Published On : Tue, Aug 26th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूरात मोठा घोटाळा उघड; बनावट खरेदीखत करून ३ कोटींची फसवणूक, पाच जणांना अटक

...राधिका गुप्ता

नागपूर: वाठोडा पोलिसांच्या पथकाने एक मोठा खळबळजनक घोटाळा उघडकीस आणला आहे. बनावट खरेदीखत, खोटी कागदपत्रे आणि बँकांना दिशाभूल करून तब्बल ३ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीने चक्क AI तंत्रज्ञानाचा वापर करून खोटी कागदपत्रं तयार केली होती, हे विशेष धक्कादायक आहे.

फसवणुकीचा थरारक डाव-

पुण्यात राहणाऱ्या नीरज सोईतकर यांनी नागपूरातील फ्लॅट विक्रीसाठी ओएलएक्सवर जाहिरात दिली होती. या जाहिरातीवरून आरोपींनी संपर्क साधला. खरी रजिस्ट्रीची झेरॉक्स घेऊन त्याची बनावट प्रत तयार करण्यात आली. खरी मालक नीरज सोईतकर यांच्या ठिकाणी आरोपी अजय पाठरावे याचा फोटो लावून तोच मालक असल्याचे दाखवण्यात आले.

यानंतर बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड तयार करून खाते उघडले गेले. याच खात्यावरून विविध बँकांकडून कर्ज मिळवले गेले. मंजूर झालेली रक्कम इतर खात्यांमध्ये वर्ग करून टोळीने ती आपसात वाटून घेतली. एवढंच नव्हे तर आरोपींनी बनावट अपंगत्व प्रमाणपत्रदेखील तयार केलं होतं.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अटकेतले आरोपी-

  • निलेश पोलिकर (३१) – न्यू डायमंड नगरी
  • संदीप निंभोरकर (३६) – विनायक नगर
  • ईशान वाटकर (३७) – प्रधानमंत्री आवास योजना, वाठोडा
  • ईमरान हाशमी (४६) – आर्यनगर, जरीपटका
  • अजय पाठराबे (४१) – रेशम ओळी, तहसील

हे सर्व आरोपी १९ ते २५ ऑगस्टदरम्यान अटकेत आले असून सध्या पोलीस कोठडीत आहेत.

मोठं रॅकेट, अजून २० जण संशयाच्या भोवऱ्यात-

या प्रकरणी सध्या वाठोडा, बेलतरोडी, सदर, पाचपावली आणि सक्करदरा पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल झाले आहेत. तपासात आणखी किमान २० जणांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. कोणकोणत्या बँका फसल्या आहेत आणि किती काळापासून हे रॅकेट सुरू आहे, याचा तपास सुरू आहे.

पोलिसांची मेहनत-

या कारवाईत पोलीस निरीक्षक हरीशकुमार बोराडे, उपनिरीक्षक अमोल पाटील, प्रणाली बेनके, कैलास श्रावणकर, हिमांशू पाटील व रोहित मटाले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तपास पोलिस उपायुक्त रश्मिता राव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Advertisement
Advertisement