Published On : Sun, Jul 14th, 2019

दुचाकीचोरटयास अटक, चोरीच्या दुचाकीसह 1 हजार रुपये जप्त

कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामगार नगर रहिवासी एक तरुण चोरीची दुचाकी फिरवत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी रात्रगस्त वर फिरत असताना या तरुणाला तांब्यात घेऊन खाकी चा धाक दाखवताच सदर दुचाकी चोरीचो असल्याची कबुली केली तसेच रणाळा येथील ओम मूर्ती नगर येथील लोखंडचोरी ची सुद्धा कबुली दिली.

यानुसार या चोरट्या कडून जुनी कामठी पोलिस स्टेशन हद्दीतील मच्चीपुल चौकातून चोरी गेलेली दुचाकी तसेच चोरीचे लोखंड विकलेले 1 हजार रुपये जप्त करण्यात आले. अटक आरोपीचे नाव वसीम अहमद वल्द नसिर अहमद वय 28 वर्षे रा कामगार नगर कामठी असे आहे.या आरोपीने सध्या दोन चोरीच्या गुन्ह्याची कबुली देत चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून इतर चोरीची सुद्धा कबुली देत असल्याची माहिती आहे.

ही यशस्वी कारवाही डीसीपी हर्ष पोद्दार व एसीपी राजेश परदेसी यांच्या मार्गदर्शनार्थ डी बी स्कॉड चे पप्पू यादव, मंगेश लांजेवार, मंगेश यादव, राजा टाकळीकर , सतीश ठाकूर, सुधीर कनोजिया यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

संदीप कांबळे कामठी