इलेक्ट्रिक वाहनांसाठी नागपूर परिमंडलात 44 चार्जिंग स्टेशन्स
नागपूर - राज्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठीच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी महावितरणला राज्याची नोडल एजन्सी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. महावितरणच्या पुढाकाराने नागपूर परिमंडलात एकूण 44 चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात आली आहेत. यात महावितरणच्या स्वतःच्या नागपुरातील 6 चार्जिंग स्टेशन्सचा समावेश आहे, याशिवाय नागपूर...
मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या विरोधात ओबीसी मुक्ती मोर्चाची उच्च न्यायालयात धाव
नागपूर : मराठा समाजाचा ‘ओबीसी’मध्ये समावेश करण्याचा राज्य सरकारचा निर्णय घटनाबाह्य असून याविरोधात ओबीसी मुक्ती मोर्चाचे मुख्य संयोजक नितीन चौधरी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. विविध न्यायालयीन निर्णयांमध्ये मराठा समाज कुणबी (ओबीसी) नसल्याचे स्पष्ट करण्यात...
ओबीसींचे बोगस जात प्रमाणपत्र सरसकट वाटले जात असल्याने एसआयटी मार्फत चौकशी करा, विजय वडेट्टीवार यांची नागपुरात मागणी
नागपूर : ओबीसींचे बोगस जात प्रमाणपत्र सरसकट वाटले जात आहे. मागील अनेक वर्षांपासून ही प्रमाणपत्रे वाटण्यात येत आहे. शा सर्व प्रमाणपत्रांची एसआयटी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी नागपुरात केली. सरकारकडून ओबीसी समाजाची...
नागपुरातील पूरग्रस्तांसाठी हिवाळी अधिवेशनात विशेष पॅकेजची होणार घोषणा ; मंत्री अनिल पाटील यांची माहिती
नागपूर : शहरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे अनेकांच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले. आतापर्यंत पूरग्रस्तांचे साडेबारा हजार पंचनामे पूर्ण झाले असून हा आकडा १७ हजारांपेक्षा अधिक वाढू शकतो. २ ऑक्टोबरपर्यंत पंचनामे पूर्ण करून त्यानंतर...
हे 5 नियम उद्यापासून बदलणार… तुमच्यासाठी किती महत्त्वाचे हे जाणून घ्या
नागपूर : आज सप्टेंबर महिन्याचा शेवटचा दिवस असून उद्यापासून ऑक्टोबर 2023 सुरू होणार आहे. दर महिन्याप्रमाणे हा नवा महिनाही अनेक मोठे बदल (1 ऑक्टोबरपासून नियम बदल) घेऊन येत आहे. ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. एकीकडे, स्वयंपाकघरातील बजेटमध्ये...
व्हिडिओ: नागपूरच्या एक्सप्लोर गेमिंग झोन आगीच्या विळख्यात ;अग्निसुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम?
नागपूर: उद्घाटनाच्या अवघ्या काही आठवड्यांनंतर, Xplore - वाडी रोड, हिंगणा येथील गेमिंग झोन आगीच्या विळख्यात सापडल्याने एकच खळबळ निर्माण झाली. हे पार्क नागपूरचे सर्वात मोठे मनोरंजन पार्क म्हणून ओळखले जाते. आगीचे नेमके कारण अद्यापही समोर आले नसून सुदैवाने ही घटना...
मतदान करायचे असेल तर करा, पण माल-पाणी मिळणार नाही; लोकसभेसभा निवडणुकीसाठी गडकरींचा अजेंडा !
वाशीम : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवार, २९ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील वाशिम येथे ३,६९५ कोटी रुपयांच्या ३ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीबाबतही मत व्यक्त केले. ते म्हणाले की,...
1 ऑक्टोबरला नागपूरकरांचे स्वच्छतेसाठी एक तास श्रमदान
नागपूर : देशाचे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी जाहिर केलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानांतर्गत १ ऑक्टोबरला नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सहकार्याने शहरातील विविध भागांमध्ये स्वच्छतेसाठी एक तास श्रमदान करण्यात येणार आहे. शहरातील सर्व आमदार, माजी खासदार, माजी नगरसेवक तसेच...
मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी साधला पुरग्रस्तांशी संवाद
नागपूर: नागपूर शहरात शुक्रवारी २२ सप्टेंबरला मध्यरात्रीनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पुरसदृश्य परिस्थितीमुळे बाधित पुरग्रस्त भागाची महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री श्री. अनिल पाटील यांनी शुक्रवारी (२९ सप्टेंबर) सकाळी पाहणी केली. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी,...
अनुसूचित जमातीतून धनगरांना आरक्षण देण्याला विरोध ;आदिवासी संघटनांचे संविधान चौकात साखळी उपोषण सुरु
नागपूर : भटक्या संवर्गाच्या महाराष्ट्रातील ३.५ टक्के आरक्षणात गैरआदिवासी धनगरांना भटक्या संवर्गात आरक्षण देण्यावरून आदिवासी समाजाने विरोधाची भूमिका घेतली. यापार्श्वभूमीवर समविचारी संघटनांची वज्रमुठ बांधून संयुक्त आदिवासी कृती समितीच्या माध्यमातून नागपुरातील संविधान चौकात साखळी उपोषणाला सुरूवात करण्यात आली आहे. धनगरांना अनुसूचित...
