| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Jan 18th, 2021

  मेट्रोच्या पिलर वर प्लेमिंगो पक्षी

  नागपूर नागपूर मेट्रो प्रकल्पाअंतर्गत असलेल्या ऍक्वा लाईन मार्गिकेवर सुभाष नगर मेट्रो स्टेशन स्वामी विवेकानंद स्मारक समोर मेट्रो पिलर वर प्लेमिंगो पक्ष्याचे म्युरल तयार करण्यात आले आहे. या म्युरलने अंबाझरी तलावा जवळचे सौंदर्य अधिकच खुलले आहे.

  अश्या प्रकारची कलाकृती मेट्रोच्या परिसरात उभारल्याचे हे तिसरे उदाहरण आहे या आधी ऑरेंज लाईन मार्गिकेवर छत्रपती चौक मेट्रो स्थानकाजवळील चौकातील पिलर वर अशीच एक सुंदर कलाकृती तयार केली आहे. या शिवाय झासी राणी चौक मेट्रो स्टेशन येथे देखील राणी लक्ष्मीबाई यांचे म्युरल तयार करण्यात आले आहे तसेच रहाटे कॉलोनी मेट्रो स्थानकाजवळ `बेटीबचाव, बेटी पढाव’, या संकल्पनेवर आधारित कलाकृती महा मेट्रोने साकार केली आहे.

  या म्युरलची मूळ संकल्पना महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांची आहे. मेट्रो पिलर वर स्थापित केलेले हे तैलचित्र ३५ फुट बाय ८ फुट आकारमानाचे आहे. मेट्रो ट्रेन मधून प्रवास करतांना अंबाझरी तलावाचे विहंगम दृश्य बघायला मिळते.

  मेटल शिटच्या सहाय्याने हे म्युरल तयार करण्यात आहे. विवेक गोबरे यांनी याचे डीझाईन केले आहे असून विजय श्रीखंडे यांनी संपूर्ण कार्याची अंबलबजावणी केली. तब्ब्ल २२ आर्टिस्ट ने सदर कार्य पूर्ण केले असून डॉ. विनोद इंदूरकर यांच्या मार्गदर्शनात सदर कार्य पूर्ण करण्यात आले आहे. या स्थानिक कलाकारांनी कटिंग,एम्बोसिंग,कलर ट्रीटमेंट,फ्रेम्स,लेजर कटिंग वेल्डिंग, पेटिंग इत्यादी वस्तूचा वापर करून म्युरल बसविण्याचे कार्य पूर्ण केले आहे. या पिलर वर एकूण ४४ प्लेमिंगो पक्षी आहेत.

  हे म्युरल तयार करण्यास १ महिन्याचा कालावधी लागला असून यामध्ये वापरण्यात आलेले संपूर्ण साहित्य जंगरोधक असून कुठल्याही वातावरणात खराब होणार नाही.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145