Published On : Thu, Feb 12th, 2026
By Nagpur Today Nagpur News

Zee 24 Taas वृत्तवाहिनीने माफी मागावी अन्यथा…; महसूल मंत्री बावनकुळेंचा इशारा

Advertisement

मुंबई : Zee 24 Taas वृत्तवाहिनीने आपल्याविरोधात अप्रमाणित आणि दिशाभूल करणारे वृत्त प्रसारित केल्याचा आरोप करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोणतीही अधिकृत पडताळणी न करता आणि आपली किंवा संबंधित विभागाची बाजू न जाणून घेताच चुकीची कागदपत्रे दाखवून ती आपला निर्णय असल्याचा आभास निर्माण करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

“ही जबाबदार पत्रकारिता नसून ठरवून केलेली बदनामी आहे,” असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. संबंधित प्रकरणात आपण केवळ कायद्यानुसार प्रक्रिया पूर्ण करून सक्षम प्राधिकरणाने निर्णय घ्यावा, इतकाच निर्देश दिला होता, असे त्यांनी सांगितले. अंतिम निर्णय हा कायद्याच्या चौकटीत संबंधित अधिकाऱ्यांनी घेतलेला असतो, असेही त्यांनी नमूद केले.

Gold Rate
Feb 12th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,57,600 /-
Gold 22 KT ₹ 1,46,600 /-
Silver/Kg ₹ 2,64,300 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

एखाद्या निर्णयाबाबत आक्षेप असल्यास न्यायालयीन मार्ग खुला आहे, असे सांगत त्यांनी माध्यमांनी तथ्यांवर आधारित भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

दरम्यान, या प्रकरणी Zee 24 Taas ला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली असून ४८ तासांत संबंधित बातमी मागे घेऊन बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा फौजदारी कारवाईसह १०० कोटींचा दिवाणी बदनामी दावा दाखल केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला. मिळणारी रक्कम राज्याच्या सार्वजनिक हितासाठी वापरली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.या वक्तव्यामुळे राजकीय आणि माध्यम क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement