Published On : Sat, Sep 30th, 2023
By Nagpur Today Nagpur News

व्हिडिओ: नागपूरच्या एक्सप्लोर गेमिंग झोन आगीच्या विळख्यात ;अग्निसुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम?

नागपूर: उद्घाटनाच्या अवघ्या काही आठवड्यांनंतर, Xplore – वाडी रोड, हिंगणा येथील गेमिंग झोन आगीच्या विळख्यात सापडल्याने एकच खळबळ निर्माण झाली. हे पार्क नागपूरचे सर्वात मोठे मनोरंजन पार्क म्हणून ओळखले जाते. आगीचे नेमके कारण अद्यापही समोर आले नसून

सुदैवाने ही घटना पहाटेच्या सुमारास घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.आग वझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे कार्य सुरु आहे.

Gold Rate
Monday 17 Feb. 2025
Gold 24 KT 85,500 /-
Gold 22 KT 79,500 /-
Silver / Kg 96,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

जर गर्दीच्या वेळी ही घटना घडली असती तर जीवघेणी ठरू शकली असती, असे सूत्रांचे म्हणणे आहे. कारण एकदा गर्दी झाली की गर्दी सांभाळणे कठीण होते. दुर्दैवाने, या परिसरात कोणतीही अग्नीशमन सुरक्षा दिसत नाही.

नागपूर टुडेच्या टीमने घटनास्थळी भेट दिली असता पुरेशा अग्निसुरक्षा आणि बचाव व्यवस्थेच्या अभावामुळे ही आग सर्वत्र पसरल्याची माहिती आहे.

नागपूर टुडेशी बोलताना, घटनास्थळी असलेले एक्सप्लोरचे मालक रुत्विक जोशी यांनी आम्हाला माहिती दिली की आग कशामुळे लागली याबद्दल आम्हाला अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र, त्यावर नियंत्रण आणण्यात आले आहे.

नागपूर टुडेने मुख्य अग्निशमन अधिकारी बी चंदनखेडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, वाडी अग्निशमन केंद्राच्या अग्निशमन दलाच्या व्यतिरिक्त त्रिमूर्ती नगर येथील अग्निशमन दल (ज्याची क्षमता 16,000 लीटर आहे) तेदेखील घटनास्थळी दाखल झाले आहे.

आगीची स्थिती संदर्भात भाष्य करण्याचे त्यांनी टाळले असले तरी वाडीचे अधिकारी या संदर्भात अधिक सखोल माहिती देऊ शकतील असे त्यांनी नमूद केले.फायर ऑडिट प्रत्यक्षात झाले की केवळ कागदावर हे अनिश्चित आहे. अग्निशमन विभागाने योग्य सुरक्षेच्या उपाययोजना न करता सुविधेला परवानगी देताना संबंधित असुरक्षिततेकडे दुर्लक्ष कसे केले हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

Advertisement