Published On : Wed, Sep 27th, 2023
By Nagpur Today Nagpur News

पंचशील टॉकीज जवळील नाग नदीवरील नुकसानग्रस्त पुलाची होणार पुनर्बांधणी

नागपूर : नागपूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती अशात पंचशील चौक येथे नाग नदीवर असणाऱ्या पुलाचा काही भाग कोसळला होता. आता या पुलाचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. पुलाचा बांधकामासाठी जवळपास ६ कोटी खर्चाचा अंदाज असनू, याकार्यास किमान ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता श्री. नरेश बोरकर यांनी दिली.

नुकसानग्रस्त पुलाबद्दल श्री. नरेश बोरकर यांनी सांगितले की, पंचशील चौक ते झाशी राणी चौक या दरम्यान नाग नदीवर हा पुल बांधण्यात आला होता. ज्याची १९७४ साली रुंदीकरण व सुधारणा करण्यात आली होती. गेल्या शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओवरफ्लो झाल्याने नाग नदीला पूर आला आणि या पुरामुळे पुलाचा काही भाग क्षतिग्रस्त झाला आणि नदीत कोसळला. तेव्हापासून पुलावरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे. आता भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत पुलाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी जवळपास ६ कोटी रुपय इतका खर्च अपेक्षित असून, संपूर्ण कार्य पूर्ण होण्यासाठी किमान ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

Gold Rate
May 04- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,50,400 /-
Gold 22 KT ₹ 1,39,900 /-
Silver/Kg ₹ 2,47,300/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सध्या पुलावरील वाहतूक पूर्णतः बंद असून, हलक्या वाहनांसाठी वाहतूक खुली करण्याकरिता प्रत्यन करण्यात येणार आहेत. पुलाची पाहणी केली असून, नुकसानग्रस्त भागाला सिमेंटच्या काठ्याने बंद करण्यात येऊन काही भाग वाहतुकीस खुला करण्याची शक्यता पडताळणी करण्यात येणार असल्याचेही श्री. बोरकर यांनी सांगितले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement