| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Jan 18th, 2021

  मलजलवाहिनी कामाकरिता काँग्रेसनगर येथील वाहतूक बंद

  शिवाजी सायन्स ते काँग्रेसनगर व काँग्रेसनगर टी पॉईंट ते सचिन किराणा स्टोअर्सपर्यंत वाहतूक प्रतिबंधित


  नागपूर : लक्ष्मीनगर झोन अंतर्गत प्रभाग क्रमांक १६ धंतोली तकीया काँग्रेसनगर येथे मलजलवाहिनी टाकण्याच्या कामाकरिता काँग्रेसनगर येथील हम्पयार्ड रोडवरील शिवाजी सायन्स कॉलेज ते काँग्रेसनगर टी-पॉईंट व काँग्रेसनगर टी-पॉईंट ते सचिन किराणा स्टोअर्स पर्यंतची वाहतूक बंद करण्यात येत आहे. यासंदर्भात लक्ष्मीनगर झोनच्या कार्यकारी अभियंत्यांद्वारा वाहतूक पोलिस उपायुक्तांना पत्र देण्यात आले आहे.

  काँग्रेसनगर येथील हम्पयार्ड रोडवरील शिवाजी सायन्स कॉलेज ते काँग्रेसनगर टी-पॉईंट पर्यंत डाव्या बाजूने मलजलवाहिनी टाकण्याचे काम प्रस्तावित आहे. यासाठी सदर मार्गावरील डाव्या बाजुची वाहतूक १५ जानेवारी ते ३० जानेवारीपर्यंत बंद करून उजव्या बाजुने वळती केली जाईल.

  तसेच काँग्रेसनगर टी-पॉईंट ते सचिन किराणा स्टोअर्स पर्यंत उजव्या बाजुने मलजलवाहिनी टाकणे प्रस्तावित असून ३१ जानेवारी १५ फेब्रुवारीपर्यंत या मार्गावरील उजव्या बाजुची वाहतूक बंद करून ती डाव्या बाजुने वळती केली जाईल. कामाच्या ठिकाणी सूचना फलक लावण्यात येणार आहेत.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145