Published On : Wed, Mar 18th, 2026
By Nagpur Today Nagpur News

विदर्भात हवामानात अचानक बदल; नागपूर-भंडाऱ्यासह ८ जिल्ह्यांत पावसाचा अंदाज

प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
Advertisement

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवार (१८ मार्च) आणि गुरुवार (१९ मार्च) दरम्यान नागपूरसह विदर्भातील अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

नागपूर, भंडारा यांसह विदर्भातील एकूण ८ जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने इशारा जारी केला असून काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. यामुळे प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

सध्या शहरात दिवसासह रात्रीही उकाडा जाणवत असून नागरिकांना कूलर व एसीचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र येत्या काही दिवसांत तापमानात घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील ४ दिवसांत कमाल तापमान ३ ते ५ अंशांनी घसरण्याची शक्यता असल्याने उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळणार आहे.

Gold Rate
Mar 18 2026 - Time 10.31Hrs
Gold 24 KT ₹ 1,56,400/-
Gold 22 KT ₹ 1,45,500 /-
Silver/Kg ₹ 2,49,600/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मंगळवारी नागपूरचे कमाल तापमान ३७.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे सरासरीपेक्षा थोडे जास्त आहे. किमान तापमान २१ अंश सेल्सिअस इतके राहिले असून तेही सरासरीपेक्षा अधिक आहे. मागील २४ तासांत किमान तापमानात किंचित वाढ झाल्याची नोंद आहे.

दरम्यान, बदलत्या हवामानामुळे वादळी वारे आणि अचानक पावसाची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
image.png

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement