर सायबर पोलिसांची मोठी कामगिरी; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपीला ओडिशातून अटक
नागपूर : नागपूर सायबर पोलिसांनी मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी मोठी कारवाई करत ओडिशामधून एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात सुमारे 23.71 लाख रुपयांची फसवणूक झाली होती. विशेष म्हणजे या गुन्ह्यातील 19.90 लाख रुपये जप्त करून न्यायालयाच्या आदेशाने परत करण्यात आले आहेत. फिर्यादीने 15 जुलै 2025 रोजी दिलेल्या...
नागपूरमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; सर्व्हिस अपार्टमेंटवर पोलिसांचा छापा
नागपूर – शहरातील बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरेंद्र नगर परिसरात सर्व्हिस अपार्टमेंटच्या आड सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांनी कारवाई करत मोठा खुलासा केला आहे. संकेत टवले या आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्या ताब्यातून दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी...
‘लाडकी बहिण’ योजनेत धक्कादायक गैरप्रकार; सरकारकडून घरोघरी चौकशीची मोहीम सुरू
महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने सुरु झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला आता वादाचा फटका बसताना दिसतोय. अपात्र लाभार्थ्यांना अनुदान मिळाल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर राज्य सरकारने थेट लाभार्थ्यांच्या घरी जाऊन पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. जालना जिल्ह्यातील 70 हजार महिलांची यादी तयार करण्यात आली असून,...
नागपुरात एकटेपणासह आजारपणाने त्रस्त वृद्ध दाम्पत्याचा टोकाचा निर्णय; पतीचा मृत्यू, पत्नीची प्रकृती गंभीर
नागपूर – शहरातील सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या समर्थ नगरीत एका वृद्ध दाम्पत्याने आजारपणाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ८० वर्षीय होमिओपॅथी डॉक्टर गंगाधर बालाजी हरणे यांनी त्यांच्या ७० वर्षीय पत्नीसोबत विष प्राशन केलं. यामध्ये डॉक्टर...
स्वच्छ सर्वेक्षणात नागपूरचे देशात ‘२२ ए’ व्या क्रमांकावर
नागपूर : मनपाने केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५’ चे सुधारित निकाल बुधवारी (ता.६) जाहीर करण्यात आले आहेत. स्वच्छता सर्वेक्षणात नागपूर महानगरपालिकेला १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहर या गटात यावर्षी २२ वा क्रमांक (रँक) प्राप्त...
अयोध्या नगरमध्ये नागरिकांचा झोन ऑफिसवर संताप; नाल्याच्या कामासाठी रस्त्यावर उतरले आंदोलक
नागपूर – जंबोदीप नगर परिसरातील अयोध्या नगरमध्ये उघड्या नाल्याच्या समस्येने त्रस्त नागरिकांनी अखेर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले. मागील तीन महिन्यांपासून नाल्यावरील स्लॅबचे काम रखडले असून, तीन प्रमुख रस्ते बंद आहेत. याचबरोबर दोन महिन्यांपासून गटाराचे पाणी थेट नाल्यात मिसळत असल्याने...
उद्धव ठाकरे-मनसे एकत्र; ‘या’ निवडणुकीत ऐतिहासिक युतीची घोषणा
मुंबई:मुंबईच्या राजकारणात मोठा भूकंप घडवत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (ठाकरे गट) एकत्र येत असल्याची अधिकृत घोषणा झाली आहे. बऱ्याच काळापासून चर्चेत असलेली ही युती आता प्रत्यक्षात उतरली असून, ती बेस्ट कामगार सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत पहिल्यांदाच दिसून येणार आहे. राज ठाकरे...
निराश्रित मुलांसाठी महायुती सरकारचा दिलासा; कौटुंबिक संगोपनासाठी नवीन योजना राबवणार
मुंबई – राज्यातील अनाथ, बेघर आणि निराधार बालकांना आता संस्थात्मक नव्हे तर घरगुती, प्रेमळ आधार मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाने 'क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना' अंतर्गत मुलांना कुटुंबामध्ये वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेनुसार, 0 ते 18 वयोगटातील अनाथ मुला-मुलींना संस्थांमध्ये न...
मनसे अवैध चिकन मटन मार्केटवरून आक्रमक; नागपूर महापालिका अधिकाऱ्यांना कोंबड्यांची ‘अनोखी भेट’!
नागपूर – सहकार नगर परिसरातील अवैध चिकन-मटन विक्रीच्या विरोधात अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना थेट कोंबड्यांची भेट देत निषेध व्यक्त केला. गेल्या अनेक महिन्यांपासून स्थानिक नागरिकांच्या तक्रारी असूनही महापालिकेचे दुर्लक्ष सुरुच राहिल्यामुळे संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी झोन-एकच्या...
दिल्लीतील राजकीय हालचालींना वेग; शिंदे-शहा भेटीत स्थानिक निवडणुकीचा अजेंडा
नवी दिल्ली – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्ली भेट पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. काही दिवसांपासून शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चांदरम्यान ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. शिंदे यांनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा...
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना एक वर्षाचा कारावास; नागपूर सत्र न्यायालयाचा निर्णय
नागपूर – कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी नागपूर सत्र न्यायालयाने एक वर्षाच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा बुधवारी (दि. ६ ऑगस्ट) न्यायालयाने दिली असून, राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू आहे. ही घटना डिसेंबर...
धर्म म्हणजे केवळ पूजा नव्हे, तर सामाजिक जबाबदारी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये प्रतिपादन
नागपूर – "धर्म हा केवळ ईश्वरपूजेसाठी नसून, समाजकल्याणासाठी आहे. धर्माचे कार्य पवित्र आहे आणि जो समाज धर्माच्या मार्गावर चालतो, तिथे संघर्ष नव्हे तर शांती असते," असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज येथे केले. नागपूरमध्ये 'धर्म...