Published On : Thu, Sep 28th, 2023

पुढच्या वर्षी लवकर या! नागपुरात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात सुरूवात

Advertisement

नागपूर: गणपती बाप्पा मोरया…. पुढच्या वर्षी लवकर या’ ‘गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला’ अशा भावपूर्ण घोषणात, ढोल- ताशांच्या गजरात संपुर्ण महाराष्ट्रातील गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यास सुरूवात केली आहे.

बाप्पाला निरोप देण्यासाठी आता नागपूरकर महापालिका, पोलिस वाहतूक शाखा यासह सर्व सरकारी यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. नागपुरात ठिकठिकाणी आज तरुणांचा जल्लोष बघायला मिळणार आहे. विसर्जनाच्या तयारीसाठी शहरातील महत्वाचे रस्ते बंद करण्यात आले आहेच. तर विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आले आहे.

गेल्या दहा दिवसांपासून गणेश भक्तांना सकारात्मक उर्जा व आनंद देणार्‍या गणरायाला निरोप देतांना गणेशभक्त भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले.

ढोल ताशा पथकं एकत्र जमायला सुरूवात-
गेल्या तीन महिन्यांपासून ढोल ताशा पथकांचा सराव सुरु होता. हे शेकडो वादक विसर्जन मिरवणुकीच्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होते. त्यामुळे पथक नागपूरच्या मध्यवर्ती भागात वादनासाठी एकत्र जमायला सुरुवात झाली आहे.