Published On : Sat, Sep 30th, 2023
By Nagpur Today Nagpur News

मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या विरोधात ओबीसी मुक्ती मोर्चाची उच्च न्यायालयात धाव

Advertisement

नागपूर : मराठा समाजाचा ‘ओबीसी’मध्ये समावेश करण्याचा राज्य सरकारचा निर्णय घटनाबाह्य असून याविरोधात ओबीसी मुक्ती मोर्चाचे मुख्य संयोजक नितीन चौधरी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

विविध न्यायालयीन निर्णयांमध्ये मराठा समाज कुणबी (ओबीसी) नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. असे असताना सरकार मराठा समाजाला कुणबी म्हणून मान्यता देण्याचे प्रयत्न करीत आहे. मराठा समाज हा कुणबी असल्याचे सिद्ध करणारे दस्तावेज, करार व इतर ऐतिहासिक पुरावे शोधण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय ७ सप्टेंबर २०२३ रोजी जारी करण्यात आला आहे. हा निर्णय अवैध आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

Gold Rate
24 May 2025
Gold 24 KT 96,300/-
Gold 22 KT 89,600/-
Silver/Kg 98,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याचिकेत या तिघांना केले प्रतिवादी याचिकेमध्ये सामान्य प्रशासन, इतर मागास बहुजन कल्याण व सामाजिक न्याय या तीन विभागाच्या मुख्य सचिवांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. भूपेश पाटील कामकाज पाहतील.

राज्य सरकारने १ जून २००४ रोजी निर्णय जारी करून इतर मागासवर्गाच्या यादीमध्ये कुणबी जातीच्या उपजाती म्हणून मराठा कुणबी व कुणबी मराठाचा समावेश केला आहे; परंतु, मराठा समाजाचे नागरिक ही जात सिद्ध करण्यात अपयशी ठरत आहेत. जात प्रमाणपत्र कायद्यातील कलम आठ अनुसार संबंधित व्यक्तीने स्वत:ची जात स्वत: सिद्ध करणे आवश्यक आहे, हे देखील याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement