राज्यातील काही भागात उन्हाचा तडाखा तर १५ जिल्ह्यांना गारपीटीसह मुसळधार पावसाचा इशारा
नागपूर : महाराष्ट्रात २४ एप्रिलपासून हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता असून, काही भागांत तापमानात तीव्र वाढ, गारपीट आणि पावसाचा सामना करावा लागू शकतो. भारतीय हवामान विभागाने राज्यातील १५ जिल्ह्यांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विदर्भातील उष्णतेचा जोर- अमरावती, चंद्रपूर,...
तुला ठार करणार… भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांना दहशतवादी संघटनेकडून धमकी
नागपूर : देशभरात खळबळ उडवणाऱ्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांना दहशतवादी संघटनेकडून जीव घेण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. आयएसआयएस काश्मीर या संघटनेने...
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये पुन्हा चकमक;एक जवान शहीद
नागपूर : पहलगाममधील भीषण हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील कारवाई अधिक तीव्र झाली आहे. सततच्या शोधमोहिमांदरम्यान उधमपूरच्या बसंतगड परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे. या चकमकीत एक जवान शहीद झाल्याची दुर्दैवी माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांचा छडा लागल्यानंतर सुरू...
सरकारी कर्मचाऱ्यांवर वचक बसणार,कार्यालयातून पळ काढणाऱ्यांची आता खैर नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश
नागपूर : राज्याच्या महसूल विभागात सध्या एकच खळबळ उडाली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या नव्या आदेशामुळे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर नियंत्रण आणले जाणार आहे. वरिष्ठांची पूर्वपरवानगी न घेता कार्यालयातून अनुपस्थित राहणाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई केली जाईल, असे स्पष्ट...
नागपुरात अंधश्रद्धेच्या नावाखाली विकृतीचा कळस;भोंदूबाबाकडून तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार
नागपूर : अंधश्रद्धेच्या आड सामाजिक अधःपतनाला कारणीभूत ठरणारी एक संतापजनक घटना नागपूरमध्ये समोर आली आहे. 'पैशांचा पाऊस' पाडण्याच्या आमिषाने भोंदूबाबाने मध्यरात्री नग्नपूजेसारख्या विकृत विधीचे आयोजन करून तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी...
पाकिस्तानला जबर धक्का;भारताची निर्णायक पावले, काय असतील परिणाम?
नागपूर:मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम परिसरात घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 28 निष्पाप लोकांचा बळी गेला. या भ्याड कृत्याची जबाबदारी काही दहशतवादी संघटनांनी घेतली असली, तरी भारताने थेट पाकिस्तानलाच दोषी धरलं आहे. या घटनेनंतर अवघ्या 24 तासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ‘सुरक्षा समिती’ची...
बुलढाणा जिल्ह्यातील जिगांव प्रकल्पातील अडथळे दूर करून प्रकल्प पूर्णत्वास आणण्याचा प्रयत्न – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर : बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील जिगांव प्रकल्प हा विदर्भातील जलसिंचनाच्या दृष्टीने एक महत्वाचा प्रकल्प आहे. यामुळे शेती उत्पादनात वाढ आणि शेतक-यांच्या जीवनमानात सुधारणा होणार आहे. हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे. नियमानुसार कार्यवाही करीत जिगाव प्रकल्पातील अडथळे लवकरच...
पहलगाम हल्ल्यावरून राजकारण नको, सरकारच्या पाठिशी उभे राहा; चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन
नागपूर: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर करण्यात आलेला भ्याड हल्ला ही अत्यंत हृदयद्रावक घटना असून, समाजमनाला हादरवणारी आहे. अशा संवेदनशील प्रसंगी काही जण राजकारण करून स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत, ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया महसूलमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री...
महापालिकेतर्फे 74 प्रतिभावंत खेळाडूंना आर्थिक सहाय्य
नागपूर,ता : नागपूर शहरातील प्रतिभावंत खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडूंकरिता उडान खेल प्रोत्साहन योजने’च्या माध्यमातून मनपाद्वारे 74 खेळाडूंना 57लक्ष 89 हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्यात आले. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ....
सोन्याच्या दरात उधळण; नागपुरात दहा ग्रॅमचा भाव १.०१ लाखांच्या पुढे
नागपूर: शेअर बाजारातील अस्थिरता आणि देशातील राजकीय घडामोडींमुळे सोन्याचे दर सातत्याने वाढत आहेत. मंगळवारी पुन्हा एकदा सोन्याच्या किमतींनी नवा उच्चांक गाठला. सोमवारीच्या तुलनेत मंगळवारी २४ कॅरेट शुद्ध सोन्याच्या दरात तब्बल १,५०० रुपयांची वाढ झाली. नागपुरात ३ टक्के जीएसटीसह दहा ग्रॅम...
नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेची परीक्षा, कूलर गायब, पंखेही निष्क्रिय!
नागपूर – शहरात तापमान 44 अंश सेल्सिअसवर पोहोचले असताना नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांना कूलरशिवाय परीक्षा द्यावी लागत आहे. काही केंद्रांवर पंखे असूनही ते केवळ फिरत असल्याचे आणि थंडावा देत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. काही पंखे पूर्णपणे बंद आहेत, तर...
