Published On : Sun, Jul 14th, 2019

रामटेक येथे लोकअदालत सम्पन्न

Advertisement

रामटेक येथील दिवाणी व फोजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष , तालुका विधी सेवा समिती चे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश माणिक वाघ यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे विधिवत उद्घाटन केले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सह दिवाणी न्यायधीश व्ही पी धुर्वे तसेच तालुका वकील संघाचे अध्यक्ष एम एन नवरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती .कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथींचा ‘वृक्षवल्ली आम्हां सगे सोयरे’ चा संदेश देत वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी 31 दिवाणी केसेस व फौजदारी प्रकरणी 90 केसेस ठेवण्यात आल्यात. त्याचप्रमाणे दाखलपूर्व 350 केसेस ठेवण्यात आले होते.त्यापैकी दिवाणी 3 केसेस , फौजदारी 5 प्रकरणे व वादपूर्व दाखल 13 प्रकरणे निकाली काढून 24,96,294 रुपये वसूल करण्यात आले.

अध्यक्षीय स्थानावरून मार्गदर्शन करतांना दिवाणी न्यायाधीश माणिक वाघ म्हणाले की “लोकअदालत ही सामान्य माणसाच्या कल्याणासाठी व प्रगतीसाठी आहे.वाद ,भांडण व मतभेद यातून अनेक समस्या निर्माण होतात आणि त्या लोकांकरिता घातक व समाजाच्या प्रगतीला मारक असतात. प्रत्येक प्रकरण सामंजस्याने मिटवून लोक अदालतीचा लाभ घेऊन आपली प्रकरणे सामंजस्याने निकाली काढावी , जेणे करून आपला पैसा व वेळेची बचत होईल ” असे मोलाचे मार्गदर्शन करून लोकअदालत चा फायदा घेण्याचे आवाहन ह्या प्रसंगी केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड एम व्ही येरपुडे,व आभार प्रदर्शन ऍड ए व्ही गजभिये यांनी केले. ह्या प्रसंगी सहाय्यक गटविकास अधिकारी अशोक मते , ऍड अरविंद कारेमोरे,पी बी बांते,जी आर मेश्राम,ऍड हटवार ,ऍड अपराजीत,ऍड सय्यद हजर होते.

कार्यक्रमाच्या सफल यशस्वितेकरिता न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक ए एन रेवतकर,डी जी पोकळे,वाघाडे ,लघुलेखक वरिष्ठ लिपिक एस एच तालेवार,एम एल शेळके,कनिष्ठ लिपिक व्ही एम बाजारे, व्ही एम मुळे,शिपाई ऐ टी काकडे,एम जी यांनी प्रयत्न केले .