नागपूर: नागपूर महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने आपली तयारी वेगात सुरू केली आहे. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी पक्षाची जंबो कार्यकारिणी जाहीर केली.
तिवारी यांनी जाहीर केलेल्या या कार्यकारिणीत ४ महामंत्री, १६ उपाध्यक्ष आणि १६ मंत्री नियुक्त करण्यात आले आहेत. यासोबतच त्यांनी युवक मोर्चा वगळता इतर सर्व आघाड्यांच्या अध्यक्षांची नावेही जाहीर केली.
मनपा निवडणुकीस अवघे काही महिने राहिलेले असताना भाजपकडून करण्यात आलेली ही मोठी घोषणा शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.