Published On : Sun, Oct 18th, 2020

स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रा.पथकने ५ किलो 300 ग्रा. गांजा पकडला

नागपुर – स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण चे पथक दिनांक १७/१०/२०२० रोजी पोलीस स्टेशन कळमेश्वर नागपूर ग्रामीण अंतर्गत पेट्रोलिंग करीत असतांना पथकास गोपनीय माहिती मिळाली की, कळमेश्वर खैरी (लखमाजी) या गावात नारायण महादेव शेंडे वय ४३,वर्ष नावाचा इसम त्याच्या राहत्या घरी गांजा (अमली पदाथ) साठवून तसेच अनेक ठीक ठिकाणी पान ठेलयावर विक्री करतो अशी माहिती मिळली .

महितीची शहानिशी करून खात्री झाल्याने सदर खैरी या गावी जावून नारायण शेंदे यांच्या राहत्या घरी झडती घेतली असता त्यांच्या घरी एकूण ५ किलो ३०० ग्राम गांजा रुपये ५३,६३०/- तसेच इतर साहित्य ज्यात (वजन काटा मोबाईल) किमान रुपये १५००/- असे एकूण ५५१३०/- किमतीच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. बाबत पोलीस स्टेशन कलमेश्वर येथे एन. डी. पी.एस. कायदया कलम २०,२२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस स्टेशन कलमेश्वर करीत आहे.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, मा.श्री राहुल माकणीकर,अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण,यांच्या मार्गदर्शनात श्री. अनिल जिटटावार, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा सपोनी जितेंद्र वैरागडे, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र गौरखेडे, सपोउपनि- जय शर्मा,पोलीस हवालदार महेश जाधव, गजेंद्र चौधरी पोलीस नायक सत्यशील कोठारे, पोशि रोहन डाखोरे ,महेश बिसेन, बालाजी साखरे, चालक पोहवा भाऊराव खंडाते, चापोना अमोल कुथे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण तसेच पोलीस स्टेशन कळमेश्वर येथील सपोनि मनोज खडसे, पोलीस शिपाई निलेश उईके यांच्या सहा पार पडली.
दिनेश दमाहे

Advertisement
Advertisement