सुप्रीम कोर्टात विधानसभा अध्यक्षांविरोधात ठाकरे गटाची याचिका? १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा पेटला
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या शिवसेनेतील १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरच अंतिम निकाल येण्याची चिन्हे दिसत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने अपात्रतेच्या निर्णयाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून होणाऱ्या दिरंगाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. शिवसेना...
भाजपचा ‘मास्टर प्लॅन’ तयार; ‘या’ पाच राज्यातील निवडणुकांसाठी कसली कंबर !
नवी दिल्ली : मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये वर्षाच्या शेवटी निवडणुका होणार आहेत. लवकरच निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जातील. या निवडणुकांच्या अनुषंगाने गुरुवारी रात्री भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत भाजपचा 'मास्टर...
सरकारने ओबीसींसोबत बोलावलेल्या बैठकीवर नागपुरातील कुणबी समाजाचा बहिष्कार
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळावे म्हणून जरांगे पाटील यांनी आंदोलन केले.मात्र याला ओबीसींनी विरोध केला. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सरकारने ओबीसींना चर्चेला बोलावले आहे. यापूर्वी...
पुलाच्या बांधकामासाठी झाशी राणी चौक ते पंचशील चौकची वाहतूक ४ महिने राहणार बंद !
नागपूर : शहरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. अनेक परिसरात पाणी शिरले. मुसळधार पावसामुळे पंचशील चौक येथील नाग नदीवरच्या पुलाचा काही भाग कोसळला होता. या पुलाचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत पुनर्बांधणी करणार आहे. याकरिता झाशी राणी चौक ते...
नागपुरात हत्यांचे सत्र सुरूच; कळमना येथे किरकोळ वादातून युवकाची हत्या !
नागपूर : शहरात गुन्हेगारींच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे.नुकतीच बजाज नगर पोलीस ठाण्यांतर्गत विवेकानंद स्मारकाजवळ काल २१ वर्षीय तरुणाने आपल्याच वडिलांची हत्या केली. हे प्रकरण ताजे असताना कळमना पोलीस स्टेशन अंतर्गत धर्म नगर...
नागपूर महानगर पालिकेचा उपक्रम ; विसर्जनानंतरच्या मातीतून घडणार नव्या मूर्ती !
नागपूर: गणेश विसर्जनानंतर तयार झालेला गाळ आणि कचरा वेगळा करून उरलेल्या मातीतून नव्या मूर्ती घडवण्यात याव्या, यासाठी नागपूर महापालिका प्रयत्नशील आहे. पालिकेकडून ही माती पारंपारिक मूर्तीकारांना देण्यात येणार आहेत. यासंदर्भात माहिती नागपूर महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या...
नागपूरचा राजाची ढोल- ताशांच्या गजरात निघाली विसर्जन मिरवणूक !
नागपूर : राज्यभरात आज दहा दिवसाच्या उत्सवानंतर बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात येत आहे. आज आपले लाडके बाप्पा निरोप घेणार असल्यामुळे त्यांचे भक्त भावुक झाले आहेत.तरीही बाप्पाला निरोप देण्याची तयारी झाली असून सर्वत्र मिरवणुका निघण्यास सुरुवात झाली आहे....
‘हरित क्रांतीचे जनक’ एम. एस. स्वामीनाथन यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन
चेन्नई : भारतात आलेल्या हरित क्रांतीचे जनक ज्येष्ठ शेतीतज्ज्ञ व सुप्रसिद्ध वैज्ञानिक एम. एस. स्वामीनाथन यांचं गुरुवारी निधन झाले आहे. ते ९८ वर्षांचे होते. २००४ साली स्वामीनाथन यांना राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही नियुक्त करण्यात आले होते. ...
आईसोबत होणाऱ्या छळाचा राग ; नागपूरच्या बजाज नगरमध्ये मुलाने केली वडिलांची हत्या !
नागपूर : आईसोबत होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून एका २१ वर्षीय तरुणाने गुरुवारी पहाटे बजाज नगर पोलीस ठाण्यांतर्गत विवेकानंद स्मारकाजवळ वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संजय शंकरराव निधेकर (४७, रा. सुभाष नगर) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी मुलगा...
भाजपमध्ये नाही तर काँग्रेसमध्येच स्फोट होणार; चंद्रशेखर बावनकुळेंचे नाना पटोलेंना प्रत्युत्तर
नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका करत लवकरच पक्षात मोठी फूट पडणार असल्याचा दावा केला होता. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले. नाना पटोले यांना भाजप समजली नाही त्यामुळे भाजप सोडून कॉंग्रेसमध्ये...
मराठा आरक्षण : महाराष्ट्रात भाजप सरकारच्या अडचणीत होणार वाढ !
नागपूर : महाराष्ट्रात मराठा ओबीसी आरक्षणावरून वाढत्या तणावादरम्यान, राज्यातील भाजप सरकार अडचणीत सापडले आहे. एकीकडे मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी जातीचे दाखले देण्याची घोषणा करणे भाग पडले, पण दुसरीकडे या निर्णयामुळे राज्यभरातील, विशेषतः विदर्भातील ओबीसींच्या मूळ मतदारांमध्ये नाराजी आहे. महाराष्ट्रातील कुणबी...