पुढच्या वर्षी लवकर या! नागपुरात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात सुरूवात
नागपूर: गणपती बाप्पा मोरया.... पुढच्या वर्षी लवकर या' 'गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला' अशा भावपूर्ण घोषणात, ढोल- ताशांच्या गजरात संपुर्ण महाराष्ट्रातील गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यास सुरूवात केली आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी आता नागपूरकर महापालिका, पोलिस वाहतूक शाखा...
बाप्पांच्या निरोपाची तयारी पूर्ण ; २११ ठिकाणी ४१३ विसर्जन तलाव
नागपूर: गुरूवारी २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला श्रीगणेशाचे विसर्जन होणार आहे. नागपूरकरांनी स्थापना केलेल्या लाडक्या बाप्पांच्या निरोपाची मनपाद्वारे तयारी पूर्ण झालेली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात शहरातील...
पंचशील टॉकीज जवळील नाग नदीवरील नुकसानग्रस्त पुलाची होणार पुनर्बांधणी
नागपूर : नागपूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती अशात पंचशील चौक येथे नाग नदीवर असणाऱ्या पुलाचा काही भाग कोसळला होता. आता या पुलाचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. पुलाचा बांधकामासाठी जवळपास...
नागपुरात बाप्पांचे विसर्जन आणि ईदच्या मिरवणुकीदरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात
नागपूर: गणपती विसर्जन तसेच ईद-ए-मिलादनिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त आमितेश कुमार यांनी आढावा बैठक घेतली.गणपती विसर्जन आणि ईद मिरवणुकीवर नागपूर पोलिसांची करडी नजर असणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. यंदा पाच हजारांहून...
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची ‘या’ दिवशी होणार अंतिम सुनावणी
मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाची सुनावणी कधी होणार याची प्रतिष्ठा ठाकरे गट आणि शिंदे गटाला आहे. या प्रकरणाच्या सुनावणीचे वेळापत्रक समोर आले आहे. 6 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबर...
Video: नागपुरात महिलेसह दोन एमडी तस्करांना अटक ; 364.49 ग्रॅम एमडी जप्त
नागपूर : शहरातील एका महिलेसह दोन एमडी तस्करांना पोलिसांनी अटक केली. प्रीती नीलेश गजभिये आणि ललित उर्फ विकी युवराज चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या महिला एमडी तस्करांची नावे आहेत. दोन्ही आरोपींकडून सुमारे 38 लाख 54 हजार 315 रुपयांचा एमडीसह 37...
नागपूर पाण्यात बुडाले अन् तुम्ही सिनेकलाकारांसोबत घरात उत्सव साजरा करताय; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल !
मुंबई : शुक्रवारी रात्री आलेल्या मुसळधार पावसाचे नागपुरात पूरजन्य परिस्थितीत निर्माण झाली. त्यामुळे नागरिकांच्या घरांमध्ये दुकानांमध्ये पाणी जाऊन मोठे नुकसान झाले. एकीकडे नागपूर पाण्यात बुडालंय आणि तुम्ही सिनेकलाकारांसोबत घरात उत्सव साजरा करताय अशा शब्दात ठाकरे गटाचे...
कोळसा खाणवाटप घोटाळा: माजी खासदारासह मुलाच्या चार वर्षांच्या शिक्षेला स्थगिती !
नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटपातील अनियमिततेच्या प्रकरणात माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा आणि व्यापारी मनोज कुमार जयस्वाल यांच्या चार वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिली. न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांनी याचिकांना...
नागपूर कोणी बुडवले? ठाकरे गटाचा सामना आग्रेलखातून संतप्त सवाल
नागपूर : दोन दिवसांपूर्वी नागपुर शहराला मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे संपूर्ण शहर जलमय झाले होते. पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. यामुळेच तलावाचे पाणी लोकांच्या घरात आणि दुकानांमध्ये शिरले. यावरुन आता राजकीय वर्तुळातही आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे...
नागपुरात शिक्षा भोगत असलेला गँगस्टर अरुण गवळी जेलबाहेर, 28 दिवसांचा फर्लो मंजूर !
नागपूर : मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड अरुण गवळी पुन्हा जेलबाहेर आला आहे. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने गवळीला 28 दिवसांचा फर्लो मंजूर झाला आहे. अरुण गवळी यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्या सुटकेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती...
ऑनलाइन फसवणूक प्रकरण; सोंटू जैनचा जामीन अर्ज नागपूर हायकोर्टाने फेटाळला
नागपूर : ऑनलाइन गेमिंग’ अॅपच्या माध्यमातून व्यापाऱ्याची कोट्यवधीची फसवणूक प्रकरणातील आरोपी सोंटू जैनचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी फेटाळला. सोंटूच्या वकिलाने सोमवारी सुमारे ६५ मुद्यांसह अतिरिक्त प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल केले आहे. उच्च न्यायालयाने ५ सप्टेंबरला सोंटू जैनला अंतरिम अटकपूर्व...
महाराष्ट्रात राहता तर दुकानांवर मराठी पाट्या लावा ; सुप्रीम कोर्टाचे आदेश
नवी दिल्ली : दसरा-दिवाळीपूर्वी दुकानांवर मराठी पाट्या लावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने व्यावसायिकांना दिले आहे. न्यायालयीन लढाईऐवजी मराठी पाट्यांवर पैसे खर्च करा. याचिकाकर्त्यांनी मराठी पाट्यांच्या मुद्द्याला कट्टरपणाचा किंवा परप्रांतीयांविषयीच्या तिरस्काराचा रंग देऊ नये.त्यांनी न्यायालयीन लढाईवर खर्च करण्याऐवजी साध्या मराठी पाट्यांवर...
नागपूरचे माजी नगरसेवक नितीश ग्वालवंशी यांचे दीर्घ आजाराने मुंबईच्या रुग्णालयात निधन
नागपूर : शहरातील गिट्टीखदान भागात दोन वेळा नगरसेवक राहिलेले नितीश ग्वालवंशी यांचे सोमवारी दीर्घ आजाराने निधन झाले.मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ४५ वर्षाचे होते. बोरगाव येथील बुपेश नगर येथे राहणारे आणि गंगाप्रसाद ग्वालवंशी यांचे पुत्र नितीश...
नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ब्रम्हाशंकर त्रिपाठी तर सरचिटणीस म्हणून बोरकर यांची निवड !
नागपूर : नागपूर श्रमिक पत्रकार संघाची (२०२३-२५) ची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली आहे. ब्रह्माशंकर त्रिपाठी (लोकमत टाइम्स) अध्यक्षपदी, शिरीष बोरकर (द हितवाडा) सरचिटणीसपदी निवडून आले आहे. परितोष प्रामाणिक (हितवाद) आणि अनंत मुळ्ये (तरुण भारत) उपाध्यक्ष; मोरेश्वर मानापुरे (लोकमत) कोषाध्यक्ष;...
नागपुरात पुरामुळे लोकांचे संसार उध्वस्त झाले,पण सरकारला घेणेदेणे नाही; विलास मुत्तेमवारांचे टीकास्त्र
नागपूर : शहरात शुक्रवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. अनेकांच्या घरात, दुकानांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांना मोठे नुकसान झाले आहे. मात्र हे सर्व काही सत्ताधारी भाजपच्या भ्रष्ट आणि अनियंत्रित कारभारामुळे झाल्याचा घणाघात माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांनी...
येड्या सरकारचे लोकप्रतिनिधी पत्रकारितेला खरेदी करू पाहताय; नाना पटोले नागपुरात संतापले
नागपूर : पत्रकारांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, त्यांना चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला असं म्हणत त्यांना धाब्यावरही घेऊन जा, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या दिला...
शरद पवार-अदानीच्या भेटीमुळे काँग्रेसला फरक पडत नाही; नाना पटोलेंचे नागपुरात विधान
नागपूर : एकीकडे 'इंडिया' आघाडीचे प्रमुख नेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशाचे धनाढ्य उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरोधात आवाज उठवला आहे. तर दुसरीकडे 'इंडिया' आघाडीतले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अहमदाबादेत जाऊन अदानी यांची भेट घेतली. ...
पत्रकारिता इतकी खालावली का? चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘त्या’ सल्ल्याने चर्चेला उधाण
नागपूर : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगर येथे पदाधिकाऱ्यांना दिलेल्या एका सल्ल्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. पत्रकारांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, त्यांना चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच...
जेव्हा पंतप्रधान मोदींनी RBI चे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांची केली होती सापाशी तुलना…!
नागपूर: माजी अर्थ सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी त्यांच्या 'वुई ऑल्सो मेक पॉलिसी' या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल मोठा खुलासा केला आहे. माजी वित्त सचिव गर्ग यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, पीएम मोदींनी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित...
नागपूरकरांना सतर्कतेचा इशारा; वीज पडण्याच्या धोक्यापासून रहा सावधान !
नागपूर: शहरात काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. या मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. त्यामुळे नागपूरच्या काही भागात पाणी साचल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले.आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर यायला लागली आहे. पूर ओसरायला लागला आहे. यातून नागरिक सावरत असतानाच...
केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांचा निर्धार : स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेद्वारा संचालित डायग्नॉस्टिक्स सेंटरचे भूमिपूजन
नागपूर : नागपूरसह संपूर्ण विदर्भातील गरिबांना अत्यल्प दरात आंतरराष्ट्रीय दर्जाची आरोग्यसेवा पुरविण्याचे माझे स्वप्न आहे. उत्तर नागपुरातील डायग्नॉस्टिक्स सेंटर हे या दिशेने पहिले पाऊल आहे. आमचा हा प्रकल्प पूर्णपणे गरीब व गरजू नागरिकांना समर्पित असणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते...