वाघनखांसंबधीचा सामंजस्य करार झाल्यानंतर मुनगंटीवार याचे नागपुरात भव्य स्वागत !
नागपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आणि महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत महत्त्वाची भूमिका असलेल्या गनिमी काव्याचे उत्तम उदाहरण असलेली वाघनखं ब्रिटनमधून भारतात आणण्यासंबंधीचा सामंजस्य करार झाला. यानंतर मुनगंटीवार पहिल्यादांच नागपुरात दाखल झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर...
नागपुरात आतापर्यंत 150 गरबा इव्हेंट्सची नोंद, अजून वाढ होण्याची शक्यता; पोलिसांची माहिती
नागपूर : नवरात्रात मुख्य आकर्षण असते ते गरब्याचे. यंदा शहरात विविध ठिकाणी गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात आतापर्यंत 150 गरबा इव्हेंट्सची नोंदणी झाली या संख्येत अजून वाढ होण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे. नागपूर टुडेशी...
हा पोरखेळ बंद करा ? सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना झापले
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आज आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरून विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणीत होणाऱ्या दिरंगाईबाबतच्या याचिकांवर सुनावणी झाली. याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने अध्यक्ष राहुल नार्वेकरांना चांगलेच झापले आहे. विधानसभा अध्यक्षांना कोणीतरी सांगावे की, हे प्रकरण त्यांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असेही...
कुटुंब नियोजन ही प्रत्येकाची जबाबदारी, अनावश्यक प्रेगनेंसी टाळण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक : सुप्रीम कोर्ट
नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नुकतेच दिलेल्या एका आदेशात 26 आठवड्यांच्या गर्भवती विवाहित महिलेला गर्भपात करण्याची परवानगी देताना, कुटुंब नियोजन आणि पुरेशी खबरदारी घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. न्यायमूर्ती हिमा कोहली आणि बीव्ही नागरथना यांच्या खंडपीठाने,11 ऑक्टोबर...
मराठा आरक्षणाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्ट क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार
नवी दिल्ली: राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. यावर आता सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निकालाविरोधातील क्युरेटिव्ह याचिका सुनावणीसाठी घेण्यास सहमती दर्शवली आहे. न्यायालयाने आज शुक्रवारी (१३ ऑक्टोबर) सांगितले की, ते मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या...
नागपुरात दुचाकीच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या ७८ वर्षीय महिलेचा मृत्यू
नागपूर : मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन भरधाव दुचाकींच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या ७८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हिरामुनी कुंवरबहादूरसिंह ठाकूर (७८, रोझ कॉलनी, मानकापूर) असे मृतक महिलेचे नाव आहे. माहितीनुसार, ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात...
देवेंद्र फडणवीसांचा विजयरथ कुणीही रोखू शकणार नाही – चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा
शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या पाठित खंजीर खुपसण्याचे काम केले.. असे अनेक प्रयत्न त्यांनी वेळोवेळी केले. तरीही देवेंद्र फडणवीस यांचा विजयरथ कुणीही थांबवू शकणार नाही, असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ‘महाविजय-2024’ अंतर्गत...
नागपूर येथे होणा-या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.मुरहरी केळे
नागपूर:- अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फ़े 30 व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे, येत्या 14 ऑक्टोबर 2023 रोजी नागपूर येथील वसंतराव देशपांडे सभागृहात येथे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. मुरहरी...
इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र ठरले राज्यातून प्रथम
नागपूर: केंद्र शासनाच्या केंद्रीय स्वास्थ व परिवार मंत्रालय दिल्ली मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमा (NQAS) अंतर्गत नागपुरातील इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राला ८५.२ टक्के गुण प्राप्त झाले असून, महाराष्ट्र राज्यातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य...
महाराष्ट्रात महिला तस्करीचे प्रमाण सर्वाधिक,५ लाख महिला अद्यापही बेपत्ता ; चाकणकर यांची माहिती
वाशीम : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्रात महिला तस्करीचे प्रमाण सर्वाधिक होत असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. महिला बेपत्ता होण्याच्या १३ लाख तक्रारी आहेत. यातील ७ लाख महिला घरी परतल्या आहेत. पाच लाख महिला अद्यापही बेपत्ता असल्याची...
२४ तास शट डाऊन : प्रतापनगर जलकुंभाचा पाणीपुरवठा राहणार बाधित
नागपूर:नागपूर महानगर पालिकेने अमृत योजनेअंतर्गत नवीन बांधलेल्या शांतिनिकेतन कॉलोनी स्थित प्रताप नगर जलकुंभ (लक्ष्मी नगर झोन-) ह्यांचे मुख्य जलवाहिनीला आंतरजोडणी करिता ऑक्टोबर १३ (शुक्रवार ) सकाळी ९ ते ऑक्टोबर १४ (शनिवार ) सकाळी ९ पर्यंत प्रतापनगर जलकुंभाचे (विद्याविहार कॉलोनी) शटडाऊन...
