
नागपूर, ता. १४: केंद्र सरकारच्या पीएम ई-बस सेवा अंतर्गत नागपूर महानगरपालिकेला मिळालेल्या पर्यावरणपूरक 50 इलेक्ट्रिक बसेसचे लोकार्पण आज (ता. 14) माननीय पंतप्रधान श्री. नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने गुवाहाटी येथून करण्यात आले. या योजनेअंतर्गत नागपूरला 150 बसेस मिळणार असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यात 50 बस मनपाला प्राप्त झाल्या आहेत.
मनपाद्वारे पी. एम ई बस सेवा कोराडी आगार येथे आयोजित कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, महापौर श्रीमती निता ठाकरे, आमदार श्री. संदीप जोशी, आमदार श्री, कृष्णा खोपडे, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, नगरसेवक श्री. विजय (पिंटू) झलके, श्री. रामभाऊ आंबुलकर, प्रभारी आयुक्त श्रीमती वसुमना पंत, माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी, उपायुक्त व परिवहन व्यवस्थापक डॉ. मेघना वासनकर, उपायुक्त श्री. निर्भय जैन, उपायुक्त श्री. मिलिंद मेश्राम, उपायुक्त श्री.मंगेश खवले, महादुल्याच्या नगराध्यक्ष श्रीमती हेमलता सावजी, महादुला नगरपंचायतचे मुख्य अधिकारी श्री. अमर हांडा, नगरसेवक श्रीमती सुषमा चौधरी, श्रीमती प्रमिला मथरानी, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, मनपाचे क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर, नवी दिल्लीचे टिम लिडर श्री. राम पौनीकर जेबीएम कंपनीचे उपाध्यक्ष श्री.पुनीत शर्मा, वरिष्ठ व्यवस्थापक श्री. सौरभ पांडे, माजी नगराध्यक्ष श्री. राजेश रंगारी, माजी सरपंच श्री. नरेंद्र धनोले, यांच्यासह नागपूर मनगरहापालिकेचे अनेक नगरसेवक अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. विशेष म्हणजे, कार्यक्रमानंतर लगेच सर्व 50 बसेस जनतेच्या सेवेत रुजू झाल्या आहेत.
आसाममधील गुवाहाटी येथे मा. पंतप्रधान श्री.नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण पार पडले. याचवेळी देशातील चार शहरांमध्ये पीएम ई-बसचे लोकार्पण करण्यात आले. यात गुवाहाटी येथे 100 बस, नागपूर व भावनगर येथे प्रत्येकी 50 बसेस तर चंदीगड येथे 25 बसचे लोकार्पण मा. पंतप्रधान श्री, नरेन्द्र मोदी यांनी केले. यावेळी त्यांनी हिरवी झेंडी दाखवून विधिवत पद्धतीने चार शहरातील पर्यावरणपूरक बसचे लोकार्पणही केले. पंतप्रधानांनी झेंडी दाखविल्यानंतर कोराडी आगारमध्ये सर्व उपस्थितांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.
लोकार्पणाच्या कार्यक्रमानंतर यावेळी महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी शहराला पर्यावरणपूरक बसेस दिल्याबद्दल पंतप्रधानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात विकासाच्या एका वेगळ्या वाटेवर जात आहे. शहरातील नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी या बसेसचा निश्चितपणे फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे या बसेस पर्यावरणपूरक असल्याने पर्यावरणाचे रक्षण होण्यासही मदत मिळणार आहे. शहरातील दळणवळ व पर्यावरण हे दोन्ही प्रश्न महत्वाचे आहे. या दोन्ही प्रश्नांची जाण ठेऊन पंतप्रधान श्री. नरेन्द्र मोदी यांनी या समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातून शहराला पर्यावरणपूरक बस देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
सर्वप्रथम दीपप्रज्वलनाणे कार्यकमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी महापौर यांनी श्री.बावनकुळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी यांनी केले तर आभार उपायुक्त व परिवहन व्यवस्थापक डॉ. मेघना वासनकर यांनी मानले. यावेळी परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी श्री. योगेश लुंगे, कार्यकारी अभियंता श्री. नरेश सिंघमझोडे, उप अभियंता श्री, दीपक मेश्राम, कन्हैया राठोड, व्यवस्थापक राजू घाटोडे, श्री, गजानन नागूलवार, समीर परमार, अरुण पिंपुरडे व रवींद्र पागे उपस्थित होते,
पालकमंत्री व महापौरांची बसमधून फेरी
लोकार्पणाचा कार्यक्रम संपल्यानंतर पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, महापौर श्रीमती निता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, आमदार श्री. संदीप जोशी,आमदार श्री. कृष्णा खोपडे, सत्ता पक्षनेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांच्यासह नगरसेवकांनी व अधिकाऱ्यांनी नव्या पीएम ई बस मधून बसमधून प्रवास केला.









