Published On : Wed, Apr 23rd, 2025
By Nagpur Today Nagpur News

सोन्याच्या दरात उधळण; नागपुरात दहा ग्रॅमचा भाव १.०१ लाखांच्या पुढे

नागपूर: शेअर बाजारातील अस्थिरता आणि देशातील राजकीय घडामोडींमुळे सोन्याचे दर सातत्याने वाढत आहेत. मंगळवारी पुन्हा एकदा सोन्याच्या किमतींनी नवा उच्चांक गाठला. सोमवारीच्या तुलनेत मंगळवारी २४ कॅरेट शुद्ध सोन्याच्या दरात तब्बल १,५०० रुपयांची वाढ झाली.

नागपुरात ३ टक्के जीएसटीसह दहा ग्रॅम सोन्याची किंमत १,०१,९७० रुपयांवर पोहोचली आहे. सामान्य ग्राहकांसाठी ही दरवाढ डोकेदुखी ठरत आहे. केवळ दोन दिवसांत सोन्याचा भाव तोळ्यामागे ३,२०० रुपयांनी वाढल्याचे पाहायला मिळाले. मंगळवारी सकाळी सोन्याच्या दरात १,९०० रुपयांची वाढ झाली होती, मात्र दुपारपर्यंत किंमतीत ४०० रुपयांची घसरण झाली आणि दर ९९ हजारांपर्यंत खाली आला.

Gold Rate
19 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,300 /-
Gold 22 KT ₹ 1,02,600 /-
Silver/Kg ₹ 1,29,600/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूरमधील प्रमुख सराफा दुकानांमध्ये २४ कॅरेट सोन्याचे दहा ग्रॅम ३ टक्के जीएसटीसह १,०१,९७० रुपयांना विकले गेले. चांदीही महागली असून प्रति किलो चांदीचा दर ९९,९१० रुपयांवर स्थिर आहे.

सोने-चांदी दर (३% जीएसटीसह)
दिनांक — सोने (१० ग्रॅम) — चांदी (प्रति किलो)
१९ एप्रिल — ₹९८,६७४ — ₹९९,१८९
२१ एप्रिल — ₹१,००,४२५ — ₹९९,९१०
२२ एप्रिल — ₹१,०१,९७० — ₹९९,९१०

Advertisement
Advertisement