नागपूरजवळच्या सावनेर येथील रॉयल लॉजवर सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश !
नागपूर : शहरातील सावनेरातील रॉयल लॉजवर सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या छाप्यात एका तरुणीला ताब्यात घेतले असून दोन तरुणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. रुण मदनमोहन रुषिया (जुना धान्यगंज, सावनेर) आणि रंजीत मारोतराव वानखडे (२९, झिल्पा. ता....
नागपुरात महापूर आलाच कसा? हायकोर्टाचा संतप्त सवाल
नागपूर : गेल्या काही दिवसांपूर्वी नागपुरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव, नाग नदी, पिवळी नदी आणि स्थानिक नाला ओव्हरफ्लो झाल्यामुळे शहरातील अनेक भागांत विशेषत: अंबाझरी तलाव, नाग नदीजवळील सखल भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे अनेकांच्या घरांमध्ये दुकानांमध्ये...
नागपुरात काँग्रेसच्या बैठकीत तुफान राडा ; कार्यकर्त्यांच्या दोन गटात हाणामारी !
नागपूर : काँग्रेसच्या नागपुरात सुरु असलेल्या बैठकीत अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. पूर्व विदर्भ लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत काँग्रेसमधील दोन गट एकमेकांना चांगलेच भिडल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांत झालेल्या राड्यावेळी...
संपूर्ण दीक्षाभूमी परिसरात स्वच्छतेला प्राधान्य द्या मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली परिसराची पाहणी
नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिन मुख्य समारंभ आणि इतर दिवशी देखील दीक्षाभूमीवर येणा-या बौद्ध अनुयायांची सुविधा आणि आरोग्याच्या दृष्टीने संपूर्ण दीक्षाभूमी परिसरामध्ये स्वच्छतेला प्राधान्य द्या, असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे...
नांदेडच्या ‘त्या’ शासकीय रुग्णालयात मृत्यूतांडव सुरूच ; ८ दिवसांत १०८ जणांचा मृत्यू
नांदेड : नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात काही दिवसांपूर्वी ४८ तासांत सुमारे ३१ रुग्णांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये काही नवजात बालकांचाही समावेश होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. आता याच रुग्णालयात गेल्या आठ...
आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणी १३ ऐवजी १२ तारखेलाच होणार ; राहुल नार्वेकरांची माहिती
मुंबई : शिवसेनेतील शिंदे गट व ठाकरे गट यांच्या आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विधनसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मुद्दामहून निर्णय घेण्यास उशीर करत असल्याचा आरोप करत ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. यातच राहुल...
मराठा-ओबीसी वादावरील याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली
नागपूर : मराठा समाजाचा ‘ओबीसी’मध्ये समावेश केला जाऊ नये, यासाठी ओबीसी मुक्ती मोर्चाचे मुख्य संयोजक नितीन चौधरी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर आज निर्णय जाहीर केला जाणार होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...
नागपुरात गंगाजमुनातील तरुणींचा खापरखेड्यात देहव्यापार सुरु; ग्रामीण पोलिसांकडून छापा
नागपूर : वेश्याव्यवसायासाठी ओळखल्या जाणाऱ्या गंगाजमुना वस्तीतील तरुणींना ग्रामीण भागातील हॉटेल, ढाब्यावर नेऊन देहव्यापार करवून घेण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खापरखेड्यातील गुप्ता नावाच्या युवकाने आईच्या मदतीने गंगाजमुनातील तरुणींकडून देहव्यापार सुरु केला होता.याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी छापा घालून दोन...
इस्त्रायलच्या कठीण काळात आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे ; पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : पॅलेस्टाइनमधील 'हमास' ही दशवतवादी संघटना आणि इस्त्रायलमध्ये जोरदार युद्ध पेटले आहे. या युद्घात आतापर्यंत दोन्ही देशातील 1500 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर संवाद साधला...
सुप्रीम कोर्ट महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात निर्णायक ठरलेल्या ‘नबाम रेबिया केस’चा पुनर्विचार करणार
मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. याप्रकरणी सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने नबाम रेबिया केसचा संदर्भ दिला होता. आता या नबाम रेबिया प्रकरणाची पुन्हा एकदा सुनावणी सुरू होणार आहे. सुप्रीम कोर्टाने २०१६ साली अरुणाचल प्रदेशमध्ये बरखास्त झालेलं...