नागपुरात आरटीओ चालान आकडेवारीत तफावत; 2024 मध्ये दुचाकी–खासगी कारधारकांवरच कारवाई!
नागपूर : कॅलेंडर वर्ष 2024 मधील नागपूर वाहतूक पोलिसांच्या चालानांची माहिती माहितीचा अधिकार (RTI) अंतर्गत समोर आली असून, वाहनप्रकारनिहाय कारवाईत मोठी तफावत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या आकडेवारीनुसार दोनचाकी आणि खासगी कारधारकांवरच सर्वाधिक दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, ऑटोरिक्षा आणि...
नागपूरच्या बुटीबोरी एमआयडीसीतील आवादा कंपनीत दुर्घटना; मृतांचा आकडा ६ वर!
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी एमआयडीसी परिसरात असलेल्या आवादा (Avaada) कंपनीच्या आवारात झालेल्या भीषण दुर्घटनेत मृतांचा आकडा ६ वर पोहोचला असून, अनेक कामगार गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी काम सुरू असतानाच पाण्याची टाकी अचानक कोसळल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक...
रेल्वे प्रवाशांसाठी नवे तिकिट नियम लागू; केवळ मोबाईलवर तिकिट दाखवणे अपुरे ठरणार
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी तिकिटांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला असून अनारक्षित प्रवासासाठी आता तिकिटाची छापील (हार्ड कॉपी) प्रत जवळ बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापुढे केवळ मोबाईल फोनवर तिकिट दाखवून प्रवास करणे ग्राह्य धरले जाणार नाही. हा नियम रेल्वेच्या...
नागपूरजवळील बुटीबोरीतील आवादा कंपनीत अपघात;टँक टॉवर कोसळून तीन कामगारांचा मृत्यू
नागपूर : बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील आवादा (Avaada) कंपनीच्या परिसरात शुक्रवारी दुपारी भीषण अपघात घडला. कंपनीत सुरू असलेल्या कामादरम्यान निर्माणाधीन टँक टॉवर अचानक कोसळल्याने किमान तीन कामगारांचा मृत्यू, तर अनेक मजूर ढिगाऱ्याखाली दबले असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात...
नागपुरात हनीट्रॅपद्वारे खंडणी उकळणारी टोळी जेरबंद;7 पुरुष आरोपींसह 4 महिला आरोपींना अटक
नागपूर :नागपूर शहरात हनीट्रॅपच्या माध्यमातून नागरिकांना अडकवून कोट्यवधींची खंडणी उकळणाऱ्या टोळीवर गुन्हेशाखा व घरफोडी विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात ७ पुरुष आरोपींसह ४ महिला आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, एका ६२ वर्षीय सुज्ञ नागरिकाकडून खंडणी उकळल्याचा धक्कादायक...
आंतरजातीय विवाह केल्याने मुलीला संपत्तीतून वगळले; सुप्रीम कोर्टाचा वडिलांच्या मृत्युपत्राला दुजोरा
मुंबई - आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणावरून मुलीला वडिलांच्या संपत्तीत हिस्सा नाकारण्यात आला आणि हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले. मात्र, सुप्रीम कोर्टानेही वडिलांनी केलेल्या मृत्युपत्रालाच अंतिम मान्यता देत मुलीचा दावा फेटाळून लावला आहे. त्यामुळे उच्च न्यायालय आणि ट्रायल कोर्टाचे पूर्वीचे निर्णय...
महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी: कोणत्या वर्षाचे कर्ज माफ होणार? सरकारकडून नवे संकेत
मुंबई - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी, विशेषतः कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक घडामोड समोर येत आहे. विधानसभा निवडणुकांच्या काळात महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर आता राज्यात शेतकरी कर्जमाफीसंदर्भात हालचाली वेग घेत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन...
नागपुरात हुक्का पार्लरविरोधात भीमसेनेचा आक्रोश; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
नागपूर- नागपूर शहरात बिनदिक्कतपणे सुरू असलेल्या हुक्का पार्लर आणि इतर अवैध व्यवसायांविरोधात भीमसेनेने आज तीव्र आंदोलन करत भव्य मोर्चा काढला. या मोर्चाच्या माध्यमातून भीमसेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांना निवेदन सादर करत, तात्काळ कारवाई न झाल्यास शहरात व्यापक जनआंदोलन...
धारमपेठ झोनमध्ये पाणीपुरवठा पाइपलाईनला वारंवार झालेल्या नुकसानीमुळे तीव्र पाणीपुरवठा खंडित
नागपूर: गेल्या पाच दिवसांत तृतीय पक्ष कंत्राटदाराकडून OCW च्या २०० मि.मी. व्यासाच्या पाणीपुरवठा पाइपलाईनला चार वेळा नुकसान झाले आहे. यामुळे धारमपेठ झोनमधील रामनगर कमांड एरिया (CA) मध्ये पाणीपुरवठा गंभीररीत्या विस्कळीत झाला आहे. या वारंवार घडलेल्या घटनांमुळे रामनगर कमांड एरियाअंतर्गत येणाऱ्या पांढराभोळी,...
