नागपुरातील कुख्यात गुंड सुमित ठाकूरच्या टोळीने बंदुकीच्या धाकावर तीन तरुणांचे केले अपहरण
नागपूर : कुख्यात गुन्हेगार सुमित ठाकूर याने साथीदारांच्या मदतीने जरीपटका येथील थावरे कॉलनीत दहशत निर्माण करून पिस्तुलच्या धाकावर तीन तरुणांचे अपहरण केले. ही घटना रविवारी रात्री घडली. रिपब्लिकन नगर, न्यू इंदोरा येथे राहणारे ३३ वर्षीय कमल अनिल नाईक यांच्या फिर्यादीवरून...
नागपुरात अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक !
नागपूर : हिंगणा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अभियांत्रिकी महाविद्यालयातून घराकडे जात असताना जामठ्याजवळील जंगलात एका गुराख्याने कुऱ्हाडीचा धाक दाखवून विद्यार्थिनीला अडविले. जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ही घटना 4 ऑक्टोबरला घडली.या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली. हिंगणा पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा...
नागपूर पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या फरार आरोपीला कोल्हापुरातून केली अटक
नागपूर : शहरातील फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेला फरार कुख्यात आरोपी मंदार कोलते याला आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) रविवारी कोल्हापुरातून अटक केली.परदेशी गुंतवणुकीवर किफायतशीर परतावा देण्याचे आमिष दाखवून नागपुरातील कोळसा व्यावसायिकाची ५.३९ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर ठेवणार,पण…;राहुल नार्वेकरांची टीकेनंतर प्रतिक्रिया
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना कठोर शब्दांत खडेबोल सुनावले. विधानसभा अध्यक्षांना कुणीतरी सांगा की ते सर्वोच्च न्यायालयाचे आदेश डावलू शकत नाहीत. तसेच नार्वेकरांना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचं नवीन वेळापत्रक मंगळवारपर्यंत सादर...
बुकी सोंटू जैनने जेएमएफसी न्यायालयासमोर केले आत्मसमर्पण !
नागपूर : बनावट ऑनलाईन गेमींग अॅपच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची शेकडो कोटींनी फसवणूक करणारा बुकी सोंटू जैनने अखेर जेएमएफसी न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले आहे. गोंदियातील सोंटू जैनने नागपुरातील तांदूळ व्यापारी विक्रांत अग्रवाल यांची ५८ कोटींनी फसवणूक केली. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच...
विदर्भातील 57 लाखावर वीजग्राहकांनी केली मोबाईल क्रमांकाची नोंदणी
नागपूर:- ग्राहक सुविधांचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत असलेल्या विदर्भातील अकराही जिल्ह्यातील तब्बल 57 लाख 9 हजार 357 वीजग्राहकांनी स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची महावितरणकडे नोंदणी केली असून एकूण वीज ग्राहकांच्या तुलनेत ही टक्केवारी 91.13 टक्के आहे. यात नागपूर परिमंडलातील सर्वाधिक...
सुप्रीम कोर्टाने ‘निवडणूक बाँड’ प्रकरण घटनापीठाकडे सोपवले ; 30 ऑक्टोबरला होणार सुनावणी
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर राजकीय पक्षांना इलेक्टोरल बाँडद्वारे देणग्या मिळाल्याच्या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सोमवारीच या प्रकरणी याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने हा आदेश...
नागपुरात ‘टास्क फ्रॉड’मध्ये WCL कर्मचाऱ्याने ७७ लाख रुपये गमावले
नागपूर: वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) चा एक कर्मचारी टास्क फ्रॉडला बळी पडला आणि ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांकडून 77 लाख रुपये गमावले. संदेश सिटी, जामठा येथील ५६ वर्षीय रहिवासी सारीकोंडा त्रिनाधा कोटम राजू यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 26...
ओबीसी संघटना नागपुरात आज होणार एकजूट ;मनोज जरांगे पाटील यांच्या अल्टीमेटमनंतर घेतला आक्रमक पवित्रा
नागपूर : मराठा आरक्षणसाठी अंतरवली-सराटी गावात एका विशाल सभेला संबोधित करताना जरंगे-पाटील यांनी सरकारला ८ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. पाटील यांच्या भूमिकेनंतर ओबीसी समाजाने संताप व्यक्त केला आहे. यापार्श्वभूमीवर आज नागपुरात विविध ओबीसी संघटनांची बैठक बोलावण्यात आली आहे. मराठा समाजाला...
महाराजा अग्रसेन यांनी दिलेल्या मूल्यांचा अवलंब करण्याची आवश्यकता
नागपूर : महाराजा अग्रसेन यांनी समाजाला मानवतेची शिकवण दिली. त्यांनी सत्याचा मार्ग दाखवला. त्यांच्या मूल्यांचा अवलंब करून समाजात परिवर्तन झाले तर तीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज...
नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात ; नागपुरात ठिकठिकाणी देवीच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा
नागपूर : आजपासून शारदीय नवरात्रीला (Navratri 2023) सुरूवात झाली आहे.या पार्श्वभूमीवर नागपुरात ठिकठिकाणी देवीच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सकाळपासूनच 'जय माता दी' च्या जयघोषात ढोल तशांच्या गजरात मातेचे थाटात आगमन झाले आहे. नवरात्रीचे नऊ दिवस एकच उत्साह, नवं चैतन्य आणि भक्तिमय...
मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही ; मनोज जरांगेचा निर्धार
नागपूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केले होते. यानंतर ४० दिवसांत मराठ्यांना टिकणारं आरक्षण देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होतं.त्यानंतर...
हृदयद्रावक ; नागपुरात आईच्या प्रियकराने केला अल्पवयीन मुलींवर बलात्कार
नागपूर : शहरातील कळमना येथे प्रेयसीला दारू पाजून तिच्या दोन अल्पवयीन मुलींवर प्रियकराने अत्याचार केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. यात धक्कादायक म्हणजे या कृत्याबाबत आईलाही माहिती होते. या प्रकरणातील आरोपी फरार आहे. पोलिसांकडून शोधशोध सुरु आहे....
नागपुरात टॉप ५ गरबा इव्हेंटची धूम ; नवरात्रोत्सव करा आनंदात साजरा
नागपूर ; नवरात्रात मुख्य आकर्षण असते ते गरब्याचे. यंदा शहरात विविध ठिकाणी गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र शहरात या ५ गरबा इव्हेंटची धूम असणार आहे. सांस्कृतिक वारशासाठी ओळखले जाणारे नागपूर शहर नवरात्रोत्सव मोठ्या थाटात...
रातुम नागपूर विद्यापीठ ते झिरो माईल मार्ग ‘स्व. दत्ताजी डिडोळकर मार्ग’ नावाने ओळखला जाणार : ना. नितीन गडकरी
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ते झिरो माईल फ्रीडम पार्क मार्ग ‘स्व. दत्ताजी डिडोळकर मार्ग’ या नावाने ओळखला जाणार आहे. दत्ताजी डिडोळकरांचे कार्य आणि त्यांचे आदर्श हे जनहिताची कामे करण्याची प्रेरणा देत राहिल, अशी भावना व्यक्त करीत स्व....
इंडिया आघाडीने ५ नोव्हेंबरला नागपूरमध्ये होणारी सभा पुढे ढकलली; ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उचलले पाऊल
नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यासाठी इंडिया आघाडीने आपली ताकद वाढवण्यासाठी नागपूरमध्ये ५ नोव्हेंबर रोजी भव्य सभेचे आयोजन केले होते. मात्र आता राज्यात 5 नोव्हेंबरला ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान असल्याने तारीख पुढं ढकलल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक...
ओबीसींना लेखी आश्वासन अद्यापही नाही ; राष्ट्रीय ओबीसी महासंघाची उद्या बैठक
नागपूर : मराठा समाजाला सरसकट कुणबी जातप्रमाणपत्र दिले जाऊ नये यासाठी ओबीसी समाजाने ठिकठिकाणी आंदोलने केले. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने चर्चेसाठी बैठक बोलावली. मात्र ही बैठक होऊन १५ दिवस लोटले तरी बैठकीत नेमके काय निर्णय घेण्यात आले यासंदर्भात...
धम्मचक्र प्रवर्तनाचा ६७ वा वर्धापन दिवस आज ; नागपुरात दीक्षाभूमीवर अनुयायांची गर्दी
नागपूर : देशभरात आज ६७ वा 'धम्मचक्र प्रवर्तन दिन' उत्साहात साजरा करण्यात येत आहे. . या दिवशी महाराष्ट्रासह देशभरातील लाखो अनुयायी नागपूरला येतात. या दिवसाची पार्श्वभूमी म्हणजे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या...
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अयोध्येतील राम प्राणप्रतिष्ठा दिनाला उपस्थित न राहण्यास सांगितले जात आहे का?
अयोध्या : अयोध्येतील राम मंदिर (Ram Mandir) जनतेसाठी कधी खुलं होणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच आता अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेची तारीख जाहीर झाली आहे.येत्या 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. मात्र दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी...
ही नैतिकता अन् सत्याची लढाई ; सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीनंतर सुप्रिया सुळेंचे विधान
मुंबई : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत आज (१३ ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर ताशेरे ओढले. यावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवेळी राष्ट्रवादी...
वाघनखांसंबधीचा सामंजस्य करार झाल्यानंतर मुनगंटीवार याचे नागपुरात भव्य स्वागत !
नागपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आणि महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत महत्त्वाची भूमिका असलेल्या गनिमी काव्याचे उत्तम उदाहरण असलेली वाघनखं ब्रिटनमधून भारतात आणण्यासंबंधीचा सामंजस्य करार झाला. यानंतर मुनगंटीवार पहिल्यादांच नागपुरात दाखल झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर...