नागपूर : कोतवाली परिसरात रविवारी दुपारी घडलेल्या धक्कादायक अपघातात ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. काम करताना तिचे केस कापूस प्रक्रिया यंत्रात अडकले आणि त्यामुळे गंभीर दुखापत होऊन तिचा जागीच मृत्यू झाला.
मृत महिलेचे नाव कल्पना रूपचंद कामडी (वय ४०, रा. जुनी मंगलवारी, पिंटू सावजी हॉटेलजवळ, लकडगंज) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी साडे दोनच्या सुमारास कल्पना या कोतवाली परिसरातील नवाबपूरा मशीदजवळ असलेल्या भारत गादी हाऊस येथे काम करत होत्या. ही दुकान तक्रारदार मोहम्मद एजाज शेख रफिक शेख (वय ४३) यांची मालकीची आहे.
काम करताना अचानक कल्पनांचे केस यंत्रात अडकले. यात तिचे डोके आत ओढले गेले आणि ती गंभीर जखमी झाली. उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
कोतवाली पोलिसांनी दुकानमालकाच्या निवेदनावरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.