नाना पटोलेंमुळे काँग्रेस डबघाईला; अशोक चव्हाण यांचा आरोप
मुंबई : काँग्रेस पक्षाची सध्याची अवस्था चिंताजनक असून या परिस्थितीस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जबाबदार असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे. पक्षातील नेते व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर काँग्रेस सोडून अन्य पक्षांमध्ये, विशेषतः भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने...
देशभरातील विद्यार्थ्यांनी चित्रांद्वारे दिला रस्ते सुरक्षेचा संदेश; केंद्रीय मंत्री गडकरींनी केले कौतुक
नागपूर: रस्ते सुरक्षा विषयावर देशभरातील विविध शाळांतील बालचित्रकारांनी सादर केलेल्या चित्रांचा वापर करून ‘जनआक्रोश – फॉर बेटर टुमारो’ या सामाजिक संस्थेने तयार केलेली 2026 ची अनोखी दिनदर्शिका नुकतीच केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात...
चंद्रपूर मनपा निवडणुकीसाठी भाजपकडून ६०० हून अधिक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
चंद्रपूर : येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूक जाहीर होताच सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, उमेदवार निवडीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. याच अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या वतीने चंद्रपूर...
माणिकराव कोकाटे प्रकरणावरून नाना पटोलेंचा भाजप–महायुतीवर हल्लाबोल
नागपूर : काँग्रेस नेत्या डॉ. प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असतानाच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी भाजप व महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. इतर पक्षांतील नेत्यांना आमिषे दाखवून राजीनाम्यास भाग पाडले जात असल्याचा गंभीर आरोप...
बेलतरोडीतील दुचाकी प्रकरणाचा पर्दाफाश; गुन्हे शाखा युनिट-1ची मोठी कारवाई
नागपूर : बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दुचाकी चोरीच्या प्रकरणाचा गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ ने छडा लावला असून, ऐषआरामी जीवनशैलीसाठी वाहन चोरी करणाऱ्या एका तरुण सराईत आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही चोरी १ जुलै रोजी सकाळी ११ वाजेपासून २...
नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयात बॉम्ब धमकीचा ई-मेल; परिसरात खळबळ!
नागपूर : नागपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात बॉम्ब पेरल्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे. आज १८ डिसेंबर २०२५ रोजी माननीय प्रधान न्यायाधीश, जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर अनोळखी व्यक्तीकडून हा धमकीचा...
अटक वॉरंटनंतर माणिकराव कोकाटेंची प्रकृती खालावली; उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल
नाशिक : सुमारे ३० वर्षांपूर्वीच्या प्रकरणात दोषी ठरलेल्या माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढल्या असून, त्यांच्या अटकेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. न्यायालयाकडून अटक वॉरंट निघाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांची तब्येत बिघडल्याचे समोर येत आहे. रक्तदाबात अचानक वाढ आणि श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने...
कोतवाली परिसरातील श्रद्धा फरसानच्या दुकानातून मोठी चोरी; लाखोंचा माल लंपास
नागपूर - कोतवाली पोलीस हद्दीत श्रद्धा फरसानच्या दुकानात अज्ञात चोरट्याने लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरी करून नेल्याची घटना समोर आली आहे. या दुकानाचा मालक रोहित कश्यप असल्याचे पोलिसांनी सांगितले. राम कुलर चौकाजवळील या दुकानाभोवती असलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि परिसरातील स्ट्रीट लाईट बंद...
धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार? दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ!
मुंबई : खोट्या कागदपत्रांच्या आधारे मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातील काही सदनिका बळकावल्याच्या प्रकरणात मंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा धक्का बसला आहे. सत्र न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवत कोकाटे यांना दोषी ठरवले असून, या निर्णयानंतर नाशिक पोलिसांनी त्यांच्या अटकेचे वॉरंट जारी केले...
पारशिवनीत पालोरा रेती घाटावर तस्करी; कोट्यवधी रुपयांची अवैध रेती वाहतूक उघडकीस
नागपूर : जिल्ह्यातील अवैध रेती तस्करीचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पारशिवनी तहसीलमधील पेंच नदीच्या काठावर असलेल्या पालोरा रेती घाटातून मोठ्या प्रमाणावर रेतीचा उपसा करून कोट्यवधी रुपयांची चोरी करण्यात आल्याचे समोर आले आहे....
बालभारतीच्या बनावट पाठ्यपुस्तकांचा पर्दाफाश; हिंगणा एमआयडीसीतील छापखान्यावर पोलिसांची धाड
नागपूर : शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या मोठ्या फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश करत नागपूर पोलिसांनी हिंगणा एमआयडीसीतील एका छापखान्यावर छापा टाकला. या कारवाईत ‘बालभारती’च्या तब्बल २० हजारांहून अधिक बनावट पाठ्यपुस्तके जप्त करण्यात आली आहेत. बालभारतीचे उत्पादन अधिकारी राकेश पोटदुखे यांनी दिलेल्या गोपनीय...
पृथ्वीराज चव्हाण म्हणजे ‘महाभविष्यवक्ता’; महसूल मंत्री बावनकुळे यांचा उपरोधिक टोला
अमरावती : माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी १९ डिसेंबर रोजी देशाच्या राजकारणात मोठा उलथापालथ होणार असल्याचा दावा करत पंतप्रधान बदलतील आणि मराठी व्यक्ती पंतप्रधान होईल, असे विधान केल्यानंतर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया...