नागपूरच्या इमामवाडा पोलीस ठाण्याच्या लॉकअपमधून पळालेला आरोपी पुन्हा अटकेत
नागपूर: इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी एक खळबळजनक घटना घडली. बलात्काराच्या आरोपाखाली असलेल्या आरोपीने पोलिसांना चकवा देऊन थेट पोलीस ठाण्यातून पळ काढण्याचे धाडस केले. सुमारे दीड तासाच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली. या आरोपीचे नाव विवेक बडोले (रामबाग) असून...
नागपुरात उद्धव ठाकरे गट आक्रमक;पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन
नागपूर: जम्मू काश्मीरमधील बैसरन व्हॅली येथे निरपराध भारतीय पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शहरप्रमुख नितीन तिवारी यांच्या नेतृत्वाखाली बर्डी येथील गांधीपुतळ्यासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. या वेळी शिवसैनिकांनी “पाकिस्तान मुर्दाबाद”, “आतंकवाद बंद करो”, “भारत...
नागपुरात फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई; आरोपीला अटक
नागपूर -कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मोठ्या फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश करत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात फिर्यादी सैय्यद फरहान सय्यद फिरोज (वय ३०, रा. भोसा रोड, यवतमाळ, सध्या रहिवासी नेताजी नगर, कळमणा, नागपूर) हे टी.एम.टी. लोखंडाचे व्यापारी...
नागपुरातील उमरेडमध्ये सेक्स रॅकेटचा भांडाफोड, महिलेला अटक
नागपूर: उमरेडमधील जिंदाल कॉम्प्लेक्समधील एका फ्लॅटमधून सेक्स रॅकेट चालवत असल्याच्या आरोपावरून एका महिलेला अटक करण्यात आली आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर उमरेड पोलिसांनी २० एप्रिल रोजी एका बनावट ग्राहकाला त्या ठिकाणी पाठवले. त्यानंतर बेकायदेशीर प्रकार चालू असल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी...
काँग्रेस आमदार विकास ठाकरेंच्या प्रयत्नांना यश; सुरेंद्रगड परिसरात सिटी बस सेवा सुरू
नागपूर:सुरेंद्रगड वासियांची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली असून, २१ एप्रिलपासून गुप्ता चौक ते सदर दरम्यान सिटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. सुरेंद्रगड ही मोठी वस्ती असूनही येथे सार्वजनिक वाहतुकीचा अभाव होता. त्यामुळे येथील नागरिकांना गिट्टीखदान व वेटरनरी कॉलेज...
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हल्लेखोरांचे फोटो व्हायरल !
पहलगाम: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम परिसरात पर्यटकांवर केलेल्या निर्घृण हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, चारही दहशतवाद्यांचे स्पष्ट फोटो समोर आले आहेत. लष्कराच्या गणवेशात सज्ज आणि AK-47 रायफल्ससह उभे असलेल्या या दहशतवाद्यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. सुरक्षा यंत्रणांनी याआधी या चार...
नागपूरला उष्णतेची झळ; तापमान 44.2 अंशांवर, 25 एप्रिलपर्यंत ‘यलो अलर्ट’!
नागपूर: नागपूर शहर सध्या तीव्र उष्णतेच्या झळा सोसत आहे. मागील काही दिवसांपासून शहरात प्रचंड उकाडा जाणवतो आहे. मंगळवारी (22 एप्रिल) नागपूरचे तापमान 44.2 अंश सेल्सिअसवर पोहोचले. हे तापमान सरासरीहून तब्बल 3 अंशांनी अधिक आहे. हवामान विभागाने 25 एप्रिलपर्यंत नागपूरमध्ये ‘हिट...
सेन्सेक्सने 80 हजारांचा टप्पा ओलांडला, 500 अंकांनी वाढ; निफ्टीत 150 अंकांची उडी
मुंबई— भारताच्या शेअर बाजाराने आज ऐतिहासिक कामगिरी केली. बीएसई सेन्सेक्सने प्रथमच 80 हजार चा टप्पा ओलांडत 500 अंकांची उसळी घेतली, तर एनएसई निफ्टीनेही 150 अंकांनी वधारून बाजारात उत्साह निर्माण केला. या तेजीमागे भारत आणि अमेरिकेतील संभाव्य व्यापार करारासंदर्भातील सकारात्मक संकेत...
जम्मू काश्मीर पहलगाम दहशतवादी हल्ला: नागपूरहून गेलेले पर्यटक थोडक्यात बचावले
नागपूर: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करत किमान २६ जणांचा बळी घेतला. तर १० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातील नागरिकांचाही समावेश आहे. हल्ल्याच्या वेळी नागपूरहून गेलेले काही पर्यटकही घटनास्थळी उपस्थित होते आणि ते थोडक्यात...
नागपूरच्या सिव्हिल लाईन्स येथे सरकारी गोदामाला आग; कोट्यवधींचा माल वाचला
नागपूर : उन्हाळ्याच्या तोंडावर शहरात आग लागण्याच्या घटना सातत्याने वाढताना दिसत आहेत. मंगळवारी रात्री ८.३० वाजता नागपूरच्या सिव्हिल लाईन्स येथील लोकनिर्माण विभागाच्या क्र. ३ कार्यालयाच्या मागील सरकारी गोदामात अचानक आग लागली. गोदामात महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागांचा मौल्यवान माल साठवलेला होता. या...